AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ranveer Singh | न्यूड फोटोशूट प्रकरणी रणवीर सिंहविरोधात चेंबूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल, रणवीरच्या अडचणी वाढण्याची शक्यता!

अभिनेता रणवीर सिंहवर मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सोशल मीडियावर आक्षेपार्ह फोटो टाकल्याप्रकरणी चित्रपट अभिनेता रणवीर सिंहवर मुंबईतील चेंबूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रणवीर सिंहविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती, त्याची दखल घेत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Ranveer Singh | न्यूड फोटोशूट प्रकरणी रणवीर सिंहविरोधात चेंबूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल, रणवीरच्या अडचणी वाढण्याची शक्यता!
Image Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Jul 26, 2022 | 12:58 PM
Share

मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. रणवीरचे न्यूड फोटोशूट पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्याच्यावरती काही लोकांकडून टिकेची झोड उडाली आहे. तर काही लोक रणवीरचे समर्थ करण्यास मैदानात उतरल्याचे चित्र देखील आहे. रणवीर सिंहच्या या न्यूड फोटोशूट (Photoshoot)विरोधात चेंबूर पोलीस ठाण्यात आता गुन्हा नोंद करण्यात आलायं. सोशल मीडियावर आक्षेपार्ह फोटो टाकल्याप्रकरणी हा गुन्हा (Crime) नोंद करण्यात आल्याची माहिती मिळतंय. यामुळे रणवीरच्या अडचणीमध्ये वाढ होणार हे नक्की आहे.

न्यूड फोटोशूट प्रकरणी रणवीर सिंहवर मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला

अभिनेता रणवीर सिंहवर मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सोशल मीडियावर आक्षेपार्ह फोटो टाकल्याप्रकरणी चित्रपट अभिनेता रणवीर सिंहवर मुंबईतील चेंबूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रणवीर सिंहविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती, त्याची दखल घेत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रणवीर सिंहविरोधात आयपीसी कलम 292, 293, 509, ते कलम 67(ए) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलायं. यामुळे न्यूड फोटोशूट करणे रणवीरच्या चांगलेच अंगलट आल्याचे दिसते आहे.

बॉलिवूडमधील काही लोक रणवीर सिंहच्या समर्थनार्थ उभे

बॉलिवूडमधील काही लोक रणवीर सिंहच्या समर्थनार्थ उभे राहिले आहेत. मात्र, समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनीही रणवीरला न्यूड फोटोशूटवरून टार्गेट केले. अबू आझमी म्हणाले होते की, रणवीरचा नंगानाच सुरू आहे. सार्वजनिक ठिकाणी नग्न फिरणे कायद्याने गुन्हाच आहे. बॉलिवूडमधून अनेकांनी म्हटले होते की, त्याने काय करावं आणि काय न करावं हे सांगणारे आपण कोण? हा त्याचा वैयक्तीक प्रश्न आहे. मात्र, आता हे न्यूड फोटोशूटचे प्रकरण थेट पोलिसात पोहचल्याने रणवीरवर काय कारवाई होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.