AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महिलांनी दाऊद इब्राहिमला पाठवल्या होत्या बांगड्या, 1993 चे मुंबईतील बॉम्बस्फोट टळले असते पण एक मोठी चूक, तिथेच..

भारताचा मोठा दुश्मन दाऊद इब्राहिम आज पाकिस्तानात बसला आहे. त्याला भारतात आणण्यासाठी अनेक प्रयत्न केली गेली. पण यश मिळाले नाही. 1993 मध्ये मोठे बॉम्बस्फोट मुंबईत घडवून आणली गेली. त्याबाबत आता मोठा खुलासा करण्यात आला.

महिलांनी दाऊद इब्राहिमला पाठवल्या होत्या बांगड्या, 1993 चे मुंबईतील बॉम्बस्फोट टळले असते पण एक मोठी चूक, तिथेच..
Dawood Ibrahim
| Updated on: Sep 27, 2026 | 2:33 PM
Share

मुंबईतील बॉम्बस्फोटामागे दाऊद इब्राहिमचा होता. पाकिस्तानमध्ये बसून दाऊद इब्राहिम भारतात दहशतवादी कारवाया घडून आणतो. दाऊद इब्राहिमला भारतात आणण्यासाठी मोठी प्रयत्न केली जात आहेत. मात्र, पाकिस्तानने त्याला सुरक्षितस्थळी ठेवले. महाराष्ट्राचे माजी डीजीपी आणि मुंबईचे माजी पोलिस आयुक्त डी.शिवानंदन यांनी मोठा दावा केला होता. त्यांनी म्हटले की, जेव्हा 1992 मध्ये आयोध्यामध्ये बाबरी मस्जिद विध्वंस झाला होता, त्यावेळी मुस्लिम महिलांनी दाऊद इब्राहिमला थेट बांगड्या भेट पाठवल्या होत्या. त्यानंतर दाऊद इब्राहिम प्रचंड नाराज झाला. त्यानंतर मुंबई बॉम्बस्फोटाच्या कटाला सुरूवात झाली. याबाबत ज्यावेळी क्राइम लेखक विवेक अग्रवाल यांना विचारण्यात आले, त्यावेळी त्यांनी मोठे दावे केले. एएनआय यांच्या पॉडकास्टमधील मुलाखतीमध्ये त्यांनी मुंबई बॉम्बस्फोटाच्या मुद्द्यावर सविस्तर चर्चा केली.

त्यांनी म्हटले की, दाऊद इब्राहिम आणि छोटा राजन यांच्यासोबत अंडरवर्ल्ड आणि बॉलिवूडचे नाते कायमच चर्चेत राहिले आहे. मुंबई बॉम्बस्फोटाची योजना ज्यावेळी सुरू होती, त्यावेळी दाऊद ग्रुपच्या एजाज पठाणला दूर ठेवले होते. आयएसआय आणि दाऊदच्या बैठकीत छोटा राजन आणि एजाज पठाण यांना दूर ठेवण्यात आले. मुद्द्याम हे करण्यात आले. मुळात म्हणजे ज्यावेळी हा कट रचला जात होता, त्यावेळी सर्व दारू पिणाऱ्या लोकांना बैठकीपासून दूर ठेवले.

दारू पिणारे लोक बैठकीत लगेचच बोलतात आणि बैठकीतील गोष्टी बाहेर बोलतात. ज्यावेळी ही स्फोट झाली, त्यावेळी दाऊदला समजले की, किती मोठे स्फोट झाले. दाऊदला वाईट वाटले कारण त्याचे मुंबईवर प्रेम होते. पुढे बोलताना विवेक अग्रवाल यांनी म्हटले की, राम जेठमलानीने दाऊदला मुंबईला परत आणण्यासाठी अनेक प्रयत्न केली. पण सरकारने त्यांच्या ठेवलेल्या तीन अटी मान्य करण्यास स्पष्ट नकार दिला.

दाऊदने सरकारपुढे अट ठेवल्या की, तो मुंबईत परत आल्यावर त्याला कोणती मृत्युची शिक्षा दिली जाणार नाही. जेल नाही तर एका बंगल्यात त्याला नजरकैदेत ठेवले जावे. जर सरकारने त्याच्या अटी मान्य केल्या असत्या तर सरकारच्या समस्या वाढल्या असत्या. अग्रवाल यांनी म्हटले की, आजही दाऊदला मुंबईत परत यायचे आहे. विवेक अग्रवाल यांनी पुढे म्हटले की, जर मुंबई पोलिसांच्या तपास व्यवस्थित झाला असता तर 1993 मधील मुंबईतील बॉम्बस्फोट कधीच झाला नसता.

त्यापूर्वी टायगर मेमन याच्या माहिममधील घराबाहेर एका स्कूटरमध्ये स्फोट झाला. या स्फोटानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी माहिम पोलिस स्टेशनमधील एका कॉन्सटेबलला घटनास्थळी पाठवण्यात आले. त्याने एकडे तिकडे फक्त पाहणी केली. यादरम्यान स्कूटीमध्ये स्फोट झाल्याचे सांगण्यात आले. मात्र, स्कूटीमध्ये आयडी ठेवण्यात आले होते आणि त्याचा स्फोट झाला होता.

तो तपास व्यवस्थित झाला नाही, जर तो तपास व्यवस्थित झाला असता तर मुंबई बॉम्बस्फोटाचा कट उघडकीस आला असता. धक्कादायक म्हणजे त्यांनी चांदीच्या नावावर आरडीक्स मुंबईत आणले होते. काही अधिकाऱ्यांनी यात काशी केली होती. त्यांनी पैसा खाल्ला होता. प्रामाणिक अधिकारी एलडी अरोरा यांना याबाबत माहिती मिळाली होती. पण डी कंपनी त्यांच्या मागे हात धून लागली.

Follow Us
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...