Love Story | आमिर खानसाठी आयोजित डिनर पार्टीमध्ये नागार्जुन झाले भावूक, पाहा नेमकं काय झालं…

बॉलिवूड अभिनेता आमिर खान (Aamir Khan) अलीकडेच हैदराबादला त्याच्या 'लाल सिंह चड्ढा' चित्रपटाचा सह-कलाकार नागा चैतन्यच्या (Naga Chaitanya) आगामी चित्रपट 'लव्ह स्टोरी'च्या (Love story) प्रमोशनसाठी आला होता.

Love Story | आमिर खानसाठी आयोजित डिनर पार्टीमध्ये नागार्जुन झाले भावूक, पाहा नेमकं काय झालं...
Nagarjuna and Aamir khan

मुंबई : बॉलिवूड अभिनेता आमिर खान (Aamir Khan) अलीकडेच हैदराबादला त्याच्या ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटाचा सह-कलाकार नागा चैतन्यच्या (Naga Chaitanya) आगामी चित्रपट ‘लव्ह स्टोरी’च्या (Love story) प्रमोशनसाठी आला होता, तेव्हा त्याला त्याच्या चित्रपटाबद्दल काही छोट्या गोष्टी शेअर करण्यापासून स्वतःला रोखता येणार नाही हे क्वचितच माहित होते. नाग चैतन्याचा चित्रपट त्याच तारखेला रिलीज झाला आहे, ज्या दिवशी त्याचे आजोबा अक्किनेनी नागेश्वर राव यांचा ‘प्रेमा नगर’ हा चित्रपट बरोबर 50 वर्षांपूर्वी रिलीज झाला होता. आमिर खाननेही याचा उल्लेख केला. अक्किनेनी कुटुंबासाठी हा अत्यंत भावनिक आणि अभिमानाचा क्षण होता.

नियतीने नाग चैतन्यला त्याच्या आजोबांच्या एका चित्रपटाशी जोडले आहे हे आश्चर्यकारक आहे. चैतन्यचे वडील आणि नागेश्वर राव यांचा मुलगा नागार्जुन आणि त्याच्या कुटुंबीयांनी प्रमोशनल इव्हेंटनंतर आमिरसाठी फॅमिली डिनरचे आयोजन केले होते. या डिनर दरम्यान, नागार्जुनला समजले की, ‘लाल सिंह चड्ढा’मध्ये त्याच्या मुलाने साकारलेल्या पात्राला ‘बाला राजू’ म्हणतात. ते आश्चर्यचकित झाले आणि भावनिक देखील झाले होते, कारण ते एका आयकॉनिक पात्राचे नाव होते, जे स्वतः त्यांच्या वडील अक्किनेनी नागेश्वर राव यांनी 70 वर्षांपूर्वी ‘बाला राजू’ या त्याच नावाच्या चित्रपटात साकारले होते.

अखिल अक्किनेनीचा चित्रपटही लवकरच प्रदर्शित होणार!

कुटुंबासाठी हा विशेष क्षण साजरा करण्यासाठी, प्रत्येकाने मिळून एक केक कापला ज्यामध्ये लव्ह स्टोरी आणि अखिल अक्किनेनीच्या ‘एजंट’सह दोन रिलीज एकामगोमाग एक दिसल्या. दुसरीकडे, आमिर खानचा ‘लाल सिंह चड्ढा’ हा बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक चित्रपट आहे आणि या वर्षी ख्रिसमसच्या दिवशी रिलीज होणार आहे. आमिर खान आणि चैतन्य व्यतिरिक्त अभिनेत्री करीना कपूर खान देखील या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

फॅमिली डिनरमधून समंथा गायब!

या क्षणी, अक्किनेनी कुटुंबाच्या डिनर पार्टीबद्दल बोलायचे, तर समोर आलेल्या फोटोंमध्ये चैतन्यची पत्नी आणि अभिनेत्री समंथा कुठेही दिसत नाहीय. कौटुंबिक जेवणाच्या या फोटोमध्ये समंथा न दिसल्यामुळे चैतन्य आणि तिच्या घटस्फोटाच्या बातमीवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाल्या आहेत. तथापि, सामंथा किंवा चैतन्य या दोघांनीही त्यांच्या विभक्त होण्याच्या वृत्तावर कोणतेही अधिकृत विधान दिलेले नाही.

घटस्फोटाची चर्चा

प्रसिद्ध दक्षिणात्य अभिनेत्री समंथा अक्कीनेनी आणि नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्य यांनी 2017मध्ये लग्न केले. दोघेही दक्षिण भारतीय मनोरंजन विश्वाची क्यूट जोडी मानली जाते. परंतु, त्यांचे वैवाहिक आयुष्य चांगले जात नसल्याच्या अनेक बातम्या समोर येत आहेत. नुकतेच दोघांनी विवाह समुपदेशकाची भेटही घेतली होती. यामागे त्यांचा घटस्फोट हेच कारण असल्याचे सांगण्यात येत आहे. असेही म्हटले जाते की, नागा चैतन्य कुटुंब नियोजनाचा विचार करत आहेत आणि त्यासाठी त्यांनी समंथा यांनी काही काळ चित्रपट करणे थांबवावे आणि कुटुंबाला पुढे न्यावे अशी इच्छा आहे.

दुसरीकडे, समंथा तिच्या कारकिर्दीत उत्तम कामगिरी करत आहे आणि या क्षणी ती काम सोडायला तयार नाही आणि आता ज्या प्रकारे तिने नवीन चित्रपट साईन केला आहे, असे दिसते की तिला खरोखरच तिच्या करिअरवर लक्ष केंद्रित करायचे आहे.

हेही वाचा :

‘मी असो वा नसो, सर्वाना मोफत उपचार मिळायला हवेत’, सोनू सूद हैद्राबादमध्ये सुरु करणार रुग्णालय!

‘माझं अजूनही तुझ्यावर प्रेम…’, प्रिया बापट-उमेश कामतच्या क्यूट व्हिडीओवर चाहतेही फिदा!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI