Nana Patekar : नाना गोव्याच्या फ्लॅटमध्ये एकटेच का होते? कोणती गोष्ट नडली?

अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला. गोव्याच्या फ्लॅटमध्ये ते एकटेच होते. मध्यरात्री अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी मित्राला मेसेज केला, पण मदत वेळेवर पोहोचली नाही. त्यांना एकांत आवडत होता, कोणावर अवलंबून राहायचे नव्हते. त्यांची हीच सवय दुर्दैवाने त्यांच्या जीवावर बेतली. शेवटच्या क्षणी त्यांच्यासोबत कोणीच नव्हते.

Nana Patekar : नाना गोव्याच्या फ्लॅटमध्ये एकटेच का होते? कोणती गोष्ट नडली?
nana patekar
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 08, 2026 | 10:55 PM

Nana Patekar Goa Flat : दिग्गज अभिनेता नाना पाटेकर यांच्या निधनानंतर त्यांच्या शेवटच्या काळातील काही गोष्टी समोर येत आहेत. त्यामुळे सर्वच हैराण झाले आहेत. गोव्याच्या डोना पाऊला येथील आपल्या घरात असताना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी अडीच वाजेच्या दरम्यान मित्राला मेसेज केला होात. प्रकृती ठिक नसल्याचं त्यात म्हटलं होतं. पण रात्रीची वेळ असल्याने मित्राने मेसेज पाहिला नाही. पण नंतर संपर्क झाला आणि तोपर्यंत वेळ निघून गेली होती. जे नव्हतं घडायचं तेच घडलं. या दु:खद घटनेनंतर नाना पाटेकर हे गोव्याच्या फ्लॅटमध्ये एकटेच का राहत होते? असा सवाल निर्माण झाला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नाना पाटेकर यांना कुणावर ओझं बनून राहायला आवडतं नव्हतं. त्यांना कुणावर अवलंबून राहायलाही आवडत नव्हतं. ते स्वत:ची कामे स्वत: करायचे. त्यांच्याकडे एक केअर टेकर होता. पण ते त्यालाही पाठवून द्यायचे. त्यांची ही नेहमीची सवय होती. एकांतात राहायला त्यांना आवडायचं. गर्दी, ग्लॅमर आणि लोकांपासून ते दूर राहायचे. आपल्या आपल्या जगात रममाण व्हायला त्यांना आवडायचं. ते गोवा किंवा खडकवासला येथील फार्म हाऊसवर असताना आपली कामं स्वत: करायचे. स्वत: चहा बनवायचे. स्वयंपाक करायचे. पुस्तकं वाचायचे. व्यायाम करायचे. तास न् तास शांत बसून निसर्गात तल्लीन व्हायचे. हा त्यांचा नित्याचाच नियम होता. एकटं राहण्याची सवय त्यांना नडली आणि नको ते झालं. काल शेवटच्या क्षणीही त्यांच्या सोबत कोणी नव्हतं. कुणी असतं तर आज नाना आपल्यात असते.

Loading...

मुलगा कामात व्यस्त

नाना पाटेकर हे पत्नी नीलकांतीपासून अनेक वर्षापासून वेगळं राहत होते. मी एकटाच वेगळा आहे, असं ते एका मुलाखतीत म्हणाले होते. त्यांचा मुलगा मल्हार कधी पुण्यात तर कधी मुंबईत कामानिमित्त असायचा. मल्हार प्रोडक्शनच्या कामात व्यस्त असायचा. नानाचं निधन झालं तेव्हा मल्हार पुण्यात होता. बातमी कळताच ते तातडीने गोव्याला रवाना झाले. मल्हार आणि नाना यांच्यात अतूट नातं होतं. नानाचं मल्हारवर प्रचंड प्रेम होतं. मल्हारबाबत अभिमानही वाटायचा. त्यांनी मल्हारच्या कामात कधीच हस्तक्षेप केला नाही. पूर्ण मोकळीक दिली होती.

नेमकं काय घडलं?

नाना पाटेकर आपल्या गोव्याच्या फ्लॅटमध्ये होते. मध्यरात्री 1 नंतर त्यांना त्रास व्हायला लागला होता. अस्वस्थ वाटत होतं. श्वास घेता येत नव्हता. घाम फुटला होता. त्याही अवस्थेत त्यांनी कशीबशी काढली. नंतर अडीचच्या सुमारास त्यांनी मित्राला मेसेज केला. मात्र, रात्रीची वेळ असल्याने मेसेज उशिरा पोहोचला. पहाटे जेव्हा मित्र नानाच्या घरी आला, तेव्हा नाना बेशुद्ध अवस्थेत पडलेले होते. डॉक्टरांनी त्यांना तपासले. पण त्यांचं शरीर प्रतिसाद देत नव्हतं. त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं. 45 मिनिटं सीपीआर देण्यात आला. पण त्यांचा मृत्यू झालेला होता. रुग्णालयात येण्याच्या एक तास आधीच त्यांचा मृत्यू झाला असावा, असा डॉक्टरांचा अंदाज आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us