
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) सध्या न्यूयॉर्कमध्ये आहे. न्यूयॉर्कमधील विविध फोटो आणि व्हिडीओ प्रियांका आपल्या चाहत्यांसाठी शेअर करते आहे. काही दिवसांपूर्वीच प्रियांकाने न्यूयॉर्क (NewYork) येथील एक फोटो आपल्या लेकीसोबतचा शेअर केला होता. या फोटोमध्ये प्रियांका आणि तिची मुलगी मालती एका खिडकीमध्ये बसल्याचे दिसते होते. आता नुकताच प्रियांकाने एका कार्यक्रमामधील व्हिडीओ (Video) सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओतील एक विशेष बाब म्हणजे प्रियांका न्यूयॉर्कमध्ये चक्क पाणीपुरी खाताना दिसत आहे.
प्रियांकाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दिसते आहे की, ती एका गाडीमध्ये बसून कार्यक्रमामध्ये जाते, तिथे ती मलाला युसुफजईसोबत दिसते. इतकेच नाही तर कार्यक्रमामध्ये प्रियांका पती निक जोनससोबत पाणीपुरी खाते आहे. प्रियांकाने हा खास व्हिडीओ तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केलाय. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. प्रियांका एकदम देशी स्टाईलमध्ये पाणीपुरी खाते आहे.
प्रियांकाने या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये ब्लॅक कलरचा ड्रेस घातल्याचे दिसतय. चाहते प्रियांकाच्या या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात लाईक्स करून कमेंट करताना दिसत आहेत. प्रियांका चोप्रा एका कार्यक्रमात सहभागी झाली होती. या कार्यक्रमासाठी तिने ब्लॅक कलरचा आउटफिट कॅरी केला होता. या ड्रेसमध्ये प्रियांकाचा जबरदस्त असा लूक दिसतोय. प्रियांकाची मुलगी मालती देखील सध्या न्यूयॉर्क आहे.