AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rubina Dilaik | रुबिना दिलैकने पतीसोबत केला योगा, फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल

या फोटोमध्ये अभिवन योगा मॅटवर झोपला आहे आणि रुबिना अभिनवच्या पायावर हात ठेवून दोन्ही पाय हवेत स्थिर करते आहे. हा एक अत्यंत अवघड योगा आहे.

Rubina Dilaik | रुबिना दिलैकने पतीसोबत केला योगा, फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल
| Updated on: Sep 24, 2022 | 9:24 AM
Share

मुंबई : टीव्ही इंडस्ट्रीमधील एक प्रसिध्द नाव म्हणजे रुबिना दिलैक (Rubina Dilaik) आहे. रुबिना दिलैक कायमच तिच्या बिनधास्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहते. रुबिना बिग बाॅसची विजेती आहे. बिग बाॅसच्या घरात असताना आपण पाहिले असेल की, ज्यावेळी एखाद्या गोष्टीमध्ये रुबिनाची काही चूक नसेल आणि सलमान खान (Salman Khan) तिला काही बोलत असेल तर अशावेळी ती सलमान खानचे देखील ऐकून घेत नव्हती. रुबिनाने टीव्ही इंडस्ट्रीमध्ये अनेक हीट मालिकांमध्ये काम केले आहे. मात्र, रुबिनाला खरी ओळख बिग बाॅसच्या (Bigg Boss) घरातूनच मिळालीये. रुबिना आणि तिचा पती अभिनव शुक्ला हे दोघेही बिग बाॅसमध्ये सहभागी झाले होते.

इथे पाहा रुबिनाने शेअर केला फोटो

Rubina

रुबिनाने सोशल मीडियावर शेअर केले योगा करतानाचे फोटो

नुकताच रुबिनाने सोशल मीडियावर दोन खास फोटो शेअर केले आहेत. हे फोटो आता प्रचंड व्हायरल होताना दिसत आहेत. सध्या रुबिना झलक दिखालाजा सीजन 10 मध्ये सहभागी झालीये. यापूर्वी खतरो के खिलाडी या शोमध्ये रुबिना दिसली होती. नुकतेच रुबिनाने इंस्टाग्रामवर पती अभिनव शुक्लासोबतचे दोन फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये रुबिना योगा करताना दिसत आहे. हा फोटो रुबिनाच्या चाहत्यांना प्रचंड आवडलाय.

सोशल मीडियावर रुबिना सक्रिय

या फोटोमध्ये अभिनव योगा मॅटवर झोपला आहे आणि रुबिना अभिनवच्या पायावर हात ठेवून दोन्ही पाय हवेत स्थिर करते आहे. हा एक अत्यंत अवघड योगा आहे. स्वत: ला फिट ठेवण्यासाठी रुबिना कायमच व्यायाम करताना दिसते. बऱ्याच वेळा रुबिना जिममध्ये व्यायाम करत असतानाचे फोटो आणि व्हिडीओ आपल्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर करते. रुबिनाचा हा योगा करतानाचा फोटो आता सोशल मीडियावर चांगला व्हायरल होताना दिसतोय.

Follow Us
महाडमध्ये अवकाळी पावसाचा कहर; वादळी वाऱ्यामुळे मालमत्तेचं नुकसान
महाडमध्ये अवकाळी पावसाचा कहर; वादळी वाऱ्यामुळे मालमत्तेचं नुकसान.
खरातला मदत करणाऱ्या डॉक्टरांचं काही खरं नाही, गर्भपातासाठी...
खरातला मदत करणाऱ्या डॉक्टरांचं काही खरं नाही, गर्भपातासाठी....
पुरोगामी महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील घुसखोर कोण?
पुरोगामी महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील घुसखोर कोण?.
तुम्ही टुकार माणूस आहात... मराठी सक्तीवरून मनसे आणि शिंदे गटात जुंपली
तुम्ही टुकार माणूस आहात... मराठी सक्तीवरून मनसे आणि शिंदे गटात जुंपली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कोलकात्यातील हुगळी नदीत नौकविहार, व्हायरल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कोलकात्यातील हुगळी नदीत नौकविहार, व्हायरल.
मविआकडून उद्धव ठाकरेंना विधानपरिषदेची ऑफर?; संजय राऊत स्पष्टच बोलले
मविआकडून उद्धव ठाकरेंना विधानपरिषदेची ऑफर?; संजय राऊत स्पष्टच बोलले.
नागपूरमध्ये पोलिसांची अचानक धाड, लॅपटॉप, वाय-फाय जप्त, नेमकं काय घडलं?
नागपूरमध्ये पोलिसांची अचानक धाड, लॅपटॉप, वाय-फाय जप्त, नेमकं काय घडलं?.
मराठी सक्तीवर थेट बाळासाहेबांचा दाखला, राऊतांनी शिंदे गटाला घेरलं, म्ह
मराठी सक्तीवर थेट बाळासाहेबांचा दाखला, राऊतांनी शिंदे गटाला घेरलं, म्ह.
धमकी देणाऱ्या भैय्यांना धडा शिकवण्याची हीच वेळ, मनसेचा खरमरीत दम
धमकी देणाऱ्या भैय्यांना धडा शिकवण्याची हीच वेळ, मनसेचा खरमरीत दम.
भाजपच्या मोर्चात राडा करणाऱ्या महिलेविरोधात सदावर्तेची मुलगी मैदानात
भाजपच्या मोर्चात राडा करणाऱ्या महिलेविरोधात सदावर्तेची मुलगी मैदानात.