83 The Film | रणवीर सिंह नाही तर कपिल देव यांच्या भुमिकेसाठी दुसऱ्याच अभिनेत्याला होती पसंती!

| Updated on: Dec 24, 2021 | 2:20 PM

रणवीर सिंहचा (Ranveer Singh) स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट '83'  (83 The Movie) थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. या चित्रपटात रणवीर कपिल देव यांची, तर दीपिका पदुकोण त्यांच्या पत्नी रोमी देवची भूमिका साकारत आहे. 1983 मध्ये भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकल्याची कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे.

83 The Film | रणवीर सिंह नाही तर कपिल देव यांच्या भुमिकेसाठी दुसऱ्याच अभिनेत्याला होती पसंती!
Ranveer Singh
Follow us on

मुंबई : रणवीर सिंहचा (Ranveer Singh) स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट ’83’  (83 The Movie) थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. या चित्रपटात रणवीर कपिल देव यांची, तर दीपिका पदुकोण त्यांच्या पत्नी रोमी देवची भूमिका साकारत आहे. 1983 मध्ये भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकल्याची कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे.

‘थलायवी’ निर्माते विष्णुवर्धन इंदुरी यांनी आठ वर्षांपूर्वी या विषयावर चित्रपट बनवण्याचा विचार केला होता आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते लेखक-दिग्दर्शक संजय पूरण सिंग चौहान यांच्यासोबत चित्रपटाची कथा लिहिली होती, हे फार कमी लोकांना माहीत आहे. इतकंच नाही तर, स्क्रिप्ट आधी रणवीर सिंहकडे नाही तर, त्याचा मित्र अर्जुन कपूरकडे गेली होती.

कपिल देव यांच्या भूमिकेसाठी रणवीर नव्हता पहिली पसंती!

‘83’ या चित्रपटासाठी रणवीर नाही तर अर्जुन कपूर पहिली पसंती होता. विष्णुवर्धन आणि संजय एकत्र चित्रपट दिग्दर्शित करत होते, तेव्हा अर्जुन कपूरला कपिल देव यांच्या भूमिकेसाठी त्यांची पहिली पसंती होती. 2014मध्ये या प्रोजेक्टची घोषणा झाली होती, पण 2017 मध्ये त्यांना प्रोजेक्टमधून काढून टाकल्यानंतर दिग्दर्शक कबीर खान आले. विष्णू नंतर विक्रमादित्य मोटवानी, मधु मंटेना आणि विकास बहल आणि रिलायन्स एंटरटेनमेंट निर्माता म्हणून आले, तर साजिद नाडियादवाला आणि दीपिका पदुकोण खूप नंतर यात एन्टर झाले.

संजयने स्क्रिप्ट लिहिल्यानंतर, त्याने आणि विष्णूने अर्जुन कपूरशी संपर्क साधला, ज्याला पटकथा आवडली होती, परंतु आदित्य चोप्राने सह-निर्मिती करावी अशी त्यांची इच्छा होती. आदित्यला ते इतकं आवडलं की, त्याला स्क्रिप्ट एकट्याने विकत घ्यायची होती, पण संजयला स्वतः दिग्दर्शन करायचं होतं आणि त्याने अर्जुनसोबत काही लुक टेस्टही केल्या होत्या.

मात्र, अर्जुनने विक्रमादित्य, मधू आणि विकास त्याचे जवळचे असल्याने त्यांची निवड केली. तो संजयला त्याच्या ऑफिसमध्ये फोन करत राहिला पण स्क्रिप्टवर कधीच चर्चा केली नाही. तेव्हाच या तिघांनी आणि रिलायन्स एंटरटेनमेंटने एका कार्यक्रमात ‘83’ची अधिकृत घोषणा केली. संजयला एका मित्रामार्फत कळले की, त्याला प्रोजेक्टमधून वगळण्यात आले आहे आणि कबीर खानला रणवीर-दीपिकाला या प्रोजेक्टसाठी घ्यायचे होते. त्याचवेळी अर्जुनने क्रिकेटची तयारी सुरू केली होती, पण नंतर रणवीरला हा प्रोजेक्ट मिळाला आणि त्याने मित्राशी सल्लामसलत करून चित्रपट साईन केला.

हेही वाचा :

हवाई सफारीमध्ये हरवून जा भारतीय संगितात, विमानतळावरही ऐकू येईल अभिजात भारतीय संगीत!

शिवराज अष्टकातील तिसरं पान उलगडणार बाजीप्रभूंचा इतिहास! ‘पावनखिंड’ मध्ये पुन्हा चिन्मय शिवरायरूपात!

Today Release Films | शुक्रवार ठरणार मनोरंजनाचा वार! रणवीरच्या ‘83’पासून ते साराच्या ‘अतरंगी रे’पर्यंत अनेक चित्रपट-सीरीज प्रेक्षकांच्या भेटीला!

Happy Birthday Anil Kapoor | एकेकाळी गॅरेजमध्ये राहून काढले दिवस, आता जगाच्या कानाकोपऱ्यातील आलिशान बंगल्यांचा मालक अनिल कपूर!