Happy Birthday Anil Kapoor | एकेकाळी गॅरेजमध्ये राहून काढले दिवस, आता जगाच्या कानाकोपऱ्यातील आलिशान बंगल्यांचा मालक अनिल कपूर!  

अनिल कपूर (Anil Kapoor) हा हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आणि निर्माता आहे. आज अनिल कपूर त्यांचा 65वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्याला पाहून तो 65 वर्षांचा असल्याची कल्पनाही येणार नाही. अनिलने 90च्या दशकात सलग 13 हिट चित्रपट दिले आहेत.

Happy Birthday Anil Kapoor | एकेकाळी गॅरेजमध्ये राहून काढले दिवस, आता जगाच्या कानाकोपऱ्यातील आलिशान बंगल्यांचा मालक अनिल कपूर!  
Anil Kapoor
Follow us
| Updated on: Dec 24, 2021 | 8:45 AM

मुंबई : अनिल कपूर (Anil Kapoor) हा हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आणि निर्माता आहे. आज अनिल कपूर त्यांचा 65वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्याला पाहून तो 65 वर्षांचा असल्याची कल्पनाही येणार नाही. अनिलने 90च्या दशकात सलग 13 हिट चित्रपट दिले आहेत. अनिल कपूर केवळ त्याच्या व्यक्तिमत्त्वासाठी ओळखला जात नाही, तर तो त्याच्या शाही जीवनशैलीमुळेही चर्चेत असतो. पण तुम्हाला माहीत आहे का की, एकेकाळी त्याला गॅरेजमध्येही राहावे लागले होते.

वास्तविक, अनिल कपूर यांना सुरुवातीला आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले होते आणि पैशांच्या कमतरतेमुळे त्यांना राज कपूर यांच्या गॅरेजमध्ये राहावे लागले. आता अनिल कपूर आपल्या कुटुंबासोबत मुंबईत जुहू येथील बंगल्यात राहतो. पण, तुम्हाला माहित आहे का की, अनिल कपूर व्यतिरिक्त दुबई, कॅलिफोर्निया आणि लंडनमध्येही फ्लॅट आहेत…

मुंबई

अनिल कपूर मुंबईतील जुहू भागात राहतो. येथे त्याचा बंगला आहे, जो अतिशय आलिशान आहे. या बंगल्यात अनिल कपूर पत्नी सुनीता कपूर, मुलगी रिया कपूर आणि मुलगा हर्षवर्धन कपूरसोबत राहतो. या घराचा लूक अतिशय सुंदर आणि आलिशान आहे. घराच्या दिवाणखान्याला पारंपरिक लूक देण्यात आला आहे. याशिवाय अनिल कपूरच्या या बंगल्यात एक वेगळी मूव्ही रूम बनवण्यात आली आहे. जिथे तुम्ही आरामात बसून चित्रपट पाहू शकता. सिनेमाच्या खोलीशिवाय घरात एक वेगळा ड्रेसिंग रूमही बनवण्यात आला आहे, जिथून रिया सोनम आणि हर्षवर्धनचे फोटोही समोर आले आहेत. घरातील सर्व मुलांच्या खोल्याही त्यांच्या आवडीनुसार बनवलेल्या आहेत.

कॅलिफोर्निया

अनिल यांचा मुलगा हर्षवर्धन कॅलिफोर्नियाला शिक्षणासाठी गेला होता. दरम्यान, अनिलने आपल्या मुलासाठी ऑरेंज काउंटी, कॅलिफोर्नियामध्ये 3BHK अपार्टमेंट घेतला होता. या 3BHK अपार्टमेंटमध्ये मागच्या अंगणात बीच आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार या अपार्टमेंटची किंमत 10 लाख डॉलर्सपेक्षा जास्त आहे.

लंडन

अनिल कपूरचेही लंडनमध्ये घर आहे. अनिल कपूर अनेकदा लंडनच्या मेफेअर अपार्टमेंटमध्ये वेळ घालवताना दिसतो. केवळ अनिलच नाही, तर त्याचा मुलगा हर्षवर्धन कपूरही येथे वेळ घालवताना दिसत आहे. अनिल कपूरला हे घर खूप आवडतं, हे घर त्यांना जुन्या जगाचा भाग वाटतं.

दुबई

दुबई हे अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींचे घर आहे. अनिल कपूरचा हा 2 BHK फ्लॅट त्याने ’24’ च्या शूटिंगदरम्यान दुबईत खरेदी केला होता. अनिलचा हा फ्लॅट डिस्कव्हरी गार्डनजवळ अल फुरजानमध्ये आहे. एका मुलाखतीदरम्यान अनिल कपूरने सांगितले होते की, हे अपार्टमेंट अतिशय स्वस्त आणि चांगल्या ठिकाणी बनवलेले आहे. जे त्याला खूप आवडते.

हेही वाचा :

Happy Birthday Ravi Dubey | मालिकेच्या सेटवर भेट झाली अन् अभिनेत्रीच्या प्रेमातच पडला! वाचा रवी दुबेची लव्हस्टोरी…

Ganapath | अरे देवा! टायगरच्या डोळ्याला काय झालं? ‘गणपत’च्या चित्रिकरणादरम्यान टायगर श्रॉफ जखमी!

चाहत्याच्या लग्नात चक्क सेलिब्रिटींची एण्ट्री, ‘ओम आणि स्वीटू’ जोडीने विवाह सोहळ्याचा आनंद दुणावला!

Non Stop LIVE Update
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.