Nupur Sharma controversy: गौतम गंभीरकडून नुपूर शर्मा यांचं समर्थन; भडकलेली स्वरा भास्कर म्हणाली..

नुपूर शर्मा यांच्या वादग्रस्त विधानानंतर भारतातील अनेक शहरांमध्ये निदर्शनं झाली आणि काही ठिकाणी त्यांचे पुतळेसुद्धा जाळण्यात आले. एवढंच नाही तर त्यांना जीवे मारण्याच्या धमक्याही आल्या आहेत.

Nupur Sharma controversy: गौतम गंभीरकडून नुपूर शर्मा यांचं समर्थन; भडकलेली स्वरा भास्कर म्हणाली..
Gautam Gambhir and Swara Bhasker
Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Jun 14, 2022 | 11:24 AM

भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याविषयी केलेल्या अवमानकारक टिप्पणीचे पडसाद अजूनही उमटत आहेत. क्रिकेटमधील दिग्गज खेळाडू गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि इरफान पठाण यांनीसुद्धा या विषयावरून ट्विट केलं. नुपूर शर्मा यांच्या वादग्रस्त विधानानंतर भारतातील अनेक शहरांमध्ये निदर्शनं झाली आणि काही ठिकाणी त्यांचे पुतळेसुद्धा जाळण्यात आले. एवढंच नाही तर त्यांना जीवे मारण्याच्या धमक्याही आल्या आहेत. काही आखाती राष्ट्रांनी या वादग्रस्त वक्तव्याविरोधात संताप व्यक्त केला आहे. नुपूर यांना पाठिंबा देत नुकतंच गौतम गंभीरने एक ट्विट केलं. या ट्विटवर पोस्ट लिहित अभिनेत्री स्वरा भास्करने (Swara Bhasker) त्यावर टीका केली आहे. स्वराची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

गौतम गंभीरचं ट्विट-

‘माफी मागूनही त्या महिलेविरोधात देशभरात द्वेषाचं भयंकर प्रदर्शन होत आहे आणि त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. हे सर्व घडत असताना तथाकथित ‘सेक्युलर लिबरल्स’ने (धर्मनिरपेक्ष उदारमतवादी) बाळगलेलं मौन चीड आणणारं आहे,’ असं ट्विट गौतम गंभीरने केलं.

पहा ट्विट-

सोशल मीडियावर बिनधास्त मतं व्यक्त करणारी अभिनेत्री स्वरा भास्कर गंभीरच्या या ट्विटवर व्यक्त झाली. ‘सेक्युलर लिबरल्स’ या विधानावरून तिने टीका केली आहे. गौतम गंभीरचं ट्विट शेअर करत स्वराने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये लिहिलं, ‘इनको बुलडोजर की आवाज नहीं सुनाई पड रही लेकीन’ (यांना मात्र बुलडोजरचा आवाज ऐकू येत नाहीये).’

स्वराची पोस्ट-

नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याचा निषेध सुरूच

टीव्हीवरील चर्चेदरम्यान नुपूर शर्मा यांनी केलेल्या कथित आक्षेपार्ह विधानाला अनेक मुस्लिम संघटनांनी विरोध केला होता. हा वाद चिघळू नये, या विचाराने भाजपने शर्मा यांना पक्षातून निलंबित केलं होतं. मात्र, असं असतानाही शर्मा यांच्याविरोधात देशातील अनेक शहरांमध्ये निदर्शने सुरू आहेत. काही अतिरेक्यांनी त्यांना जीवे मारण्याची धमकीही दिली आहे.