Nyay : The Justice | सुशांत सिंह राजपूत यांच्या वडिलांना धक्का, दिल्ली उच्च न्यायालयाने सुचवला नवीन मार्ग

| Updated on: Jul 15, 2021 | 12:43 PM

दिल्ली उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या वडिलांना धक्का दिला आहे. ‘न्याय : द जस्टिस’ या चित्रपटाविरोधात कडक कारवाई करण्याऐवजी हायकोर्टाने सुशांतचे वडील केके सिंह यांना चित्रपटाच्या निर्मात्यांशी चर्चेद्वारे हे प्रकरण मिटवण्यास सांगितले आहे.

Nyay : The Justice | सुशांत सिंह राजपूत यांच्या वडिलांना धक्का, दिल्ली उच्च न्यायालयाने सुचवला नवीन मार्ग
सुशांत सिंह राजपूत
Follow us on

मुंबई : दिल्ली उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या वडिलांना धक्का दिला आहे. ‘न्याय : द जस्टिस’ या चित्रपटाविरोधात कडक कारवाई करण्याऐवजी हायकोर्टाने सुशांतचे वडील केके सिंह यांना चित्रपटाच्या निर्मात्यांशी चर्चेद्वारे हे प्रकरण मिटवण्यास सांगितले आहे.

सुशांतच्या वडिलांच्या या चित्रपटावर बंदी घालण्याच्या याचिकेवरवर कोणतीही कारवाई करण्यास नकार देऊन हायकोर्टाने सुशांतच्या लाखो चाहत्यांची मने मोडली आहेत. दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाचे अध्यक्ष असलेले न्यायमूर्ती राजीव म्हणाले की, ही बाब कोर्टाबाहेरच्या चर्चेतून देखील सुटू शकते. कोर्टाचा हा प्रस्ताव दोन्ही बाजूंच्या वकिलांनी मान्य केला. आता चर्चेच्या माध्यमातून सुशांतच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार, ते या चित्रपटाची कहाणी बदलतील किंवा यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल.

बर्‍याचवेळा झाली सुनावणी

मागील सुनावणीत दिल्ली हायकोर्टाने सुशांत सिंह राजपूत याच्या जीवनावर आधारित ‘न्याय: द जस्टिस’ हा चित्रपट पूर्व नियोजित तारखेनुसार 11 जून रोजी प्रदर्शित झाला आहे की, नाही हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यापूर्वी चित्रपटाचे दिग्दर्शक आणि अभिनेत्याच्या वडिलांनी यासंदर्भात परस्पर विरोधी विधाने केली होती. न्यायाधीशांनी सुशांतच्या जीवनावर आधारित चित्रपटाच्या प्रदर्शनावर किंवा चित्रपटातील त्याचे नाव किंवा तत्सम कुठलीही भूमिका दाखवण्यावर रोख लावण्यास मनाई केली होती. यानंतर राजपूतचे वडील कृष्णा किशोर सिंह यांनी या निर्णयाला आव्हान देत अपील दाखल केले होते.

न्यायमूर्ती अनूप जयराम भांभणी आणि न्यायमूर्ती जसमीत सिंह यांच्या खंडपीठाने सुरुवातीला 11 जून रोजी ठरलेल्या तारखेला हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे का, असा सवाल केला. खंडपीठ म्हणाले, हा चित्रपट प्रदर्शित झाला की नाही, यावर बरेच काही अवलंबून आहे. जर चित्रपट प्रदर्शित झाला नाही, तर कोर्ट आता या सुनावणीचा विचार करू शकेल. खंडपीठ पुढे म्हणाले की, ‘जर चित्रपट प्रदर्शित झाला असेल, तर तो पुन्हा थांबवला जाऊ शकतो का?’

चित्रपटाच्या रिलीजबाबत सस्पेन्स कायम

सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांच्या बाजूने असलेले ज्येष्ठ वकील जयंत मेहता म्हणाले की, हा चित्रपट अद्याप प्रदर्शित झाला नाही. परंतु, चित्रपटाच्या दिग्दर्शकाची बाजू घेत असलेले ज्येष्ठ वकील चंदर लाल म्हणाले की, त्यांची माहिती याउलट आहे. ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनी या प्रकरणाचे प्रतिनिधित्व केले. या प्रकरणाची पुढील सुनावणी करण्यापूर्वी, त्याच्या वडिलांनी या घटनेची पुष्टी करावी अशी सूचना केली होती.

चित्रपटावर बंदी घालण्यास नकार

10 जून रोजी राजपूत यांच्या जीवनावर आधारित चित्रपटांच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यास नकार दिला होता. कोर्टाने म्हटले होते की, चित्रपटाला बायोपिक म्हटले जात नाहीय किंवा त्याच्या जीवनात काय घडले याची वास्तविक माहिती यात नाही. सुनावणीदरम्यान जयंत मेहता म्हणाले की, ‘ही समस्या केवळ चित्रपटाच्या प्रदर्शनाची नसून एकट्या न्यायाधीशांच्या खंडपीठाने ज्या पद्धतीने आदेश पारित केला त्याचीही आहे’. ते म्हणाले की, हा चित्रपट गोपनीयतेच्या अधिकाराचे उल्लंघन करत अभिनेत्याच्या प्रतिष्ठेला हानी पोहचवत आहे.

(Nyay The Justice film case Delhi High Court Refuses To Stop Circulation Of Film Based On Sushant Singh Rajput)

हेही वाचा :

रणरागिणीची यशोगाथा उलगडणाऱ्या ‘स्वराज्यजननी जिजामाता’चा 500 भागांचा सुवर्ण टप्पा!

Dishul Wedding : लग्नाच्या विधींना सुरुवात, पाहा राहुल आणि दिशा परमारच्या मेहंदीचे सुंदर फोटो