Ram Gopal Varma on RRR : राम गोपाल वर्मांनी Omocron आणि RRRच्या रिलीजविषयी दिली प्रतिक्रिया, सरकारला केली ‘ही’ विनंती

| Updated on: Dec 26, 2021 | 3:55 PM

बॉलिवूड (Bollywood) चित्रपट निर्माता राम गोपाल वर्मा (Ram Gopal Varma) यांनी बहुप्रतिक्षित चित्रपट RRRच्या रिलीजच्या तारखेशी संबंधित देशात ओमिक्रॉन(Omocron)च्या नवीन प्रकाराच्या वाढत्या प्रकरणांवर आपली प्रतिक्रिया दिलीय.

Ram Gopal Varma on RRR : राम गोपाल वर्मांनी Omocron आणि RRRच्या रिलीजविषयी दिली प्रतिक्रिया, सरकारला केली ही विनंती
राम गोपाल वर्मा
Follow us on

मुंबई : बॉलिवूड (Bollywood) चित्रपट निर्माता राम गोपाल वर्मा (Ram Gopal Varma) त्यांच्या चित्रपटांमुळे आणि त्यांच्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. आता त्यांनी बहुप्रतिक्षित चित्रपट RRRच्या रिलीजच्या तारखेशी संबंधित देशात ओमिक्रॉन(Omocron)च्या नवीन प्रकाराच्या वाढत्या प्रकरणांवर आपली प्रतिक्रिया दिलीय. यासोबतच सरकारला विनंतीही केलीय.

डोस घेतलेल्यांना…’
राम गोपाल वर्मा यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर पोस्ट शेअर केलीय. त्यात म्हटलंय, की माझ्याकडे Omicronबद्दल सरकारसाठी एक चांगली कल्पना आहे. कोरोनाचे दोन्ही डोस घेतलेल्या कोणत्याही प्रेक्षकाला त्यांनी थिएटरमध्ये जाऊ द्यावे आणि RRR पाहू द्यावा. ‘आरआरआर पाहण्याची लोकांची इच्छा निष्काळजीपणावर विजय मिळवण्यास मदत करेल.

युझर्सच्या प्रतिक्रिया
त्यांच्या या ट्विटवर युझर्स संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत. एका युझरनं लिहिलं, की मला पहिल्यांदा तुमचा मुद्दा समजला. मला आशा आहे की सर्व राज्य सरकारं केवळ चित्रपटांसाठीच नाही तर मॉल्स आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्येही याचं पालन करतील.

ब्रिटिशांविरुद्धचं युद्ध
नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. यामध्ये ज्युनियर एनटीआर आणि राम चरण तेजची धमाकेदार स्टाइल पाहायला मिळतेय. ट्रेलरमध्ये दोघंही ब्रिटीश राजवटीविरुद्धचं युद्ध चांगल्याप्रकारे पार पाडताना दिसत आहेत.

7 जानेवारीला होणार रिलीज
RRR हा दोन तेलुगू स्वातंत्र्यसैनिक अल्लुरी सीता रामा राजू आणि कोमाराम भीम यांच्यावर आधारित चित्रपट आहे. साऊथचा सुपरस्टार ज्युनियर एनटीआर आणि राम चरण तेज यांच्यासह बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टदेखील या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. बाहुबली दिग्दर्शक एसएस राजामौली यांनी याचं दिग्दर्शन केलं असून हा संपूर्ण चित्रपट DVV एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली तयार करण्यात आलाय. तर 7 जानेवारी 2022ला सिनेमा चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.

Salman Khan : सापाला पाहून सलमानला फुटला घाम! मदत करा म्हणून फोनवर जोरजोरात ओरडला; वाचा मध्यरात्री काय घडलं?

Sushmita Sen : रोहमन शॉलसोबतच्या ब्रेक-अपनंतर सुष्मिता सेननं शेअर केली पोस्ट; म्हणाली, खुश राहण्यासाठी…

Bigg Boss Marathi 3 Contestants : कोण होणार बिग बॉस मराठी सीझन 3चा विजेता? एलिमिनेट झालेली मीरा म्हणाली होती…