रवीना टंडन’च्या निशाण्यावर आमिर आणि सलमान खान, म्हणाली इंडस्ट्रीत भेदभाव…

| Updated on: Nov 12, 2022 | 12:11 PM

मत मांडायचे असेल तर ती अजिबात मागे पुढे न बघता थेट बोलते. यावेळी रवीनाने बाॅलिवूडमधील एका महत्वाच्या गोष्टीला आरसा दाखवला आहे.

रवीना टंडनच्या निशाण्यावर आमिर आणि सलमान खान, म्हणाली इंडस्ट्रीत भेदभाव...
Follow us on

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन तिच्या बिनधास्त वक्तव्यांमुळे ओळखली जाते. रवीनाला जर एखाद्या मुद्दावर आपले मत मांडायचे असेल तर ती अजिबात मागे पुढे न बघता थेट बोलते. यावेळी रवीनाने बाॅलिवूडमधील एका महत्वाच्या गोष्टीला आरसा दाखवला आहे. अभिनेते आणि अभिनेत्रींमध्ये कशाप्रकारे भेदभाव केला जातो, हे रवीनाने सांगितले. इतकेच नाही तर तिने काही उदाहरण देऊन फरक समोर आणण्याचा प्रयत्न केला. आता रवीना यामुळेच चर्चेत आलीये.

रवीना टंडन एका कार्यक्रमात बोलताना म्हणाली की, मी माध्यमांना विचारू इच्छीत आहे की, अभिनेता आणि अभिनेत्रींमध्ये काय फरक आहे. ज्यावेळी आमिर खान किंवा सलमान खान दोन ते तीन वर्षांनी चित्रपट घेऊन येतात. त्यावेळी तुम्ही कधीच त्यांना कमबॅक केले म्हणत नाहीत. किंवा 90 चा दशकातील अभिनेते आमिर खान असेही म्हणत नाहीत.

आम्ही पण सतत काम करत आहोत. 90 चा दशकातील अभिनेत्री माधुरी दीक्षित असेही अनेकदा म्हटले जाते, परंतू माधूरी दीक्षित सतत काम करते. मग 90 च्या दशकातील हा टॅग आम्हाला का लावला जातो? विशेष म्हणजे हे सर्व कधीच संजय दत्त किंवा सलमान खानबद्दल बोलले जात नाही. फक्त अभिनेत्रींनाच हा टॅग का लावला जातोय?

रवीना टंडनने या विषयावर बोलून अत्यंत ज्वलंत प्रश्नावर हात घातला आणि आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. गेल्या काही दिवसांपासून अभिनेते आणि अभिनेत्री सारखेच काम करत असताना अभिनेत्यापेक्षा कमी पैसे अभिनेत्रींना दिले जातात. यावर अनेक अभिनेत्री पुढे येऊन बोलत आहेत.