AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पहिल्या पतीने केली मारहाण, दोनदा झाले प्रेम, तिसऱ्याने केला बलात्कार, वाचा अभिनेत्री जीनत अमान हिची लव्ह स्टोरी

जीनत अमान हिने बाॅलिवूडमध्ये एक काळ प्रचंड गाजवला आहे. इतकेच नाहीतर जेंव्हा ती संजय खान यांच्या प्रेमात पडली होती, तेंव्हा ती करिअरमध्ये अत्यंत महत्वाच्या टप्प्यात होती.

पहिल्या पतीने केली मारहाण, दोनदा झाले प्रेम, तिसऱ्याने केला बलात्कार, वाचा अभिनेत्री जीनत अमान हिची लव्ह स्टोरी
| Updated on: Jan 22, 2023 | 10:04 PM
Share

मुंबई : बाॅलिवूडमधील अनेक किस्से आपल्याला कायमच ऐकायला भेटतात. यापैकी एक म्हणजे अभिनेता संजय खान आणि जीनत अमान (Zeenat Aman) यांची लव्ह स्टोरी. संजय खान हे तीन मुलांचे वडील असताना देखील बाॅलिवूडमधील प्रसिध्द अभिनेत्री जीनत अमान ही त्यांच्या प्रेमात पडली होती. जीनत अमान हिच्यासाठी संजय खान यांनी आपल्या पत्नीला सोडून जीनत अमान हिच्यासोबत राहण्यास सुरूवात केली होती. अशी एक चर्चा होती की, जीनत आणि संजय खान यांनी लग्न केले होते. लग्नानंतर अनेकदा संजय खान यांनी जीनत अमान हिला मारहाण केली. जीनत अमान हिने बाॅलिवूडमध्ये एक काळ प्रचंड गाजवला आहे. इतकेच नाहीतर जेंव्हा ती संजय खान यांच्या प्रेमात पडली होती, तेंव्हा ती करिअरमध्ये अत्यंत महत्वाच्या टप्प्यात होती. परंतू संजय खानवर प्रेम करणे तिला अत्यंत महागात पडले होते.

एकदा लोणावळ्यात चित्रपटाची शूटिंग सुरू असताना जीनत अमान अचानक मुंबईमध्ये परत आली. तेंव्हा तिला समजले की, संजय खान हा त्यांच्या एक्स पत्नीसोबत आणि काही मित्रांसोबत ताज हाॅटेलमध्ये पार्टी करत आहे. मग जीनत अमान हिने थेट हाॅटेल गाठले.

संजय खान आणि त्यांच्या पत्नीला जीनत अमान हिला पाहून मोठा धक्का बसला. त्यानंतर जीनत अमान हिला हाॅटेलच्या एका रूममध्ये संजय खान याने बोलावले. त्याच रूममध्ये त्याची एक्स पत्नी देखील होती.

यावेळी संजय खान याने जीनत अमान हिला मारहाण केली. इतकेच नाहीतर रूममधून रडण्याचे आवाज देखील येत होते. त्यानंतर हाॅटेलच्या कर्मचाऱ्यांनी तिला दवाखान्यामध्ये नेले, त्यावेळी तिच्या अंगावर रक्त दिसत होते.

संजय खान याने केलेल्या मारहाणीनंतर काही दिवस जीनत अमान हिला दवाखान्यात राहून उपचार घेण्याची वेळ आली होती. त्यानंतर जीनत अमान हिने प्रोड्यूसर मजहर खान यांच्यासोबत लग्न केले.

मजहर खान याच्या निधनानंतर जीनत अमान हिने तिसऱ्यांदा अमन खन्ना उर्फ सरफराज जफर अहसन याच्यासोबत लग्न केले. मात्र, जीनत अमान हिने जेंव्हा अमन खन्ना याच्यासोबत लग्न केले तेंव्हा ती 59 वर्षांची होती. हे लग्न तिने २०१२ मध्ये केले.

अमन खन्ना याच्यासोबतचे लग्न जीनत अमान हिचे फार काळ टिकू शकले नाही. जीनत अमान हिने अमन खन्ना यांच्यावर अनेक गंभीर आरोप करत बलात्काराचा आरोपही केली होता. लग्नाच्या वेळी अमन खन्ना फक्त ३३ वर्षाचा होता.

Follow Us
मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचे आगमन, छगन भुजबळांनी घेतले अंजी
Ganpati Bappa Morya | मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचे आगमन, छगन भुजबळांनी घेतले अंजीरवाडी मंडळात दर्शन
गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील ...
Sanjay Raut | गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील हुकूमशाही...
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली..
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली बाप्पांची मूर्ती
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव...
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव शंकर थीम ठरतेय आकर्षण
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश,
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश, ट्वीट करत दिल्या शुभेच्छा
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...