काय सांगता? एकीकडे टोकाचा विरोध तर दुसरीकडं एकट्याच पट्ट्यानं ‘पठाण’साठी अख्खं थिएटरच केलंय बुक…

शितल मुंडे, Tv9 मराठी

Updated on: Jan 22, 2023 | 9:14 PM

२०२३ हे वर्ष शाहरुख खान याच्यासाठी अत्यंत खास आहे. कारण या वर्षामध्ये शाहरुख खान याचे तब्बल तीन मोठ्या बजेटचे चित्रपट हे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

काय सांगता? एकीकडे टोकाचा विरोध तर दुसरीकडं एकट्याच पट्ट्यानं 'पठाण'साठी अख्खं थिएटरच केलंय बुक...

सांगली शंकर देवकुळे : गेल्या काही दिवसांपासून शाहरुख खान (Shah Rukh Khan) हा त्याच्या पठाण या चित्रपटामुळे चर्चेत आहे. पठाण चित्रपटाच्या माध्यमातून शाहरुख खान हा तब्बल चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करतोय. २०२३ हे वर्ष शाहरुख खान याच्यासाठी अत्यंत खास आहे. कारण या वर्षामध्ये शाहरुख खान याचे तब्बल तीन मोठ्या बजेटचे चित्रपट हे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. पठाण चित्रपटामुळे (Movie) गेल्या काही दिवसांपासून शाहरुख खान हा चाहत्यांच्या संपर्कात राहतोय. इतकेच नाहीतर सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांच्या प्रश्नाची उत्तरे देताना देखील शाहरुख खान दिसत आहे. शाहरुख खान याच्या वाढदिवसाच्या दिवशी देखील चाहत्यांनी त्याच्या घराबाहेर मोठी गर्दी केली होती.

चाहते आपल्या आवडत्या स्टारसाठी काहीही करू शकतात. हे आपण सर्वांनी यापूर्वी अनेकदा ऐकले असेल. परंतू शाहरुख खान याच्या सांगलीमधील एका चाहत्याने शाहरुख खान याच्यासाठी चक्क पठाण चित्रपटासाठी अख्खे थिएटरच बुक केले आहे.

होय…तुम्ही अगदी खरे ऐकले आहे. सांगलीच्या एसआरके युविव्हर्स या फॅन क्लबनं 25 जानेवारीचा सकाळी 9.30 च्या संपूर्ण शोची तब्बल 110 तिकीट बुक केली आहेत. इतकेच नाहीतर याबाबतची एक पोस्टही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलीये.

एसआरके (SRK) वासिम या ट्विटर अकाऊंटवरुन एक ट्विटही याबाबतीत शेअर करण्यात आले आहे. ज्याला चक्क शाहरुख खान याने रिप्लाय देत “थँक्यू आणि तुम्हाला हा चित्रपट आवडेल, अशी आशा बाळगतो” असे म्हटले आहे.

Parhaan

आता सोशल मीडियावर हे ट्विट तुफान व्हायरल होताना दिसत आहे. पठाण चित्रपटातील बेशर्म रंग हे गाणे रिलीज झाल्यापासून मोठा वाद सुरू असून अनेकांनी चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मोहीम सुरू केलीये.

बेशर्म रंग या गाण्यामध्ये दीपिका पादुकोण हिने भगव्या रंगाची बिकिनी घातल्याने वाद सुरू आहे. इतकेच नाहीतर यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केलीये. सोशल मीडियावर सतत बॉयकॉट पठाणचा ट्रेंड सुरू आहे.

हे सर्व सुरू असतानाच सांगलीमध्ये पठाण चित्रपटाचा अख्खा शो बुक करण्यात आलाय. शाहरुख खान याच्या पठाण चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा चाहत्यांना आहेत. हा चित्रपट २५ जानेवारी रोजी रिलीज होतोय.

अनेक राजकीय लोकांनी देखील पठाण चित्रपटाचा विरोध केला होता. हिंदू लोकांच्या भावना दुखवण्याचे काम बेशर्म रंग गाण्यामधून करण्यात आल्याचा आरोप केला जातोय. आता चित्रपट काय धमाका करतो हे २५ तारखेला कळेल.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI