Rocketry The Nambi Effect : ‘रॉकेट्री: द नंबी इफेक्ट’ चित्रपट आता ओटीटी प्लॅटफॉर्मवरही प्रदर्शित होणार, जाणून घ्या अधिक!

चित्रपटाच्या पोस्टरमध्ये फक्त तामिळ, कन्नड, तेलुगू आणि मल्याळम भाषा लिहिण्यात आल्याने संभ्रम निर्माण झालायं. मात्र, आज तुम्हाला हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे. रॉकेट्री हा चित्रपट इस्रोचे माजी शास्त्रज्ञ नंबी नारायणन यांच्या आधारित आहे.

Rocketry The Nambi Effect : ‘रॉकेट्री: द नंबी इफेक्ट’ चित्रपट आता ओटीटी प्लॅटफॉर्मवरही प्रदर्शित होणार, जाणून घ्या अधिक!
Follow us
| Updated on: Jul 26, 2022 | 10:49 AM

मुंबई : बॉलिवूड (Bollywood) चित्रपट अभिनेते आर. माधवनच्या ‘रॉकेट्री: द नंबी इफेक्ट’ या चित्रपटाला चाहत्यांचे खूप प्रेम मिळाले. रॉकेट्री हा चित्रपट 2 जुलै रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला होता. रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाचे बजेट 20 कोटी असल्याचे सांगितले जात आहे. इस्रोचे माजी शास्त्रज्ञ नंबी नारायणन (Scientist Nambi Narayanan) यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. हा चित्रपट (Movie) ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे.  चित्रपट नेमका कधी आणि कुठे पाहता येईल याबद्दल आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

रॉकेट्री हा चित्रपट तीन आठवड्यांनंतर ओटीटीवर प्रदर्शित होणार

रॉकेट्री हा चित्रपट तीन आठवड्यांनंतर ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट मंगळवारी 26 जुलै रोजी Amazon Prime वर प्रदर्शित झाला. अॅमेझॉन प्राइमने स्वतः याविषयीची माहिती सोशल मीडियावर शेअर करून प्रेक्षकांना एक प्रकार मोठे गिफ्ट दिले आहे. मात्र, हा चित्रपट हिंदीतही प्रदर्शित होणार की नाही हे स्पष्ट होऊ शकले नाहीयं.

हिंदी भाषेत प्रदर्शित होणार की नाही चित्रपट?

चित्रपटाच्या पोस्टरमध्ये फक्त तामिळ, कन्नड, तेलुगू आणि मल्याळम भाषा लिहिण्यात आल्याने संभ्रम निर्माण झालायं. मात्र, आज तुम्हाला हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे. रॉकेट्री हा चित्रपट इस्रोचे माजी शास्त्रज्ञ नंबी नारायणन यांच्या आधारित आहे. नंबी नारायणनला हेरगिरीच्या खोट्या केसमध्ये कसे अडकवले जाते इतकेच नाही तर त्यांना अटक केली जाते हे सर्व चित्रपटामध्ये दाखवण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा

चित्रपटातून आर. माधवनने दिग्दर्शक म्हणून केली वेगळ्या प्रवासाला सुरूवात

या चित्रपटातून आर. माधवनने दिग्दर्शक म्हणून आपल्या वेगळ्या प्रवासाला सुरूवात केलीयं. या चित्रपटात त्यांनी नंबी नारायणन यांची भूमिकाही साकारली होती. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटाचा प्रीमियर झाला. बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खाननेही या चित्रपटात कॅमिओ केला होता. या चित्रपटात शाहरुख खान एका पत्रकाराच्या भूमिकेत होता.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.