RRR Poster | वाढदिवसाच्या आधीच राम चरणने दिली चाहत्यांना भेट, ‘रामा’च्या लूकने जिंकले सर्वांचे मन!

एसएस राजामौली दिग्दर्शित ‘आरआरआर’ (RRR)  चित्रपटातील सुपरस्टार राम चरण (Ram Charan) याचा लूक आज (26 मार्च) समोर आला आहे. राम चरणच्या वाढदिवसा आधीच त्याच्या चाहत्यांना ही अ‍ॅडव्हान्स भेट मिळाली आहे.

RRR Poster | वाढदिवसाच्या आधीच राम चरणने दिली चाहत्यांना भेट, 'रामा'च्या लूकने जिंकले सर्वांचे मन!
राम चरण

मुंबई : एसएस राजामौली दिग्दर्शित ‘आरआरआर’ (RRR)  चित्रपटातील सुपरस्टार राम चरण (Ram Charan) याचा लूक आज (26 मार्च) समोर आला आहे. राम चरणच्या वाढदिवसा आधीच त्याच्या चाहत्यांना ही अ‍ॅडव्हान्स भेट मिळाली आहे. पोस्टरमध्ये रामच्या हातात धनुष्य देखील आहे आणि त्याने तो लक्ष्य साधताना दिसत आहे. चित्रपटात राम चरण ‘भगवान रामा’ची भूमिका साकारत आहे. आपला लूक शेअर करताना, रामने लिहिले की, ‘शौर्य, आदर आणि अखंडता… एक माणूस ज्याच्याकडे हे सर्व आहे. अल्लूरी सीतारामाराजू ही व्यक्तिरेखा साकारणे हे माझे भाग्य आहे.’(RRR Poster Actor Ram Charan first look from RRR movie)

काही दिवसांपूर्वी निर्मात्यांनी रामच्या वाढदिवशी चित्रपटातील त्याचा लूक शेअर केला जाईल, असा संकेत दिला होता. आता त्याच्या वाढदिवशी नव्हे, तर वाढदिवसाच्या एक दिवस आधीच त्याचा चाहत्यांना हे सरप्राईज भेटले आहे. रामच्या या लूकचे खूप कौतुक होत आहे. या भूमिकेसाठी राम परिपूर्ण असल्याची प्रतिक्रिया चाहत्यांनी दिली आहे.

पाहा राम चरणचा लूक

एस एस राजामौली दिग्दर्शित हा चित्रपट एक पीरियड ड्रामा असून, प्रसिद्ध स्वातंत्र्यसेनानी कोमाराम भीम आणि अल्लूरी सीतारामाराजू यांच्या तरुणपणीच्या दिवसांचे काल्पनिक वर्णन यात केलेले आहे. हा चित्रपट 13 ऑक्टोबर 2021 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होईल. तसेच, हा चित्रपट तब्बल 10 भाषांमध्ये प्रदर्शित होईल.

चित्रपटाचे हक्क विक्रीला

‘आरआरआर’ हा चित्रपट 10 भाषांमध्ये प्रदर्शित होईल. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाल्यानंतर केवळ 5 भाषांमध्ये थिएट्रिकल राइट्ससाठी आतापर्यंत 348 कोटीहून अधिकच्या ऑफर आल्या आहेत. चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेनंतर चाहते या चित्रपटाविषयी खूप उत्सुक झाले आहेत. आरआरआरला तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळमच्या थिएट्रिकल राइट्ससाठी एकूण 348 कोटी रुपयांची ऑफर मिळाली आहे (RRR Poster Actor Ram Charan first look from RRR movie).

दक्षिणेमध्ये ‘इतक्या’ कोटींना विकले गेले हक्क

निजाम – 75 कोटी रुपये

आंध्र प्रदेश – 165 कोटी रुपये

तामिळनाडू – 48 कोटी रुपये

मल्याळम – 15 कोटी रुपये

कर्नाटक – 45 कोटी रुपये

चांगला गल्ला जमवणार!

खास गोष्ट म्हणजे ‘बाहुबली 2’च्या रिलीजपूर्वी या आकड्याला मागे टाकले आहे, ज्याने दक्षिण-भाषिक राज्यांमधून सुमारे 215 कोटी रुपये कमावले होते. अशा परिस्थितीत, हे स्पष्ट आहे की रिलीज झाल्यानंतर ‘आरआरआर’ चांगलाच गल्ला जमवणार आहे. ज्युनिअर एनटीआर, राम चरण, अजय देवगण, आलिया भट्ट, समुथिरकानी आणि अ‍ॅलिसन डूडी यांच्यासह अनेक भारतीय प्रसिद्ध कलाकार या चित्रपटात दिसणार आहेत. हा सर्वात मोठा हिट भारतीय चित्रपट ठरणार आहे.

यापूर्वी या चित्रपटातील ज्युनिअर एनटीआर, आलिया भट्ट, ऑलिव्हिया मॉरिस यांचे लूक समोर आले आहेत. आणि त्याला चाहत्यांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. एस एस राजामौलीच्या ‘आरआरआर’ चित्रपटामध्ये ज्युनियर एनटीआर, राम चरण, अजय देवगन, आलिया भट्ट, ऑलिव्हिया मॉरिस यांच्यासह अनेक कलाकार भूमिका साकारत आहेत.

(RRR Poster Actor Ram Charan first look from RRR movie)

हेही वाचा :

प्रदूषणाचा पुरुषांच्या पेनिसवर परिणाम, दिया मिर्झा म्हणाली, लोक आता तरी गांभीर्याने घेतील

Soni Razdan | रणबीरला कोरोना होताच आलियाच्या आईने केला उद्धव सरकारला प्रश्न! म्हणाल्या…

Published On - 6:29 pm, Fri, 26 March 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI