प्रदूषणाचा पुरुषांच्या पेनिसवर परिणाम, दिया मिर्झा म्हणाली, लोक आता तरी गांभीर्याने घेतील

प्रदूषणाचा पुरुषांच्या पेनिसवर परिणाम, दिया मिर्झा म्हणाली, लोक आता तरी गांभीर्याने घेतील


मुंबई : प्रदुषणाच्या माणसाच्या आरोग्यावर अनेक घातक परिणाम होत आहेत. त्याचसोबत पर्यावरणावरही दुष्परिणाम होत आहेत. म्हणूनच मागील अनेक वर्षांपासून जगभरात जागतिक हवामान बदलावर (Climate Change) गांभीर्याने चर्चा होत आहे आणि वाढत्या प्रदुषणावर नियंत्रणाची मागणी होत आहे. मात्र, दुसरीकडे काही लोक हवामान बदलाची खिल्ली उडवत असं काहीही नसल्याचा दावा करतात. असं करणाऱ्यांमध्ये सर्वसामान्यांसह अगदी अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचाही समावेश आहे. यातूनच प्रदुषणाच्या मुद्द्यावर जितक्या गांभीर्याने काम होणं अपेक्षित आहे तसं होताना दिसत नाही. म्हणूनच बॉलिवूड अभिनेत्री आणि पर्यावरण कार्यकर्ती दिया मिर्झाने एक नव्या संशोधनावरील लेख ट्विट करत हवामान बदलाला मान्य न करणाऱ्यांना टोला लगावला आहे (Dia Mirza tweet on Climate Change Air Pollution and shrinking of Penises).

दिया मिर्झाने प्रदुषणामुळे पुरुषांच्या पेनिसवर काय दुष्परिणाम होतो यावरील एक संशोधन लेख ट्विट केलाय. तसेच आपल्या ट्विटमध्ये म्हटलं की, “आता तरी जग हवामान बदल, वायू प्रदुषण या मुद्द्यांना अधिक गांभीर्याने घेऊल.”

दियाने शेअर केलेल्या संशोधन लेखात नेमकं काय?

दिया मिर्झाने डॉ. शन्ना स्वॅन यांचा एक लेख ट्विट केला आहे. या लेखात प्रदुषणामुळे वातावरणात पसरलेल्या केमिकल्सचा पुरुषांच्या आणि नवजात बाळांच्या लैंगिक अवयवांवर कसा दुष्परिणाम होतो यावर सखोल माहिती देण्यात आली आहे. डॉ. शन्ना स्वॅन म्हणतात, “सध्या मानवी समुह अस्तित्वाची लढाई लढत आहे. कारण प्लास्टिकच्या निर्मितीसाठी कारखान्यांमध्ये phthalates हे केमिकल वापरलं जात आहे ते माणसाच्या प्रजनन क्षमतेवरच परिणाम करत आहे. यामुळे माणसाच्या शरिरातील हार्मोनलचं संतुलनही बिघडत आहे.”

“प्रदुषणामुळे नव्याने जन्म घेत असलेल्या मुलांच्या लैंगिक अवयवांमध्ये दोष आढळत आहेत. अनेक मुलांच्या पेनिसचा आकार हा सामान्य आकारमानापेक्षा कमी असल्याचं आढळलं आहे. आधुनिक जग अगदी पुरुषांच्या विर्यातील शुक्राणूंच्या संख्येवरही परिणाम करत आहे. त्यामुळे माणसाचं भविष्यच धोक्यात आलं आहे,” असंही डॉ. स्वॅन यांनी नमूद केलं.

घातक केमिकल्सचा प्रयोग उंदरांवरही

डॉ. स्वॅन यांनी आपल्या संशोधनात अभ्यास करताना आधी या घातक केमिकलचा उपयोग उंदरांवरही केला. त्या प्रयोगांमध्येही त्यांना उंदरांच्या लैंगिक अवयवांवर दुष्परिणाम होत असल्याचं लक्षात आलं. याचप्रमाणे आईच्या गर्भात असताना आईचा संबंध या घातक केमिकल्सशी आल्यानंतर संबंधित बाळाच्या पेनिसचा आकारही लहान झाल्याचं समोर आलं आहे.

हेही वाचा :

Dia Mirza | लग्नानंतर दिया मिर्झाचा बोल्ड अंदाज, सोशल मीडियावर शेअर केले ‘बिकिनी’ फोटो!

RHTDM 2 | ‘रहना है तेरे दिल में’चा सिक्वेल, दिया-माधवनला पुन्हा एकत्र आणण्याचा प्रयत्न फेल

ना कन्यादान, ना पारंपरिक रितीरिवाज, मंगलाष्टिका म्हणायला महिला भटजी, प्रसिद्ध अभिनेत्रीचा जगावेगळा विवाह सोहळा

व्हिडीओ पाहा :

Dia Mirza tweet on Climate Change Air Pollution and shrinking of Penises

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI