Soni Razdan | रणबीरला कोरोना होताच आलियाच्या आईने केला उद्धव सरकारला प्रश्न! म्हणाल्या…

निर्माते महेश भट्ट यांची पत्नी आणि अभिनेत्री सोनी राझदान (Soni Razdan) सध्या सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव झाल्या आहेत. त्या त्यांच्या मनातील कोंडी आणि मनात येणारे प्रश्न लोकांसमोर मांडत आहेत. आता त्यांनी थेट सरकारला प्रश्न केला आहे.

Soni Razdan | रणबीरला कोरोना होताच आलियाच्या आईने केला उद्धव सरकारला प्रश्न! म्हणाल्या…
आलिया भट्ट आणि सोनी राझदान
Harshada Bhirvandekar

|

Mar 26, 2021 | 5:16 PM

मुंबई : निर्माते महेश भट्ट यांची पत्नी आणि अभिनेत्री सोनी राझदान (Soni Razdan) सध्या सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव झाल्या आहेत. त्या त्यांच्या मनातील कोंडी आणि मनात येणारे प्रश्न लोकांसमोर मांडत आहेत. आता त्यांनी थेट सरकारला प्रश्न केला आहे. त्यांचा प्रश्न कोरोना लसीकरणाशी संबंधित आहे. सोनी यांनी ट्विट करून हा प्रश्न विचारला आहे. तर, दुसरीकडे लोक त्यांच्या या प्रश्नाला रणबीर कपूरशी (Ranbir Kapoor) जोडू पाहात आहेत. अलीकडेच रणबीर कपूरलाही कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे सोनी राझदान यांना आपल्या होणाऱ्या जावयाची चिंता वाटत असल्याचे, म्हटले आहे (Alia Bhatt mother Soni Razdan asked quest to Maharashtra government regarding corona vaccination).

रणबीर कपूरसोबत सोनी राझादान यांचा फार जवळचा संबंध आहेत. वास्तविक, रणबीर कपूर भट्ट कुटुंबाच्या अगदी जवळचा आहे, कारण तो सध्या आलिया भट्टला डेट करत आहे. अशा परिस्थितीत तो भट्ट कुटुंबासमवेत बराच वेळ घालवतो.

काय म्हणाल्या सोनी राझदान?

सोनी रझदान यांनी बुधवारी ट्विट केले की, ‘16 ते 40 वर्षे वयोगटातील लोकांना सर्वात आधी कोरोना लसीकरण करायला हवे होते, कारण ते कामावर आणि इतर कारणांसाठी बाहेर जात असतात. 16 ते 40 वयोगटातील लोक बाहेर जाऊन नोकरी करतात, बार, नाईटक्लब इत्यादी ठीकाणी जातात. त्यामुळे या वयोगटातील लोकांना का पहिली लस दिली जात नाही?’

पाहा सोनी यांचे ट्विट

सोनी रझदान यांनीही या ट्विटद्वारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना संबोधित केले. त्यांचे ट्विट अशा वेळी आले आहे, भारतात जेव्हा ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्याने लस देण्यात येत आहे (Alia Bhatt mother Soni Razdan asked quest to Maharashtra government regarding corona vaccination).

यापूर्वीही केले होते ट्विट

सोनी राझदान म्हणाल्या, ‘मला असे वाटते की आपण या गोष्टीपासून कधीही मुक्त होऊ शकत नाही. आपलं आयुष्य टिकवण्यासाठी कसं तरी ते जगण्याची गरज आहे. लस घेतल्यानंतरही ते उत्परिवर्तित होणार आहे. ‘

आमीर खानलाही कोरोना संसर्ग

नुकतेच अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाली आहे. बुधवारी बॉलिवूड सुपरस्टार आमीर खानच्या टीमने जाहीर केले की, आमीरला कोरोनाची लागण झाली आहे आणि तो घरी क्वारंटाईन झाला आहे. सोमवारी अभिनेता कार्तिक आर्यन यानेही ट्विट करून, त्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली होती.

‘हे’ कलाकारही कोरोना पॉझिटिव्ह

बॉलिवूड सेलिब्रिटींमध्ये अभिनेता रणबीर कपूर, चित्रपट निर्माते संजय लीला भन्साळी, अभिनेता मनोज बाजपेयी, सिद्धांत चतुर्वेदी, अभिनेत्री तारा सुतारिया आणि अभिनेता-चित्रपट निर्माते सतीश कौशिक यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे.

‘या’ कलाकारांनी घेतली कोरोनाची लस

सध्या बॉलिवूडच्या अनेक स्टार्सनी कोरोनाची लस घेतली आहे. यामध्ये संजय दत्त, सलमान खान, धर्मेंद्र अशा आणखीन अनेक स्टार्सचा समावेश आहे. बॉलिवूडमधील वाढत्या कोरोना प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर हे कलाकार बरेच सतर्क झाले आहेत.

(Alia Bhatt mother Soni Razdan asked quest to Maharashtra government regarding corona vaccination)

हेही वाचा :

PHOTO | सोशल मीडियावरील बोल्ड फोटोंमुळे ‘ही’ मराठी अभिनेत्री आलीय चर्चेत!

Suchismita Routray | अमिताभ-रणबीर-सुशांतसारख्या मोठ्या कलाकारांबरोबर केले काम, आता ‘मोमो’ विकून हाकतेय जीवनाचा गाडा!

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें