RRR Trailer Out | दमदार संवादांसह धमाकेदार अ‍ॅक्शन तडका, पाहा ‘RRR’चा जबरदस्त ट्रेलर

एसएस राजामौली (SS Rajamouli) यांच्या ‘आरआरआर’ (RRR) या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. पुढील वर्षी हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. चाहते चित्रपटाच्या ट्रेलरची आतुरतेने वाट पाहत होते. आज अखेर त्यांची प्रतीक्षा संपली.

RRR Trailer Out | दमदार संवादांसह धमाकेदार अ‍ॅक्शन तडका, पाहा ‘RRR’चा जबरदस्त ट्रेलर
ज्यांच्या जीवनावर RRR चित्रपट बनला, ते 'अल्लुरी सीताराम राजू' आणि 'कोमाराम भीम कोण होते?

मुंबई : एसएस राजामौली (SS Rajamouli) यांच्या ‘आरआरआर’ (RRR) या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. पुढील वर्षी हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. चाहते चित्रपटाच्या ट्रेलरची आतुरतेने वाट पाहत होते. आज अखेर त्यांची प्रतीक्षा संपली. RRR चा जबरदस्त ट्रेलर अखेर रिलीज झाला आहे. या चित्रपटात राम चरण, जूनियर एनटीआर, आलिया भट्ट आणि अजय देवगण मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

‘आरआरआर’चा ट्रेलर अॅक्शन आणि इमोशन्सनी भरलेला आहे. हा ट्रेलर पाहताना अक्षरशः सर्वांच्याच अंगावर काटे येतात. ट्रेलरमध्ये दमदार डायलॉग्सही ऐकायला मिळतायत. ट्रेलर पाहिल्यानंतर चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.

पाहा ट्रेलर :

3 मिनिटे 7 सेकंदाच्या या ट्रेलरची सुरूवात, ब्रिटीश गव्हर्नर गोंड जमातीतील एका मुलीला बळजबरीने आपल्यासोबत घेऊन जातो या दृश्याने होते. त्यानंतर जमातीचे रक्षक कोमाराम भीम यांची एन्ट्री होते. कोमराम जंगलात वाघाशी लढताना दिसत आहे. त्यानंतर राम चरणची एंट्री होते. तो एक पोलीस अधिकारी साकारात आहे आणि त्याचा मित्र कोमाराम भीमच्या अगदी जवळचा खास व्यक्ती आहे. मात्र, स्वातंत्र्याच्या लढ्यात त्यांची मैत्री तुटते. अल्लुरी सीताराम राजू अर्थात राम चरण इंग्रजांसाठी लढतो, तर कोमाराम भीम त्यांच्याविरुद्ध लढतो.

पण, नशिबाला काही वेगळेच मान्य असते. अल्लुरीला खूप दुखापत झाली, त्यानंतर तो या लढ्यात त्याचा मित्र भीमाला साथ देतो. ट्रेलरमध्ये चित्रपटाची स्टारकास्ट आलिया भट्ट, अजय देवगण, श्रेया सरन यांची झलकही पाहायला मिळाली आहे. ट्रेलरमध्ये सीतेच्या भूमिकेत आलियाने सर्वांची मने जिंकली आहेत.

सोशल मीडियावर ट्रेलरची हवा!

सोशल मीडियावर आरआरआरचा ट्रेलर शेअर करताना एसएस राजामौली यांनी लिहिले की, ‘आशा आहे की हा 3 मिनिटे 7 सेकंदाचा ट्रेलर आरआरआर चित्रपटाचा संपूर्ण गौरव आहे.’ ट्रेलर शेअर करताना ज्युनियर एनटीआरने लिहिले की, ‘3 मिनिटे 7 सेकंद श्वास रोखून बसण्यासाठी तयार व्हा.’

थिएटरमध्ये पार पडला ट्रेलर लाँच सोहळा

RRR चा ट्रेलर थिएटरमध्ये लाँच झाला आहे. या लॉन्च इव्हेंटमध्ये आलिया भट्ट, अजय देवगन, जूनियर एनटीआर उपस्थित होते. कुटुंबात लग्न कार्य असल्यामुळे राम चरण या सोहळ्याचा भाग होऊ शकला नाही. एसएस राजामौली दिग्दर्शित RRR, 7 जानेवारी 2022 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होण्यापूर्वी 3 गाणी देखील रिलीज झाली आहेत, जी चाहत्यांना खूप आवडली आहेत.

हेही वाचा :

Aarya Season 2 | माधुरी दीक्षितने सांगितली सुष्मिता सेनची सर्वात मोठी कमजोरी, समोर आणला ‘आर्याचा’ थरारक प्रवास

Happy Birthday Shatrughan Sinha | …जेव्हा होणाऱ्या सासूने शत्रुघ्न सिन्हांसोबत लेकीचं लग्न लावण्यास नकार दिला!

‘त्यांच्याशी हस्तांदोलन करताच तोंडून आपोआप जय हिंद निघायचं’, सीडीएस जनरल बिपिन रावत यांना बॉलिवूडची आदरांजली


Published On - 1:59 pm, Thu, 9 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI