Aarya Season 2 | माधुरी दीक्षितने सांगितली सुष्मिता सेनची सर्वात मोठी कमजोरी, समोर आणला ‘आर्याचा’ थरारक प्रवास

राम माधवानी दिग्दर्शित आर्या सीझन 2 लवकरच डिस्ने+ हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. जेव्हा हा फॅमिली ड्रामा सर्वांसमोर आला होता तेव्हा प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतला होता.

Aarya Season 2 | माधुरी दीक्षितने सांगितली सुष्मिता सेनची सर्वात मोठी कमजोरी, समोर आणला 'आर्याचा' थरारक प्रवास
Madhuri dixit

मुंबई : राम माधवानी दिग्दर्शित आर्या सीझन 2 लवकरच डिस्ने+ हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. जेव्हा हा फॅमिली ड्रामा सर्वांसमोर आला होता तेव्हा प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतला होता. या वेब सिरीजच्यामाध्यमातून सुष्मिता सेनने (Sushmita Sen) जबरदस्त कमबॅक केला होता. आता या सीरीजचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याच पार्श्वभूमिवर बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितने आर्याचा थरारक प्रवास प्रेक्षकांसमोर एका वेगळ्या स्वरुपात आणला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sushmita Sen (@sushmitasen47)

कधी आणि कुठे पाहू शकणार ‘आर्या सीझन 2’
आर्या सीझन 2 लवकरच डिस्ने+ हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. यामध्ये आपल्याला सुष्मिता सेनचा एक्शन ड्रामा पाहायला मिळणार आहे, पण पहिल्या सिझनमध्ये आर्या परिवारावर झालेल्या आघातामुळे भेदरलेली दिसत होती. पण या सीझनमध्ये ती डॉन बनली आहे.
तिचे एक नवे रुप आपल्या समोर येणार आहे. 10 डिसेंबरपासून ‘आर्या 2’ पाहू शकणार आहोत.

सुष्मिता सेनच्या व्यक्त केल्या भावना
सुष्मिता सेन या वेब सिरीजला घेऊन आपल्या भावना व्यक्त केल्या , ‘मला वाटते आर्यने माझे आयुष्य अनेक पातळ्यांवर बदलले आहे. एक अभिनेत्री म्हणून आर्याचा एक भाग बनणे हा एक रोमांचक अनुभव होता आणि ही एक सुंदर सीरिज आहे. मला वाटते की हा एक अष्टपैलू अनुभव होता, ज्याने माझ्या आयुष्यात खूप चांगले बदल केले आहेत.’

सुष्मिताचा धमाकेदार अभिनय
सुष्मिता 10 वर्षांनी अभिनय क्षेत्रात परतली आहे. ती क्राईम सीरीज ‘आर्या’द्वारे (Aarya) प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. जेव्हा, बरेच कलाकार बऱ्याच काळानंतर चित्रपट आणि शोमध्ये परततात, तेव्हा त्यांना पूर्वीसारखा चांगला प्रतिसाद मिळत नाही, पण सुष्मिताने ‘आर्या’मधील तिच्या अभिनयाने सर्वांना आश्चर्यचकित केले.

हेही वाचा :

This week release | सुष्मिता सेनची ‘आर्या’ ते आयुष्मान खुरानाचा ‘चंडीगड करे आशिकी’, आठवडाभर मिळणार मनोरंजनाची मेजवानी!

Vicky Kaushal-Katrina Kaif Wedding : विकी-कतरीनाच्या लग्नात पाहुण्यांना पाळावे लागणार हे नियम


Published On - 9:39 am, Thu, 9 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI