AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

This week release | सुष्मिता सेनची ‘आर्या’ ते आयुष्मान खुरानाचा ‘चंडीगड करे आशिकी’, आठवडाभर मिळणार मनोरंजनाची मेजवानी!

कोरोनानंतर आता चित्रपटगृह सुरु झाली आहेत. यामुळे ओटीटीसह आता चित्रपटगृहातही नव्या चित्रपटांची मिळणार आहे. शिवाय दर आठवड्याला अनेक उत्तमोत्तम वेब सीरीज आणि चित्रपट OTT वर प्रदर्शित होत आहेत.

This week release | सुष्मिता सेनची ‘आर्या’ ते आयुष्मान खुरानाचा ‘चंडीगड करे आशिकी’, आठवडाभर मिळणार मनोरंजनाची मेजवानी!
Films
| Edited By: Harshada Bhirvandekar | Updated on: Dec 08, 2021 | 8:00 AM
Share

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टीचा ‘तडप’ हा डेब्यू चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून, त्याला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. मात्र, कोरोनानंतर आता चित्रपटगृह सुरु झाली आहेत. यामुळे ओटीटीसह आता चित्रपटगृहातही नव्या चित्रपटांची मिळणार आहे. शिवाय दर आठवड्याला अनेक उत्तमोत्तम वेब सीरीज आणि चित्रपट OTT वर प्रदर्शित होत आहेत. या आठवड्यातही अनेक वेब सीरीज ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहेत, तर काही चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत, जे तुमचा वीकेंड खास बनवतील. चला तर मग जाणून घेऊया या आठवड्यात तुमच्यासाठी काय खास असणार आहे…

वेलकम टू अर्थ

8 डिसेंबर – डिस्ने हॉट स्टार

डॅरेन अरोनोफस्की (ब्लॅक स्वान अँड जॅकी) निर्मित, विल स्मिथची अडव्हेंचर सीरीज ‘वेलकम टू अर्थ’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तुम्ही डिस्ने हॉट स्टारवर 8 डिसेंबरपासून ही सीरीज पाहू शकता.

आर्या 2

डिसेंबर 10 – डिस्ने हॉट स्टार प्लस

‘आर्या 2’ डिस्ने हॉट स्टार प्लसवर 10 डिसेंबर रोजी प्रसारित होणार आहे. सुष्मिता सेन ‘आर्या’ या वेब सीरीजमध्ये मुख्य भूमिका साकारत आहे. या मालिकेतील सुष्मिताचे काम प्रेक्षक आणि समीक्षकांच्या पसंतीस उतरले होते. चंद्रचुड सिंह, सिकंदर खेर, नमित दास, सुगंधा गर्ग आणि विश्वजित प्रधान हे कलाकार ‘आर्या’मध्ये दिसणार आहेत.

अरण्यक

10 डिसेंबर- Netflix

बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनची पहिली वेब सीरीज ‘अरण्यक’ 10 डिसेंबर रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. ‘अरण्यक’ची कथा एक भयानक जंगल आणि एक रहस्यमय शहर यांच्याभोवती फिरते. विनय वैकुल यांनी या सीरीजचे दिग्दर्शन केले आहे. घनदाट जंगलात तयार करण्यात आलेल्या या वेब सीरीजमध्ये रवीना एका स्थानिक पोलिसाची भूमिका साकारत आहे.

कातिल हसीनो के नाम

डिसेंबर 10- झी 5

‘कातिल हसीनो के नाम’ ही एक अशी सीरीज आहे, जी महिलांच्या चारित्र्याची बाजू दाखवते, जी याआधी कोणी पाहिली नसेल. ही सीरीज 10 डिसेंबरला झी 5वर रिलीज होणार आहे.

कोड नेम अब्दुल

डिसेंबर 10- थिएटर

चार भारतीय काउंटर इंटेलिजन्स (RAW) एजंटना दहशतवादी तारिक याला न्यूयॉर्कमधून भारतात आणण्याचे मिशन देण्यात आले आहे. पिक-अप पॉईंटवर, त्यांना एक रहस्यमय स्त्री ‘सलमा’ आढळते, जिची ते सेफहाऊसमध्ये चौकशी करतात. तारिकला पकडण्यात चार भारतीय एजंट यशस्वी होतील की, भारत अपयशी ठरतील? याची कथा या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे.

चंडीगड करे आशिकी

डिसेंबर 10- थिएटर

बॉलिवूड स्टार आयुष्मान खुराना आणि वाणी कपूर अभिनित ‘चंडीगड करे आशिकी’ हा चित्रपट 10 डिसेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा :

Esha Gupta | ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये फ्लाँट केली कर्वी फिगर, ईशा गुप्ताच्या हॉट अदांनी वाढवला इंटरनेटचा पारा! पाहा PHOTO…

Prajaktta Mali | ‘सपनोंसे भरे नैना.. ना नींद है ना चैना..’, प्राजक्ता माळीच्या लूकवर खिळल्या साऱ्यांच्याच नजरा!

Follow Us
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...
आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
India Alliance PC : आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत..
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत दोन गोल्ड जिंकून रचला इतिहास!
दुष्काळाची दाहकता संत्रा पिकाला मोठा फटका; शेतकऱ्यांवर मोठं संकट
Dry Drought | दुष्काळाची दाहकता संत्रा पिकाला मोठा फटका; शेतकऱ्यांवर मोठं संकट
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी तातडीने बोलवली विभागप्रमुखांची बैठक; नेमकं
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी तातडीने बोलवली विभागप्रमुखांची बैठक; नेमकं काय घडलं?
मेट्रो कधी सुरू होणार? हिंजवडीच्या IT कर्मचाऱ्यांचा संताप, म्हणाले...
मेट्रो कधी सुरू होणार? हिंजवडीच्या IT कर्मचाऱ्यांचा संताप, म्हणाले...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला आंदोलनाचा इशारा
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या...
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या नेत्यांना अटक
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या...
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ, मनसे आक्रमक