Matrubhoomi : केवळ 11 रुपयात पाहा सलमान खानचा ‘मातृभूमी’, पण… काय आहे ऑफर?
सलमान खानच्या 'मातृभूमी' चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला असून, 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना तो केवळ 11 रुपयांत पाहता येणार आहे. सुरुवातीला एप्रिलमध्ये प्रदर्शित होणारा हा सिनेमा आता 4 डिसेंबरला रिलीज होईल. व्हीएफएक्समधील उत्कृष्टतेमुळे आणि काही अफवांवर खुद्द सलमानने स्पष्टीकरण दिले, की सिनेमा सैनिकांच्या कुटुंबांवर आधारित आहे.

अभिनेता सलमान खानच्या मातृभूमी सिनेमचा ट्रेलर आज लॉन्च झाला. यावेळी संपूर्ण टीम उपस्थित होती. या टीमने मीडियाशी संवाद साधला. यावेळी सलमान खानने 75 वर्षापेक्षा अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी एक खास सरप्राइजची घोषणा केली आहे. 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना या सिनेमाचं तिकीट केवळ 11 रुपयात मिळणार आहे. म्हणजे 75 वर्षावरील बुजुर्गांना केवळ 11 रुपयात हा सिनेमा पाहता येणार आहे.
ट्रेलर लॉन्च इव्हेंटमध्ये सलमान खानने ही घोषणा केली. आम्ही 75 वर्षावरील लोकांसाठी केवळ 11 रुपयात तिकीट ठेवलं आहे, असं सलमान खानने स्पष्ट केलं आहे. यावेळी सलमानने सिनेमा प्रदर्शित होण्यासाठी लागणाऱ्या विलंबावरही भाष्य केलं आहे. आधी हा सिनेमा एप्रिलमध्ये प्रदर्शित होणार होता. पण सिनेमा रिलीज होण्यास उशीर झाला. आता हा चित्रपट 4 डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे. सिनेमाचं चित्रीकरण 40 ते 50 दिवसात होणार होतं. पण चित्रीकरणाला वेळ लागला. मेकर्सने या सिनेमातील व्हिएफएक्स अत्यंत उत्कृष्टपणे दाखवले आहेत. त्यामुळे या सिनेमाला उशीर झाल्याचं सलमान खानने सांगितलं.
सिनेमाची कथा काय
या सिनेमात अभिनेत्री चित्रांगदा सिंह दिसणार आहे. या सिनेमाचे काही गाणे रिलीज करण्यात आले आहेत. या सिनेमावर सरकारचा दबाव होता, त्यामुळे यातील काही भाग पुन्हा चित्रीत करण्यात आल्याची चर्चा आहे. त्यामुळे हा सिनेमा प्रदर्शित होण्यास उशीर झाल्याचंही सांगितलं जात आहे. पण सलमान खानने या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. ही बकवास आहे. यात काहीच तथ्य नाहीये. आम्ही सैनिकांवर सिनेमा बनवला आहे. देशाची सेवा करताना त्यांचं कुटुंब कशा परिस्थितीतून जातं हे आम्ही या सिनेमात दाखवलं आहे. यात निगेटिव्ह असं काहीच नाहीये. फक्त परिस्थिती निगेटिव्ह आहे, असं सलमान म्हणाला.
सिनेमाच्या नावाबाबत काय म्हणाला?
आधी या सिनेमाचं नाव बॅटल ऑफ गलवान होतं. त्यानंतर या सिनेमाचं नाव मातृभूमी करण्यात आलं. सिनेमाचं नाव अचानक बदलण्यात आल्याबाबतही सलमानने प्रतिक्रिया दिली. क्लॅपवर आम्ही तात्पुरतं नाव टाकलं होतं. आम्हाला बॅटल ऑफ गलवान हे टायटल घ्यायचं नव्हतं. आमच्या सिनेमातील एका गाण्यातूनच आम्हाला मातृभूमी हे टायटल मिळालं. हिमेशचं ते गाणं आहे. त्याबद्दल हिमेशचे आभार, असं त्याने स्पष्ट केलं.