AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Samanthaने नाग चैतन्यसोबतचं उरलं सुरलं नातंही संपवलं; यावेळी तिने..

ऑक्टोबर 2021 मध्ये टॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वांत लोकप्रिय जोडी विभक्त झाली. समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu)आणि नाग चैतन्यच्या (Naga Chaitanya) घटस्फोटाच्या वृत्ताने सर्वांनाच धक्का बसला. चार वर्षांच्या संसारानंतर या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटाच्या कारणांवरून सोशल मीडियावर अनेकदा चर्चा झाल्या.

Samanthaने नाग चैतन्यसोबतचं उरलं सुरलं नातंही संपवलं; यावेळी तिने..
| Updated on: Mar 23, 2022 | 3:31 PM
Share

ऑक्टोबर 2021 मध्ये टॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वांत लोकप्रिय जोडी विभक्त झाली. समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu)आणि नाग चैतन्यच्या (Naga Chaitanya) घटस्फोटाच्या वृत्ताने सर्वांनाच धक्का बसला. चार वर्षांच्या संसारानंतर या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटाच्या कारणांवरून सोशल मीडियावर अनेकदा चर्चा झाल्या. मात्र या दोघांमध्ये नेमकं कुठे बिनसलं, हे निश्चितपणे अद्यापही समोर आलं नाही. समंथा वेळोवेळी सोशल मीडियाद्वारे कधी प्रत्यक्ष तर कधी अप्रत्यक्षपणे तिच्या नात्याविषयी व्यक्त झाली. आता तिने नाग चैतन्यसोबतचं उरलं सुरलेलं नातंही संपवलं आहे. समंथाने तिच्या इन्स्टाग्राम (Instagram) अकाऊंटवरील त्याच्यासोबतचे सर्व फोटो काढून टाकले आहेत. त्याचसोबत त्याला अनफॉलो केलं आहे. अनफॉलो केल्यानंतर तिने स्टोरीमध्ये एक पोस्ट लिहिली आहे.

‘कधीकधी, आपल्या आतील सामर्थ्य ही सर्वांना दिसू शकेल अशी मोठी ज्योत नसते. कधी कधी, ती फक्त एक छोटीशी ठिणगी असते, जी हळूच तुम्हाला म्हणते.. पुढे चालत रहा, तुम्ही हे करू शकाल,’ अशा आशयाची पोस्ट तिने स्टोरीमध्ये लिहिली आहे. नाग चैतन्यबाबतच तिने ही पोस्ट लिहिली असावी, असा अंदाज चाहत्यांनी वर्तवला आहे. समंथाने नाग चैतन्यला अनफॉलो केलं असलं तरी नाग चैतन्य तिला अजूनही इन्स्टाग्रामवर फॉलो करत आहे. त्याने त्याच्या अकाऊंटवरील तिच्यासोबतचे फोटोसुद्धा डिलिट केले नाहीत.

नाग चैतन्यच्या अकाऊंटवरील समंथासोबतचा फोटो-

नाग चैतन्यची प्रतिक्रिया-

घटस्फोटानंतर नाग चैतन्यने बराच काळ मौन बाळगलं होतं. घटस्फोटाच्या तीन महिन्यांनंतर एका मुलाखतीत तो याविषयी म्हणाला, “आम्ही दोघांनी परस्पर संमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. मला यात काहीच वाईट वाटत नाही. जर ती खूश असेल तर मीसुद्धा खूश आहे. अशा परिस्थितीत घटस्फोट हाच निर्णय मला योग्य वाटतो.”

विभक्त झाल्यानंतर समंथावर सोशल मीडियावरून अनेक आरोप करण्यात आले होते. विवाहबाह्य संबंध, गर्भपात यांसारखे गंभीर आरोप तिच्यावर झाले. याविषयी एका पोस्टद्वारे तिनं ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं होतं. ‘ते म्हणतात माझं अफेअर होतं, मला मूल नको होतं, मी गर्भपात केलाय, मी संधीसाधू आहे. तुम्हाला सांगू इच्छिते की घटस्फोट हा अत्यंत क्लेशकारक असतो. त्या त्रासातून बाहेर पडण्यासाठी मला थोडा तरी वेळ द्या. माझ्या खासगी आयुष्यावर होणारे हे आरोप अत्यंत वाईट आहेत. या आरोपांमुळे मी खचून जाणार नाही’, असं तिने लिहिलं होतं.

हेही वाचा:

“The Kashmir Files साठी लता मंगेशकरांनी…”; अखेर विवेक अग्निहोत्रींनी चर्चांना दिला पूर्णविराम

The Kashmir Filesची कमाई काश्मिरी पंडितांना देण्याचा सल्ला देणाऱ्या IAS अधिकाऱ्याला विवेक अग्निहोत्रींचं उत्तर..

समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली.
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा.
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई.
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव.
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका.
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला.
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली.