Shah Rukh Khan | चाहत्याने शाहरुख खान याला थेट विचारले तुझी महिन्याची कमाई किती? अभिनेत्याचे उत्तर ऐकून…

शाहरुख खान हा तब्बल चार वर्षांनंतर पठाणच्या माध्यमातून पुनरागमन करतोय.

Shah Rukh Khan | चाहत्याने शाहरुख खान याला थेट विचारले तुझी महिन्याची कमाई किती? अभिनेत्याचे उत्तर ऐकून...
| Updated on: Jan 04, 2023 | 6:56 PM

मुंबई : शाहरुख खान हा त्याच्या आगामी पठाण या चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहे. पठाण चित्रपटातील बेशर्म रंग हे गाणे रिलीज झाल्यापासून मोठा वाद सुरू आहे. शाहरुख खानसोबतच या चित्रपटामध्ये दीपिका पादुकोण देखील महत्वाच्या भूमिकेत आहे. हा चित्रपट 25 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बेशर्म रंग या गाण्यामध्ये दीपिकाने भगव्या रंगाची बिकिनी घातल्याने वादाला तोंड फुटले असून अनेकजण सोशल मीडियावर या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी करताना दिसत आहेत. शाहरुख खान हा तब्बल चार वर्षांनंतर पठाणच्या माध्यमातून पुनरागमन करतोय.

पठाण चित्रपटाचा वाद सुरू असतानाच शाहरुख खान हा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय दिसतोय. ट्विटरवर आस्क एसआरके हे सेशन चालवताना शाहरुख खान दिसतोय. यामध्ये शाहरुख खान हा आपल्या चाहत्यांच्या प्रश्नाला उत्तर देतो.

आज 4 जानेवारीला देखील शाहरुख खान हा आस्क एसआरके या सेशनमध्ये उपस्थित होता. यावेळी शाहरुख खान याला एका चाहत्याने प्रश्न विचारला की, एका महिन्याला तू किती रूपये कमाई करतो.

चाहत्याच्या या प्रश्नावर शाहरुख खान याने अत्यंत अनोख्या पध्दतीने उत्तर दिले आहे. शाहरुख खान म्हणाला, मी भरपूर प्रेम कमावतो…दररोजच…शाहरुख खान याचे हे उत्तर चाहत्यांना आवडले आहे.

पठाण चित्रपटाचा टीझर आणि दोन गाणे यापूर्वी रिलीज झाले आहेत. मात्र, चाहते गेल्या काही दिवसांपासून पठाण चित्रपटाच्या ट्रेलरची वाट पाहात होते. शेवटी ट्रेलर कधी रिलीज होणार याची घोषणा आज करण्यात आलीये.

10 जानेवारीला पठाण चित्रपटाचे ट्रेलर रिलीज करण्यात येणार आहे. पठाण चित्रपटातील बेशर्म रंग हे गाणे रिलीज झाल्यापासून मोठा गोंधळ निर्माण झाला. आता ट्रेलर काय धमाका करतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे.