Shah Rukh Khan | स्वत: च्याच चित्रपटाची तिकिटे खरेदी करतो शाहरुख खान? अखेर अभिनेत्याने केला मोठा खुलासा

बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या चित्रपटांमुळे तूफान चर्चेत आहे. विशेष म्हणजे शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट धमाका करताना दिसला. शाहरुख खान याच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा पठाण हाच चित्रपट ठरला. शाहरुख खान याचे चाहते त्याच्या आगामी चित्रपटाची वाट पाहत आहेत.

Shah Rukh Khan | स्वत: च्याच चित्रपटाची तिकिटे खरेदी करतो शाहरुख खान? अखेर अभिनेत्याने केला मोठा खुलासा
Image Credit source: Twitter
| Updated on: Jul 13, 2023 | 2:58 PM

मुंबई : शाहरुख खान याच्यासाठी यंदाचे वर्षे अत्यंत खास ठरले आहे. विशेष म्हणजे यंदा शाहरुख खान (Shah Rukh Khan) याने तब्बल चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. 2019 मध्ये शाहरुख खान याचा झिरो हा चित्रपट रिलीज झाला होता. मात्र, शाहरुख खान याच्या या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आणि त्याचा हा चित्रपट फ्लाॅप (Movie flap) गेला. त्यानंतर शाहरुख खान हा मोठ्या पडद्यापासून दूर होता. शाहरुख खान याचे चाहते सतत त्याच्या पुनरागमनाची वाट पाहत होते. शेवटी शाहरुख खान याने पठाण (Pathaan) चित्रपटाच्या माध्यमातून दणदणीत असे पुनरागमन केले आहे. शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट हिट ठरला.

विशेष म्हणजे फक्त पठाण हाच चित्रपट नाही तर पठाणनंतर लगेचच जवान आणि डंकी हे चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. काही दिवसांपूर्वीच डंकी चित्रपटाचे शूटिंग करण्यासाठी शाहरुख खान हा कश्मीर येथे पोहचला होता. शाहरुख खान याचे विमानतळावरील काही फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले.

शाहरुख खान हा सध्या सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय दिसत आहे. नुकताच शाहरुख खान याने आपल्या चाहत्यांसाठी आस्क एसआरके सेशन घेतले. या सेशनमध्ये शाहरुख खान हा आपल्या चाहत्यांच्या प्रश्नाची उत्तरे देताना दिसला. यापूर्वी पठाण हा चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर अशाच प्रकारे सेशन घेताना शाहरुख खान हा दिसला होता.

आस्क एसआरके सेशनमध्ये एका चाहत्याने शाहरुख खान याची फिरकी घेत विचारले की, तुम्ही कधी चित्रपटाचे तिकिट काढतात का? यावर शाहरुख खान हा देखील मजेदार पध्दतीने उत्तर देताना दिसला. शाहरुख खान म्हणाला की, तुम्ही तुमच्या कामाचा पगार कधी स्वतः पे करतात का?? आता शाहरुख खान याची ही पोस्ट व्हायरल होत आहे.

मुळात म्हणजे शाहरुख खान हा पठाण चित्रपचटाच्या वेळी देखील कुठेही जाऊन चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसला नव्हता. फक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून तो चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसला. यावेळी जवान चित्रपटाच्या वेळी शाहरुख खान तेच करत आहे. चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या प्रश्नाला उत्तरे देताना दिसत आहे.