AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shah Rukh Khan | शाहरुख खान याच्यासोबत मराठमोळी प्राजक्ता माळी; व्हिडीओ पाहून व्हाल हैराण

अनेक वर्षांनंतर शाहरुख खान आणि प्राजक्ता माळी यांचा 'तो' खास व्हिडीओ समोर आलाच; मराठमोळ्या अभिनेत्रीचा उत्साह पाहून म्हणाल... सध्या सर्वत्र प्राजक्ता माळी हिची चर्चा...

Shah Rukh Khan | शाहरुख खान याच्यासोबत मराठमोळी प्राजक्ता माळी; व्हिडीओ पाहून व्हाल हैराण
| Updated on: Jul 10, 2023 | 2:37 PM
Share

मुंबई | मराठी इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणजे अभिनेत्री प्राजक्ता माळी.. प्राजक्ता माळी हिने अनेक सिनेमे आणि मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. फार लहान – लहान भूमिका साकारत अभिनेत्रीने झगमगत्या विश्वात स्वतःचं स्थान भक्कम केलं. करियरच्या सुरुवातीस मराठमोळ्या प्रजक्ता माळी हिने बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान याच्यासोबत स्क्रिन शेअर केली. खुद्द अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने शाहरुख खान याच्यासोबत कोणत्या सिनेमात स्क्रिन शेअर केली… याबद्दल सांगितलं आहे. सध्या सर्वत्र सोशल मीडियावर अभिनेत्रीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

जक्ता माळी म्हणाली, ‘स्वदेस नावाचा एक सिनेमा आहे. सिनेमातील एका सीनमध्ये अभिनेत्री एका लायब्ररीमध्ये पैसे विसरते  आणि तो (शाहरुख खान) तिचे पैसे देण्यासाठी बाहेर येतो. बाहेर येत असताना शाहरुख दोन मुलींना धडकतो. त्या दोन मुलींमध्ये एक मी आहे..’ असं म्हणत अभिनेत्री शाहरुख खान याच्यासोबत असलेल्या आठवणी ताज्या केल्या..

अभिनय क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर अनेक प्रसिद्ध आणि लोकप्रिय कलाकारांसोबत काम करण्याचं प्रत्येक नव्या कलाकारचं स्वप्न असतं. अभिनय क्षेत्रात सुरुवातीच्या काळात शाहरुख खान याच्यासोबत काम करता आल्यामुळे प्राजक्ता प्रचंड आनंदी होती.

अभिनय क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर प्राजक्ता माळी हिने कधीही मागे वळून पाहिलं नाही. पण ‘रानबाजार’ वेब सीरिजमध्ये प्राजक्ताने साकारलेल्या भूमिकेला अनेकांनी विरोध केला, अनेकांनी मात्र अभिनेत्रीची कौतुकाने पाठ थोपटली. ‘रानबाजार’ सीरिजमध्ये प्राजक्ताने रत्ना ही व्यक्तीरेखा साकारली होती.

‘रानबाजार’मध्ये रत्ना ही भूमिका साकारल्यामुळे प्राजक्ता तुफान चर्चेत आली होती. सीरिज प्रदर्शित झाल्यानंतर अभिनेत्रीला चाहत्यांनी अनेक प्रश्न विचारले. रत्ना ही भूमिका साकारताना तू गुटखा खायचीस का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर प्राजक्ताने स्पष्टीकरण दिलं होतं. रत्ना ही भूमिका साकारताना गुटखा नाही तर त्या पुडीत बडीशेप असल्याचं प्राजक्ता हिने सांगितलं होतं.

प्राजक्ता माळी हिने ‘हंपी’, ‘चंद्रमुखी’, ‘लॉकडाऊन’, ‘पावनखिंड’, ‘खोखो’, ‘पांडू’, यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये आणि मालिकांमध्ये भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. अभिनेत्री सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर प्राजक्ताच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. चाहते देखील प्राजक्ताच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत असतात.

Follow Us
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...
अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी..
IND vs NZ: अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी सामना जिंकला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? कारण काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात शरद पवारांना निमंत्रण
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील...
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील, दुष्काळी परिस्थितीमुळे जीवन विस्कळीत
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इ
Manoj Jarange Patil : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इशारा
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले?
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले? अमरावतीतील राजकाणात मोठ्या घडामोडी