Shah Rukh Khan Upcoming Film | ‘रोमान्स किंग’ शाहरुख खान पुण्यात, आगामी चित्रपटाच्या चित्रिकरणाला सुरुवात!

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Sep 04, 2021 | 12:55 PM

अभिनेता शाहरुख खानने (Shah Rukh Khan) त्याच्या बहुचर्चित दुहेरी भूमिका असणारा चित्रपट स्वतः तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची कंपनी रेड चिलीज एंटरटेनमेंट आता चित्रपटाचे शूटिंग सुरू झाल्यानंतरच या चित्रपटाच्या वितरण आणि इतर अधिकारांवर पुढील चर्चा करेल.

Shah Rukh Khan Upcoming Film | ‘रोमान्स किंग’ शाहरुख खान पुण्यात, आगामी चित्रपटाच्या चित्रिकरणाला सुरुवात!
शाहरुख खान

Follow us on

मुंबई : अभिनेता शाहरुख खानने (Shah Rukh Khan) त्याच्या बहुचर्चित दुहेरी भूमिका असणारा चित्रपट स्वतः तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची कंपनी रेड चिलीज एंटरटेनमेंट आता चित्रपटाचे शूटिंग सुरू झाल्यानंतरच या चित्रपटाच्या वितरण आणि इतर अधिकारांवर पुढील चर्चा करेल. शाहरुख खान स्टारर शेवटचा रिलीज ‘झिरो’ होता, जो तीन वर्षांपूर्वी रिलीज झाला होता आणि रेड चिलीज एंटरटेनमेंटने निर्माता दिग्दर्शक आनंद एल राय यांची कंपनी कलर यलो प्रोडक्शन्सच्या सहकार्याने याची निर्मिती केली होती. शाहरुख खानच्या दुहेरी भूमिका असणारा हा चित्रपट अटलीने दिग्दर्शित केला असून, त्याचे शूटिंग पुण्यात सुरू होणार आहे.

या चित्रपटात शाहरुख खान सोबत अभिनेत्री नयनतारा दिसणार असून, त्यांच्याशिवाय दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील इतर अनेक दिग्गज कलाकारही या चित्रपटात काम करत आहेत. हिंदी व्यतिरिक्त हा चित्रपट इतर प्रमुख भारतीय भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे.

नव्या शैलीचा शोध

‘झिरो’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपेक्षित परिणाम साध्य करण्यात अपयशी ठरल्यानंतर शाहरुख खानने त्याच्या चित्रपटांबाबत बरीच खबरदारी घेणे सुरू केले आहे. ‘झिरो’ च्या आधी रिलीज झालेले शाहरुखचे चित्रपट ‘रईस’, ‘जब हॅरी मेट सेजल’, ‘डिअर जिंदगी’, ‘दिलवाले’, ‘हॅपी न्यू इयर’ आणि ‘चेन्नई एक्सप्रेस’ होते. शाहरुख आता मोठ्या पडद्यावर सामान्य लोकांची भूमिका करण्यापासून दूर आहे. त्याच्या जवळच्या मित्रांचा असा विश्वास आहे की शाहरुखला आता फक्त अशा दिग्दर्शकांसोबत काम करायचे आहे ज्यांच्याकडे त्याला नवीन शैलीत चित्रपट सादर करण्याची क्षमता आहे. या प्रकरणामध्ये दिग्दर्शक फरहान अख्तरचा ‘डॉन 3’ हा चित्रपटही अद्याप सुरू झालेला नाही.

‘पठाण’च्या शुटिंगमध्ये व्यस्त

आजकाल शाहरुख खान यशराज फिल्म्सचे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांच्या ‘पठाण’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करण्यात व्यस्त आहे. त्याचे शेवटचे वेळापत्रक स्पेनमध्ये असणार आहे, ज्यात चित्रपटाची नायिका दीपिका पदुकोणही त्याच्यासोबत सहभागी होईल. या शूटिंग शेड्यूलला जाण्यापूर्वी शाहरुख काही दिवसांसाठी त्याच्या होम प्रॉडक्शन चित्रपटाचे शूटिंग पुण्यात सुरू करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपटाचे दिग्दर्शक अटली यांनी त्यांच्या टीमसह गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यात तळ ठोकून आहेत.

दुहेरी भूमिका चर्चेत

दिग्दर्शक अॅटलीचा चित्रपट एक अॅक्शन थ्रिलर असल्याचे म्हटले जाते ज्यात शाहरुख खान दुहेरी भूमिकेत आहे. तो एका भूमिकेत गुन्हेगार बनला आहे आणि दुसऱ्या भूमिकेत कायद्याचा रक्षक आहे. याआधी शाहरुखने ‘डुप्लीकेट’, ‘पहेली’, ‘डॉन’ आणि ‘फॅन’ या आणखी चार चित्रपटांमध्ये दुहेरी भूमिका केल्या आहेत, त्यापैकी फक्त ‘डॉन’ बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला आहे. रेड चिलीज त्यांच्या नवीन दुहेरी भूमिकेच्या चित्रपटासंदर्भात एका कंपनीशी अनेक महिन्यांपासून चर्चेत आहे आणि चित्रपटाच्या बजेटशी संबंधित अडकलेले प्रकरण अद्याप पूर्ण झालेले नाही.

‘पठाण’ चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज झाल्यानंतर शाहरुख खानचा चित्रपट व्यवसायातील आत्मविश्वास पुन्हा वाढेल. शाहरुख त्याच्या ‘पठाण’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करून स्पेनहून परतल्यावर या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करेल. अटलीच्या या चित्रपटाव्यतिरिक्त, अशीही चर्चा आहे की त्याला दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांची एक कथा देखील आवडली आहे, ज्याचे शूटिंग पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत सुरू होऊ शकते.

हेही वाचा :

‘एखाद्या सेलिब्रिटीच्या मृत्यूला तमाशा बनवला जातो’, अनुष्का शर्माने शेअर केली झाकीर खानची ‘ती’ पोस्ट

‘त्यांना पाठिंबा देणाऱ्यांना आत्मनिरीक्षणाची गरज’, गीतकार जावेद अख्तरांनी केली आरएसएसची तुलना तालिबानशी!

Non Stop LIVE Update

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI