AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pathaan Movie | रिलीजच्या अगोदरच पठाण चित्रपटाचा बोलबाला, ॲडव्हान्स बुकिंग सुसाट सुरू

शाहरुख खान (Shah Rukh Khan) हा तब्बल चार वर्षांनंतर पठाण चित्रपटाच्या माध्यमातून बाॅलिवूडमध्ये जबरदस्त असे पुनरागमन करणार आहे.

Pathaan Movie | रिलीजच्या अगोदरच पठाण चित्रपटाचा बोलबाला, ॲडव्हान्स बुकिंग सुसाट सुरू
| Updated on: Jan 23, 2023 | 2:50 PM
Share

मुंबई : शाहरुख खान याचा बहुचर्चित आणि वादाच्या मोठ्या भोवऱ्यामध्ये अडकलेला पठाण (Pathaan) हा चित्रपट २५ जानेवारी रोजी रिलीज होतोय. चित्रपटातील बेशर्म रंग गाणे रिलीज झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. बेशर्म रंग या गाण्यामध्ये दीपिका पादुकोण हिने चक्क भगव्या रंगाची बिकिनी घातल्याने वादाला तोंड फुटले. विशेष म्हणजे अनेकांनी चित्रपटामधून हे गाणे काढून टाकण्याची मागणीच थेट केली होती. शाहरुख खान (Shah Rukh Khan) हा तब्बल चार वर्षांनंतर पठाण चित्रपटाच्या माध्यमातून बाॅलिवूडमध्ये जबरदस्त असे पुनरागमन करणार आहे. २०२३ हे वर्ष शाहरुख खान याच्यासाठी अत्यंत खास असून पठाणनंतर लगेचच त्याचा डंकी हा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

शाहरुख खान याच्या पठाण चित्रपटामुळे अजूनही मोठा वाद सुरू असून अनेकांनी चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मोहिम सुरू केलीये. सोशल मीडियावर सतत बॉयकॉट पठाणचा ट्रेंड देखील सुरू आहे.

एकीकडे पठाण चित्रपटाला प्रचंड विरोध सुरू असतानाच दुसरीकडे मात्र, शाहरुख खान याच्या चाहत्यांमध्ये पठाण चित्रपटाविषयी मोठी क्रेझ बघायला मिळत आहे. सांगलीमध्ये तर शाहरुख खान याच्या एका चाहत्याने अख्खे थिएटरच २५ तारखेला बुक केले.

२५ जानेवारीला जरी शाहरुख खान याचा चित्रपट रिलीज होत असला तरीही गेल्या दोन दिवसांपासून चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग करण्यावर चाहत्यांचा भर दिसत आहे.

विशेष बाब म्हणजे अत्यंत महाग तिकिटे देखील शाहरुख खान याचे चाहते खरेदी करताना दिसत आहेत. बेशर्म रंग गाण्यावरून झालेला वाद हा चित्रपटासाठी फायदेशीर ठरत असल्याचे दिसत आहे.

पठाण चित्रपटाचे 2400 ते 2200 तिकिटे देखील चाहते मोठ्या प्रमाणात बुक करत आहेत. म्हणजेच काय तर शाहरुख खान याचा पठाण चित्रपट हीट ठरण्याची दाट शक्यता आहे.

शाहरुख खान याचे चाहते गेल्या कित्येक दिवसांपासून त्याचा पठाण या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात होते. शेवटी आता पठाण हा चित्रपट २५ जानेवारीला चाहत्यांच्या भेटीला येतोय.

पठाण चित्रपटामध्ये शाहरुख खान याच्यासोबत दीपिका पादुकोण ही देखील मुख्य भूमिकेत आहे. पठाण चित्रपटातील बेशर्म रंग या गाण्यामध्ये दीपिका पादुकोण हिचा अत्यंत बोल्ड लूक दिसतोय.

पठाण चित्रपटाच्या अगोदर दीपिका आणि शाहरुख खान यांनी चेन्नई एक्सप्रेस या चित्रपटामध्ये काम केले होते. या चित्रपटाने बाॅक्स आॅफिसवर धमाका केला होता.

Follow Us
गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील ...
Sanjay Raut | गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील हुकूमशाही...
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली..
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली बाप्पांची मूर्ती
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव...
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव शंकर थीम ठरतेय आकर्षण
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश,
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश, ट्वीट करत दिल्या शुभेच्छा
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ