Shahid Kapoor: “मला तुझ्यासोबत राहायचं नाही”; पत्नी मीराचे हे शब्द ऐकताच शाहिदला बसला धक्का!

अभिषेक चौबे दिग्दर्शित 'उडता पंजाब' (Udta Punjab) हा चित्रपट अभिनेता शाहिद कपूरच्या (Shahid Kapoor) करिअरमधील सर्वांत महत्त्वाच्या चित्रपटांपैकी एक आहे. 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात शाहिदने ड्रग्जच्या अधीन गेलेल्या रॉकस्टारची भूमिका साकारली होती.

Shahid Kapoor: मला तुझ्यासोबत राहायचं नाही; पत्नी मीराचे हे शब्द ऐकताच शाहिदला बसला धक्का!
Shahid Kapoor and Mira Rajput
Image Credit source: Instagram
| Updated on: Apr 06, 2022 | 9:37 AM

अभिषेक चौबे दिग्दर्शित ‘उडता पंजाब’ (Udta Punjab) हा चित्रपट अभिनेता शाहिद कपूरच्या (Shahid Kapoor) करिअरमधील सर्वांत महत्त्वाच्या चित्रपटांपैकी एक आहे. 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात शाहिदने ड्रग्जच्या अधीन गेलेल्या रॉकस्टारची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील त्याच्या दमदार अभिनयाचं प्रेक्षक-समीक्षकांकडून खूप कौतुक झालं होतं. मात्र हाच चित्रपट त्याच्या वैवाहिक आयुष्यात सर्वांत मोठी समस्या बनली होती. शाहिदची पत्नी मीरा राजपूतने (Mira Rajput) हिने पहिल्यांदा जेव्हा त्याचा हा चित्रपट पाहिला, त्यानंतर तिची काय प्रतिक्रिया होती, याविषयीचा खुलासा नुकताच त्याने एका मुलाखतीत केला. ‘उडता पंजाब’ पाहिल्यानंतर मीरा शाहिदला थेट म्हणाली होती, “मला तुझ्यासोबत राहायचं नाही.” त्यावेळी हे दोघं नुकतेच विवाहबद्ध झाले होते. मीराच्या तोंडून ते शब्द ऐकल्यानंतर शाहिदला धक्काच बसला.

‘न्यूज 18’ला दिलेल्या मुलाखतीत शाहिदला त्याच्या स्वभावाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. तू खऱ्या आयुष्यातही रागीट आणि तापट स्वभावाचा आहेस का, असं त्याला विचारण्यात आलं होतं. त्यावर तो म्हणाला, “मी अजिबात तापट स्वभावाचा नाही. पण माझ्यासोबत खूप मजेशीर घटना घडली. त्यावेळी मीरा आणि माझं नुकतंच लग्न झालं होतं आणि उडता पंजाब प्रदर्शित होण्याआधी मी तिला तो चित्रपट पाहण्यासाठी घेऊन गेलो होतो. एडिटिंग रुममध्ये तिने इंटर्व्हलपर्यंतचा चित्रपट पाहिला. इंटर्व्हल झाल्यानंतर जेव्हा मी तिच्याकडे पाहिलं, तेव्हा ती चक्क माझ्यापासून पाच फूट अंतरावर जाऊन बसली होती. मी तिला विचारलं, “काय झालं?” अरेंज मॅरेज असल्यामुळे त्यावेळी आम्ही एकमेकांना फारसे ओळखत नव्हतो. तिने मला विचारलं, “तू खऱ्या आयुष्यात त्याच्यासारखा आहेस का? मला तुझ्यासोबत राहायचं नाहीये.” तेव्हा मी तिला समजावून सांगितलं की, मी चित्रपटातील टॉमी सिंगच्या भूमिकेसारखा खऱ्या आयुष्यात अजिबात नाही.”

शाहिद-मीरा

उडता पंजाब या चित्रपटात शाहिदसोबत करिना कपूर, आलिया भट्ट आणि दिलजित दोसांज यांच्याही भूमिका आहेत. शाहिद आणि मीराने 7 जुलै 2015 रोजी गुरुग्राममध्ये लग्नगाठ बांधली. या दोघांनी मिशा ही मुलगी आणि झैन हा मुलगा आहे. 2016 मध्ये मिशाचा जन्म झाला तर 2018 मध्ये मीराने झैनला जन्म दिला.

हेही वाचा:

‘ही हृतिकची गर्लफ्रेंड आहे की मुलगी?’; हातात हात घालून चालतानाचा VIDEO पाहिल्यावर नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Aai Kuthe Kay Karte: ‘नाहीतर लोक मला जोड्याने मारतील’, मेधाताईंसोबतच्या सीन्सबद्दल अनिरुद्धची लेखिकेला खास विनंती