वर्षभरही टिकलं नाही नातं; शमिता शेट्टी-राकेश बापटचं ब्रेकअप?

'बिग बॉस ओटीटी'मध्ये (Bigg Boss OTT) सर्वाधिक चर्चा झाली अभिनेत्री शमिता शेट्टी (Shamita Shetty) आणि राकेश बापटची (Raqesh Bapat). या शोदरम्यान दोघांमध्ये चांगली मैत्री झाली आणि हळूहळू या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं.

वर्षभरही टिकलं नाही नातं; शमिता शेट्टी-राकेश बापटचं ब्रेकअप?
Shamita Shetty and Raqesh Bapat
Image Credit source: Voot
| Edited By: | Updated on: Mar 12, 2022 | 2:00 PM

‘बिग बॉस ओटीटी’मध्ये (Bigg Boss OTT) सर्वाधिक चर्चा झाली अभिनेत्री शमिता शेट्टी (Shamita Shetty) आणि राकेश बापटची (Raqesh Bapat). या शोदरम्यान दोघांमध्ये चांगली मैत्री झाली आणि हळूहळू या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं. फक्त पब्लिसिटीसाठी आणि बिग बॉस या शोपुरता या दोघांनी रिलेशनशिपमध्ये असल्याचं नाटक केलं, अशी टीका सोशल मीडियावर केली जात होती. मात्र बिग बॉसच्या शोमधून बाहेर पडल्यानंतरही या दोघांना अनेकदा एकत्र पाहिलं गेलं. माध्यमांसमोरही दोघांनी प्रेमाची कबुली दिली. मात्र आता या दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चा सोशल मीडियावर होऊ लागल्या आहेत. राकेश आणि शमितामध्ये मतभेद असून त्यामुळेच दोघांनी ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला, अशी चर्चा आहे.

शमिताने या ब्रेकअपच्या चर्चांवर उत्तर दिलं आहे. एका वेबसाइटने दिलेलं वृत्त शेअर करत शमिताने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये लिहिलं, ‘आमच्या रिलेशनशिपच्या बाबतीत पसरणाऱ्या अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. यामध्ये काहीच तथ्य नाही.’ सोशल मीडियावरील आणखी एका व्हिडीओमध्ये शमिताने पापाराझींचे आभार मानले आहेत. राकेश आणि तुझी जोडी खूप चांगली दिसते, अशा शब्दांत कौतुक करणाऱ्या पापाराझीला शमिताने ‘थँक्यू’ असं म्हटलं आहे. त्याचसोबत सोशल मीडियावर राकेशचा एक फोटो शेअर करत तिने त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. एका मीडिया इव्हेंटमधला हा फोटो असून यामध्ये राकेशच्या हातात एक प्रमाणपत्र असल्याचं पहायला मिळत आहे.

गेल्या महिन्यात दिलेल्या एका मुलाखतीत शमिताने तिच्या लग्नाविषयी वक्तव्य केलं. “लग्नाचा विचार करणं खूप घाईच असेल. आता त्याने जरी लग्नाची मागणी घातली तर मी पळून जाईन आणि मी जरी त्याला विचारलं तरी तो पळून जाईल. आम्हाला एकमेकांना ओळखण्यासाठी आणखी काही वेळ हवा”, असं शमिता ‘सिद्धार्थ कन्नन’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली.

हेही वाचा:

आधी ‘झुंड’वर ‘पावनखिंड’ भारी, आता ‘द काश्मीर फाईल्सनं’ दाबलं, IMDb रेटिंग्ज पाहिलात का?

प्रभासला ‘द काश्मीर फाइल्स’ची जोरदार टक्कर; निवडक शो असूनही चांगली कमाई