AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लग्नानंतर पहिल्यांदाच या चित्रपटामध्ये स्क्रिन शेअर करताना दिसणार सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी

सिद्धार्थ आणि कियारा यांनी नुकताच लग्नगाठ बांधली आहे. गेल्या काही वर्षांपासून सतत कियारा आणि सिद्धार्थ यांच्या लग्नाच्या चर्चा सुरू होत्या आणि त्यांनी शेवटी आता लग्न केले. लवकर ही जोडी एका चित्रपटामध्येसोबत काम करताना दिसणार आहे.

लग्नानंतर पहिल्यांदाच या चित्रपटामध्ये स्क्रिन शेअर करताना दिसणार सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी
| Updated on: Mar 06, 2023 | 5:54 PM
Share

मुंबई : बाॅलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी (Kiara Advani) हे 7 फेब्रुवारी रोजी लग्नबंधणात अडकले आहेत. सिद्धार्थ आणि कियारा यांचा अत्यंत शाही पध्दतीने विवाहसोहळा हा पार पडलाय. राजस्थानमधील जैसलमेर येथे अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये कियारा आणि सिद्धार्थ यांनी सातफेरे घेतले. आता सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra) आणि कियारा अडवाणी यांच्या चाहत्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. लग्नानंतर पहिल्यांदाच कियारा आणि सिद्धार्थ हे एका मोठ्या चित्रपटामध्येसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांना स्क्रीन शेअर करताना पाहण्यास चाहते आतुर आहेत.

कियारा आणि सिद्धार्थ यांच्या लग्नामध्ये अत्यंत जवळचे लोक सहभागी झाले होते. यामध्ये करण जोहर हा देखील होता. अशी एक चर्चा होती की, करण जोहर याने सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांना लग्नाचे खास गिफ्ट देत थेट तीन चित्रपटांसाठी त्यांना साईन केले आहे.

आता खरोखरच करण जोहर याच्या चित्रपटामध्ये सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांची जोडी प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. आता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांची जोडी लग्नानंतर चित्रपटामध्ये काय धमाला करते हे पाहण्यासारखे ठरणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाची शूटिंगही लवकरच केली जाणार असल्याचे कळत आहे.

बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी ही जोडी पुन्हा एकदा पडद्यावर पाहायला मिळणार आहे. लग्नानंतर दोघांचा हा पहिलाच चित्रपट रोमँटिक आणि कॉमेडी चित्रपट असेल. हा चित्रपट करण जोहर याच्या धर्मा प्रॉडक्शन हाऊस बनवला जाणार आहे.

सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी यांनी काही वर्ष डेट करून लग्न केले. मिशन मजनू या चित्रपटामध्ये सिद्धार्थ मल्होत्रा ​​जबरदस्त भूमिकेमध्ये दिसला होता. लग्नाच्या चर्चांदरम्यान सिद्धार्थ मल्होत्रा म्हणाला होता की, माझ्या पर्सनल आयुष्यामध्ये लक्ष देण्यापेक्षा माझ्या चित्रपटांवर अधिक लक्ष चाहत्यांनी द्यावे, अशी माझी इच्छा आहे. मिशन मजनू या चित्रपटाचा पाकिस्तानमध्ये विरोध केला जात होता.

एका रिपोर्टनुसार, कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​यांनी शशांक खेतान याचा नवीन चित्रपटासाठी साईन केला आहे. म्हणजेच काय तर आता कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांची जोडी मोठ्या पडद्यावर धमाका करणार आहे.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.