AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shreya Ghoshal | श्रेया घोषालच्या बाळाचं नामकरण, त्रिकोणी कुटुंबाचा पहिला फोटोही शेअर

22 मे रोजी प्रसिद्ध पार्श्वगायिका श्रेया घोषालच्या मुलाचा जन्म झाला (Shreya Ghoshal names her baby boy Devyaan)

Shreya Ghoshal | श्रेया घोषालच्या बाळाचं नामकरण, त्रिकोणी कुटुंबाचा पहिला फोटोही शेअर
श्रेया घोषालने तिघांचा फोटो शेअर केला
| Updated on: Jun 02, 2021 | 2:49 PM
Share

मुंबई : बॉलिवूडची सुरेल गायिका श्रेया घोषाल (Shreya Ghoshal) नुकतीच आई झाली. श्रेयाने आपल्या बाळाचं नामकरण केलं असून पहिला फोटोही सोशल मीडियावर शेअर केला. बाळाचं नाव देवयान (Devyaan Mukhopadhyaya) ठेवल्याचं श्रेयाने ट्विटरवरुन जाहीर केलं. पती शिलादित्य मुखोपाध्याय (Shiladitya Mukhopadhyaya) सोबत त्रिकोणी कुटुंबाचा गोड फोटो तिने अपलोड केला आहे. (Singer Shreya Ghoshal names her baby boy Devyaan Mukhopadhyaya shares first picture with husband Shiladitya Mukhopadhyaya)

“सादर करत आहोत- ‘देवयान मुखोपाध्याय’ 22 मे रोजी त्याचं आगमन झालं आणि आमचं आयुष्य कायमचं बदललं. जन्माच्या पहिल्या चाहुलीनेच त्याने आमचे अंतःकरणावर ममत्व आणि पितृत्वाने भरुन टाकले. निर्मळ अतोनात प्रेम” असं ट्वीट श्रेयाने केलं आहे.

22 मे रोजी बाळाचा जन्म

देवाने आम्हाला मुलाच्या स्वरुपात अनमोल आशीर्वाद दिला आहे. ती खूप इमोशनल गोष्ट आहे. यापूर्वी असे कधी वाटले नव्हते. शिलादित्य आणि मी हा आनंद आमच्या कुटूंबियांसमवेत साजरा करत आहोत. तुमच्या सर्व आशीर्वादांबद्दल तुमचे आभार’ असं म्हणत श्रेयाने आनंदाची बातमी शेअर केली होती. (Shreya Ghoshal names her baby boy Devyaan)

प्रियकर शिलादित्य मुखोपाध्यायसोबत लग्नगाठ

अनेक वर्षांच्या डेटिंगनंतर श्रेयाने 2015 मध्ये प्रियकर शिलादित्य मुखोपाध्यायसोबत लग्नगाठ बांधली होती. श्रेयाने अगदी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थित लग्न केलं होतं. विशेष म्हणजे तिने त्यावेळी लग्नातला केवळ एकच फोटो शेअर केला होता. त्यानंतर तब्बल पाच वर्षांनंतर तिने तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. बंगाली रितीरिवाजानुसार श्रेया-शिलादित्यचं लग्न झालं होतं.

श्रेयाची कारकीर्द

छोट्या पडद्यावरील ‘सा रे ग म प’ ही स्पर्धा जिंकल्यानंतर श्रेयाने तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. तिने ‘देवदास’ या हिंदी चित्रपटातून पार्श्वगायिका म्हणून कलाविश्वात पदार्पण केले. या चित्रपटातील गायनासाठी तिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वात्कृष्ट पार्श्वगायिकेसाठीच्या फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. श्रेयाची हिंदी, मराठीसह अनेक भाषांमध्ये गाणी गाजली आहेत. श्रेया सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असते. बऱ्याच वेळा श्रेया पती शिलादित्यसोबतचे फोटो शेअर करत असते.

संबंधित बातम्या :

Good News | श्रेया घोषालच्या घरी चिमुकल्याचे आगमन, गोड बातमी देताना झाली भावूक

(Singer Shreya Ghoshal names her baby boy Devyaan Mukhopadhyaya shares first picture with husband Shiladitya Mukhopadhyaya)

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.