आणि शैलेंद्रंनी माचिसच्या काडीनेच लिहून काढलं दिलीप कुमारांच्या ‘दाग’ चित्रपटाचं प्रसिद्ध गाणं! वाचा किस्सा

ज्येष्ठ गीतकार शैलेंद्र (Lyricist Shailendra) यांनी आपल्या लेखणीतून तयार झालेल्या सदाबहार गाण्यांनी रसिकांच्या हृदयाला स्पर्श केला आहे. शैलेंद्र यांच्या लेखणीतून निघालेली मधुर गाणी आजही श्रोत्यांचे मन प्रसन्न करतात. 1950 आणि 1960च्या दशकात शैलेंद यांनी हिंदी चित्रपटसृष्टीला एकापेक्षा एक सर्वोत्कृष्ट गाणी दिली, जी आपण आजही तल्लीन होऊन ऐकतो.

आणि शैलेंद्रंनी माचिसच्या काडीनेच लिहून काढलं दिलीप कुमारांच्या ‘दाग’ चित्रपटाचं प्रसिद्ध गाणं! वाचा किस्सा
शैलेंद्र

मुंबई : ज्येष्ठ गीतकार शैलेंद्र (Lyricist Shailendra) यांनी आपल्या लेखणीतून तयार झालेल्या सदाबहार गाण्यांनी रसिकांच्या हृदयाला स्पर्श केला आहे. शैलेंद्र यांच्या लेखणीतून निघालेली मधुर गाणी आजही श्रोत्यांचे मन प्रसन्न करतात. 1950 आणि 1960च्या दशकात शैलेंद यांनी हिंदी चित्रपटसृष्टीला एकापेक्षा एक सर्वोत्कृष्ट गाणी दिली, जी आपण आजही तल्लीन होऊन ऐकतो. हिंदी सिनेमाला अनेक हिट गाणी देणाऱ्या शैलेंद्र यांची अनेक गाणी आधुनिक भारताची गाणी बनली. शैलेंद्र यांच्याकडे अशी गाणी लिहिण्याची क्षमता होती की, त्यांच्या प्रत्येक गाण्यात एक गोष्ट होती, जी तुम्हाला त्यातील खोल अर्थाकडे खेचून आणेल.

शैलेंद्र यांची गाणी निसर्ग, बालपण, प्रणय, दुःख, वेदना, प्रेम, आशावाद, अध्यात्म आणि कधीकधी विनोदावर भाष्य करणारी होती. इतकी सोपी गाणी लिहिणारे हे गीतकार एक दिवस गाणी लिहिण्यात इतके अडकले की त्यांना स्वतःचे गाणे चक्क माचिसच्या काडीने लिहावे लागले होते.

चला तर, शैलेंद्रशी संबंधित हा किस्सा जाणून घेऊया जो तुम्ही क्वचितच ऐकला असावा…

धून तयार होती, पण शब्द नव्हते!

1952च्या काळात जेव्हा दिलीप कुमार स्टारर चित्रपट ‘दाग’ चे काम चालू होते, तेव्हा हा किस्सा घडला आहे. अन्नू कपूर यांनी त्यांच्या एका शोमध्ये या चित्रपटाचा किस्सा सांगितला होता. दिलीप कुमार यांच्या ‘दाग’ या चित्रपटातील एक गाणे रेकॉर्ड करायचे होते. गाण्याची धून तयार होती, पण गाणे तयार नव्हते. या दरम्यान, एक दिवशी चित्रपटाचे गीतकार शैलेंद्र स्टुडिओमध्ये थांबले होते. शैलेंद्र स्टुडिओत पोहचताच त्यांना चित्रपटाचे संगीतकार शंकर-जयकिशन यांनी गाण्याच्या बोलांबद्दल विचारले. त्यावर शैलेंद्र यांनी त्यांना उत्तर दिले की, गाणे अजून तयर नाही, पण मला गाण्याची पूर्ण कल्पना सुचली आहे आणि हे गाणे कागदावर उतरवण्यासाठी मला फक्त अर्धा तास हवा आहे.

उद्यानात बसून लिहिले गाणे

शंकर-जयकिशन यांनी शैलेंद्र यांना अर्धा तास दिला. आता शैलेंद्र संगीतकार दत्ता राम यांच्याबरोबर जवळच्या उद्यानात गेले. शैलेंद्र यांना शब्द सुचत नव्हते, म्हणून ते केवळ पाने फाडून पार्कमध्ये फेकण्याचे काम करत होते. यावेळी त्यांच्यासोबत सिगारेटचे भरपूर पफ होते. जेव्हा जेव्हा एखाद्या सुराची गरज भासत, तेव्हा दत्ता राम त्यांना गाऊन सांगत की, हे सूरांचे मीटर आहे. हळू हळू वेळ जात होता, पण हे गाणे काही तयार होत नव्हते. या दरम्यान त्यांनी गाणे लिहिण्याच्या नादात सुमारे 12-15 सिगारेट फुकल्या होत्या.

शब्द सुचले आणि पेनाची शाई संपली!

जिथे ते उद्यानात बसले होते, तिथे तीन गोष्टींचा ढीग पडला होता. एक फाटलेल्या पानांचा होता, दुसरा सिगारेटचा आणि तिसरा सिगारेट पेटवण्यासाठी वापरल्या गेलेल्या मॅचस्टिकचा. दरम्यान, अचानक शैलेंद्र यांनी आनंदाने उडीच मारली. ते मोठ्याने ओरडू लागले, सुचले, सुचले!. आता शैलेंद्र यांनी गाणे लिहायला सुरुवात करताच, त्यांच्या पेनाची शाई संपली. शैलेंद्र कोणालाही नवीन पेन घेण्यासाठी पाठवू शकत नव्हते, कारण जर कोणी नवीन पेन घेऊन येईपर्यंत ते थांबले असते, तर त्यांनी गाण्यासाठी विचार केलेले शब्द आणि इतर सगळे विचार त्यांच्या मनातून निघून गेले असते. गाण्याच्या बोल त्यांच्या मनात झिरपू लागले होते. पण कागदावर उतरवता येत नसल्याने ते हतबल झाले होते.

समोर दिसला माचिसच्या काड्यांचा ढीग!

गाणे कसे लिहावे याचा ते विचार करत होते की, अचानक त्यांना समोर मॅच स्टिक्सचा ढीग दिसला. त्यांनी लगेचच एक एक करून त्या जळलेल्या काड्या उचलण्यास सुरुवात केली आणि या गाण्याचे बोल त्यांनी त्या काजळीने कागदावर लिहायला सुरुवात केली. या मॅचस्टिकच्या मदतीने त्यांनी ‘डाग’ चित्रपटाचे प्रसिद्ध गाणे लिहिले, जे आजही लोकांना खूप आवडते. ते गाणे आहे- ‘मेरे दिल कहीं और चल, गम की दुनिया से दिल भर गया, ढूंढ ले अब कोई घर नया…’  हे गाणे दिग्गज गायक तलत मेहमूद यांनी त्यांच्या मधुर आवाजात गायले होते.

हेही वाचा :

पित्याच्या ‘काळ्या कमाई’पासून मुलांना दूर ठेवणार, शिल्पा शेट्टी राज कुंद्राचं घर सोडून वेगळी राहणार?

लग्नाचं नातं टिकवण्यासाठी समंथा अक्किनेनी मनोरंजन विश्वाचा निरोप घेणार? जाणून घ्या नेमकं काय म्हणाली अभिनेत्री…

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI