पित्याच्या ‘काळ्या कमाई’पासून मुलांना दूर ठेवणार, शिल्पा शेट्टी राज कुंद्राचं घर सोडून वेगळी राहणार?

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) गेल्या काही महिन्यांपासून खूप अडचणींना सामोरी जात आहे. शिल्पाचा पती राज कुंद्रा (Raj Kundra) सध्या पोलीस कोठडीत आहे आणि अभिनेत्री एकटीच तिच्या कुटुंबाची आणि मुलांची काळजी घेत आहे.

पित्याच्या ‘काळ्या कमाई’पासून मुलांना दूर ठेवणार, शिल्पा शेट्टी राज कुंद्राचं घर सोडून वेगळी राहणार?
शिल्पा शेट्टी

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) गेल्या काही महिन्यांपासून खूप अडचणींना सामोरी जात आहे. शिल्पाचा पती राज कुंद्रा (Raj Kundra) सध्या पोलीस कोठडीत आहे आणि अभिनेत्री एकटीच तिच्या कुटुंबाची आणि मुलांची काळजी घेत आहे. शिल्पा हळूहळू तिचे आयुष्य पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. ती पुन्हा एकदा आपल्या शोच्या शुटींगमध्ये व्यस्त झाली आहे आणि मुलांची पूर्ण काळजीही घेत आहे. पण या दरम्यान आता अभिनेत्रीबद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे.

बॉलिवूड हंगामाच्या अहवालानुसार शिल्पा तिच्या दोन मुलांसोबत स्वतंत्रपणे राहण्याचा विचार करत आहे. वेबसाईटनुसार, अभिनेत्रीचा एक जवळचा मित्र म्हणाला की, राज कुंद्राच्या मागचा वाद कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत चालला आहे. राज कुंद्राचे नाव अश्लील चित्रपट प्रकरणात आल्या नंतर शिल्पा शेट्टीला धक्का बसला आहे. या पैशातूनचा हिरे आणि राजची कमाई येत आहे, हे शिल्पाला माहित देखील नव्हते.

स्व:कमाईतून मुलांचं संगोपन करणार!

रिपोर्ट्सनुसार, शिल्पाला तिच्या मुलांना राजने चुकीच्या पद्धतीने कमावलेल्या पैशांपासून दूर ठेवायचे आहे. तिला राजची कमाई वापरायची नाही. रिअॅलिटी शो जज करून तिने स्वतः कमावलेल्या पैशातून ती मुलांचे संगोपन करणार आहे आणि आता ती आणखी चित्रपटांमध्ये देखील काम करणार आहे. चित्रपट निर्माते अनुराग बासू आणि प्रियदर्शन यांनी शिल्पाला वचन दिले आहे की, ते तिला चित्रपटात काम देतील. जरी, राज बराच काळ पोलीस कोठडीत राहिला, तरी अभिनेत्रीला अधिक समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही.

आता ही बातमी कितपत खरी आहे की खोटी, हे स्वतः शिल्पा शेट्टीच सांगू शकते. आता शिल्पा राजच्याच घरात राहणार की, मुलांना घेऊन वेगळी राहणार यावर तिने अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेले नाही.

चाहत्यांना दिल्या जन्माष्टमीच्या शुभेच्छा

जन्माष्टमीच्या निमित्ताने सर्व चाहत्यांचे अभिनंदन करताना शिल्पाने एक संदेश लिहिला की, “श्री कृष्ण जन्माष्टमीच्या तुम्हा सर्वांना अनेक शुभेच्छा. बाल गोपाळ आपल्या सर्वांवर आशीर्वाद देवो.” यासह, शिल्पाने भगवद्गीतेतील एक ओळ लिहिली की, ‘देव त्यांच्याबरोबर आहे ज्यांचे मन आणि आत्मा इच्छा आणि क्रोधांपासून मुक्त आहेत आणि जे स्वतःला ओळखतात.’

शिल्पाचे प्रेक्षकांना आवाहन

शिल्पा शेट्टीचा ‘हंगामा 2’ हा चित्रपट जुलैमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाद्वारे शिल्पाने 10 वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले. शिल्पा या चित्रपटाबद्दल खूप उत्सुक होती, पण राज कुंद्राला नेमकी चित्रपट रिलीज होण्याच्या काही दिवस आधी अटक करण्यात आली. या प्रकरणामुळे शिल्पाच्या सगळ्या उत्साह आणि आनंदावर विरजण पडले.

मात्र शिल्पाने चाहत्यांना हा चित्रपट पाहण्याचे आवाहन केले होते. तिने असा संदेश लिहिला होता की, हा चित्रपट बनवण्यासाठी अनेकांनी खूप मेहनत घेतली आहे, त्यामुळे हा चित्रपट नक्की बघा. चित्रपटात शिल्पा व्यतिरिक्त परेश रावल, मीजान जाफरी आणि राजपाल यादव होते. या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. आता लवकरच शिल्पा शेट्टी ‘निकम्मा’ या आगामी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात शिल्पासोबत अभिमन्यू दासानी आणि शर्ली सेटीया मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

हेही वाचा :

लग्नाचं नातं टिकवण्यासाठी समंथा अक्किनेनी मनोरंजन विश्वाचा निरोप घेणार? जाणून घ्या नेमकं काय म्हणाली अभिनेत्री…

‘राधे-राधे’ म्हणत स्वप्नील जोशीनं शेअर केले थ्रो बॅक फोटो, श्रीकृष्णाचं हे सुंदर रुप पाहाच

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI