
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) हिचे करोडपती कॉनमन सुकेश चंद्रशेखरसोबतचे (Sukesh Chandrashekhar) संबंध गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. सुकेश चंद्रशेखर विरुद्ध दाखल करण्यात आलेल्या 200 कोटी रुपयांच्या पीएमएलए प्रकरणात ईडीने अभिनेत्रीची अनेकदा चौकशी देखील केली आहे.
सुकेश चंद्रशेखरने कथितरित्या जॅकलिनला अनेक लक्झरी भेटवस्तू दिल्या, ज्यात जिम वेअरसाठी गुच्ची आउटफिट्स, गुच्ची शूज, रोलेक्स घड्याळ, 15 जोड्या महागडे कानातले, 5 बिर्किन बॅग, हर्मीस ब्रेसलेट आणि एलव्ही बॅग यांचा समावेश होता. या प्रकरणात दाखल झालेल्या आरोपपत्रानुसार त्याने जॅकलिनला एक मिनी कूपर गाडीही दिली होती, जी तिने परत केली. जॅकलिनची अमेरिकेत राहणारी बहीण गेराल्डिन फर्नांडिस हिलाही त्याने बीएमडब्ल्यू कार भेट दिल्याचे या आरोपपत्रात म्हटले आहे. आरोपपत्रानुसार त्याने जॅकलिनच्या आईला सुमारे $1,80,000 आणि एक पोर्चे कार देखील दिली.
आरोपांदरम्यान, एका ओटीटी निर्मात्याने नाव न सांगण्याच्या विनंतीवरून IndiaToday.in ला सांगितले की, चंद्रशेखर आणि जॅकलिनच्या कथेमध्ये त्याला प्रचंड रस आहे आणि त्यावर एक काल्पनिक सीरीज तयार करण्याची योजना आहे. एका सूत्राने वेबसाईटला सांगितले की, ‘हे प्रकरण या विषयावरील सीरीज किंवा माहितीपटासाठी योग्य कथानक आहे. त्यामुळे, याला चित्रपट किंवा वेब शोमध्ये कसे रुपांतरित करायचे यावर निर्मात्यांची आधीच चर्चा सुरू आहे. या प्रोजेक्टमध्ये चंद्रशेखर आणि जॅकलिनची भूमिका कोण करणार यावरही काही नावांची चर्चा सुरू आहे. अलीकडच्या काळात आपण पाहिलेले हे सर्वात मोठे कॉन ऑपरेशन आहे.’
दरम्यान, नोरा फतेही अशा अभिनेत्रींपैकी एक आहे, ज्यांना चंद्रशेखरने भेटवस्तू आणि लक्झरी वस्तूंचे आमिष दाखवले होते. लीक चॅट्सनुसार, चंद्रशेखरने नोराला विचारले होते की, तिला रेंज रोव्हर कार आवडते का? यावर नोराने उत्तर दिले की, ‘होय, ही एक चांगली रफ यूज कार आहे. ती गोंडस आहे, ही स्टेटमेंट कार आहे.’ नंतर त्याने उत्तर दिले, ‘मी तुम्हाला आणखी पर्याय दाखवतो.’
दुसर्या संभाषणात, चंद्रशेखरने नोराला बोलताना लिहिले की, ‘तुम्ही सर्व काही स्पष्ट करण्यासाठी एक मिनिट बोलू शकलात तर मला खूप आवडेल. मला माहित आहे की, तुम्ही किंवा तुमची एजन्सी ही भेट घेण्यापूर्वी का विचार करत असेल. मला हे स्पष्ट करायचे आहे की, ही भेट कोणत्याही हेतूने दिली जात नाहीय, परंतु जेव्हा तुम्हाला एखादी व्यक्ती आवडते तेव्हा तुम्ही त्यांना भेटवस्तू देता. हे फक्त त्या कारणासाठी करत आहे, बाकी काही नाही.’
या प्रकरणाचा तपास सुरू असताना नोरा आणि जॅकलिन या दोघांचीही ईडीने अनेकवेळा चौकशी केली आहे. सुकेश चंद्रशेखर सध्या तिहार तुरुंगात आहे.
Aishwarya Rai Bachchan | ‘बच्चन’ परिवार अडचणीत, ऐश्वर्या रायला ‘ईडी’चे समन्स! नेमकं प्रकरण काय?
Kajal Aggarwal | ‘सिंघम’ फेम अभिनेत्री काजल अग्रवालकडे ‘गुड न्यूज’? नव्या फोटोंमुळे चर्चेला उधाण!