Money Laundering Case : बॉलिवूड सेलिब्रिटींनी तुरुंगात जाऊनही घेतली सुकेश चंद्रशेखरची भेट, अनेक सेलिब्रिटी गोत्यात येणार!

Money Laundering Case : बॉलिवूड सेलिब्रिटींनी तुरुंगात जाऊनही घेतली सुकेश चंद्रशेखरची भेट, अनेक सेलिब्रिटी गोत्यात येणार!
Sukesh Chandrashekhar

200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात कॉनमॅन सुकेश चंद्रशेखरचे (Sukesh Chandrasekhar) बॉलिवूड सेलिब्रिटींसोबतचे कनेक्शनही समोर येत आहे. आतापर्यंत या प्रकरणात जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेही यांच्या नावानंतर आणखी अभिनेत्रींची नावे समोर आली आहेत.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Harshada Bhirvandekar

Dec 20, 2021 | 12:22 PM

मुंबई : 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात कॉनमॅन सुकेश चंद्रशेखरचे (Sukesh Chandrasekhar) बॉलिवूड सेलिब्रिटींसोबतचे कनेक्शनही समोर येत आहे. आतापर्यंत या प्रकरणात जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेही यांच्या नावानंतर आणखी अभिनेत्रींची नावे समोर आली आहेत. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, या प्रकरणाची चौकशी करत असलेल्या अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सांगितले की, त्याचे श्रद्धा कपूर आणि शिल्पा शेट्टीसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींशीही संबंध आहेत.

वेबसाईटनुसार, 2020च्या सुरुवातीला, जेव्हा सुकेश तुरुंगात होता, तेव्हा जवळपास 8 ते 10 बॉलिवूड सेलिब्रिटी त्याला भेटायला गेले होते. मात्र, त्यांच्या भेटीची वेळ आणि इतर तपशील अद्याप समजू शकलेले नाहीत.

सुकेशने दिली माहिती…

एएनआयच्या वृत्तानुसार, सुकेशने आपल्या वक्तव्यात सांगितले आहे की, तो श्रद्धा कपूरला 2015 पासून ओळखतो आणि NCB प्रकरणात अभिनेत्रीला मदतही केली होती. बाकीच्या सेलिब्रिटींबद्दल बोलताना, सुकेशने ईडीला सांगितले की, तो हरमन बावेजाला ओळखतो आणि तो त्यांच्यासोबत त्याचा पुढचा चित्रपट ‘कॅप्टन’ची सह-निर्मिती करणार होता, ज्यामध्ये कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सुकेशने त्याच्या वक्तव्यात असेही म्हटले आहे की, पती राज कुंद्राच्या प्रकरणाबाबत शिल्पा शेट्टीनेही त्याच्याशी संपर्क साधला होता.

मात्र, अहवालानुसार सुकेशने केलेले सर्व दावे खोटे असल्याचे ईडीचे म्हणणे आहे. याआधी ईडीने जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेही यांची सुकेशशी संबंधाबाबत चौकशी केली होती. केंद्रीय एजन्सीने सांगितले की, जॅकलिन आणि नोरा यांना आरोपींकडून टॉप मॉडेल लक्झरी वाहनांसह अनेक महागड्या भेटवस्तू मिळाल्या आहेत.

जॅकलिन मोठ्या अडचणीत?

या प्रकरणात जॅकलिनचे नाव आल्यापासून अभिनेत्री अडचणीत सापडली आहे. अभिनेत्रीला कुठेही जाण्यात बंदी घालण्यात आली आहे. या कारणामुळे ती भारताबाहेर जाऊन चित्रपटाचे शूटिंग करू शकणार नसल्याचे बोलले जात आहे. जॅकलिनच्या प्रोफेशनल लाईफबद्दल बोलायचे झाले, तर ती शेवटची ‘भूत पोलिस’ या चित्रपटात दिसली होती.

सध्या अभिनेत्रीचे अनेक चित्रपट रिलीजसाठी तयार आहेत ज्यात ‘अटॅक’, ‘बच्चन पांडे’, ‘सर्कस’ आणि ‘राम सेतू’ यांचा समावेश आहे. ‘अटॅक’चा टीझर नुकताच रिलीज करण्यात आला असून, त्याला खूप पसंती मिळाली. या चित्रपटात जॅकलिनसोबत जॉन अब्राहम आणि रकुल प्रीत सिंह मुख्य भूमिकेत आहेत.

हेही वाचा :

Aishwarya Rai Bachchan | ‘बच्चन’ परिवार अडचणीत, ऐश्वर्या रायला ‘ईडी’चे समन्स! नेमकं प्रकरण काय?

Kajal Aggarwal | ‘सिंघम’ फेम अभिनेत्री काजल अग्रवालकडे ‘गुड न्यूज’? नव्या फोटोंमुळे चर्चेला उधाण!

Bajrangi Bhaijaan 2 : ‘मुन्नी-बजरंगी’ची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार, ‘बाहुबली’ दिग्दर्शकाचे वडील लिहिणार कथा!


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें