Bajrangi Bhaijaan 2 : ‘मुन्नी-बजरंगी’ची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार, ‘बाहुबली’ दिग्दर्शकाचे वडील लिहिणार कथा!

Bajrangi Bhaijaan 2 : ‘मुन्नी-बजरंगी’ची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार, ‘बाहुबली’ दिग्दर्शकाचे वडील लिहिणार कथा!
Bajrangi Bhaijan 2

एसएस राजामौली दिग्दर्शित ‘आरआरआर’ (RRR) हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात आलिया भट्ट, राम चरण, ज्युनियर एनटीआर आणि अजय देवगण मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाची टीम सध्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Harshada Bhirvandekar

Dec 20, 2021 | 10:32 AM

मुंबई : एसएस राजामौली दिग्दर्शित ‘आरआरआर’ (RRR) हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात आलिया भट्ट, राम चरण, ज्युनियर एनटीआर आणि अजय देवगण मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाची टीम सध्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. RRR चा प्री-रिलीज कार्यक्रम रविवारी मुंबईत आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये बॉलिवूडचा भाईजान सलमान खान देखील उपस्थित होता.

या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सलमान खान थेट विमानतळावरून आला. तर, इथेच त्याने एक खास घोषणा केली आहे, ज्यानंतर त्याचे चाहते प्रचंड खूश झाले आहेत. सलमानने ‘बजरंगी भाईजान’ (Bajrangi Bhaijaan 2 ) या चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा केली आहे.

‘बजरंगी भाईजान’चा सिक्वेल बनवणार!

‘बजरंगी भाईजान’ हा सलमान खानच्या कारकिर्दीतील सर्वात सुपरहिट चित्रपटांपैकी एक आहे. आता तो या चित्रपटाचा सिक्वेल बनवणार आहे, अशी घोषणा त्यांनी केली आहे. या चित्रपटाची स्क्रिप्ट एसएस राजामौली यांचे वडील विजेंद्र प्रसाद लिहिणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी याची पटकथाही लिहिली आहे.

राजामौलीच्या वडिलांबद्दल बोलताना सलमान खानने अचानक ही गोष्ट सर्वांना सांगितली. सलमान खान म्हणाला की, राजामौली यांच्या वडिलांनी त्यांना त्यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम चित्रपट दिला आहे. याला उत्तर देताना चित्रपट निर्माता करण जोहरने विचारले की, तुम्ही या चित्रपटाची अधिकृत घोषणा करत आहे का? यावर सलमान म्हणाला- हो करण. बजरंगी भाईजानने बॉक्स ऑफिसवर 300 कोटींची कमाई केली होती आणि आतापर्यंत बॉलीवूडमधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या ‘टॉप 5’ चित्रपटांच्या यादीत त्याचा समावेश आहे.

‘बजरंगी भाईजान 2’ची अधिकृत घोषणा!

यापूर्वी पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत केव्ही विजेंद्र प्रसाद यांनी सांगितले होते की, बजरंगी भाईजानच्या सिक्वेलसाठी ते एक कथा लिहिण्याचा प्रयत्न करत आहे. ते म्हणाले की, मी ‘बजरंगी भाईजान 2’ क्रॅक करण्याचा प्रयत्न करत आहे. मी सलमानला याची कल्पना दिली आणि तो खूप उत्साहित आहे. पण, मी ते योग्य मार्गाने करण्याचा प्रयत्न करत आहे. ते पुढे म्हणाले की, जेव्हा मी सलमानला अशा प्रकारे भेटलो तेव्हा मी त्याला बजरंगी भाईजानच्या सिक्वेलची कल्पना दिली आणि हे जाणून त्याला खूप आनंद झाला.

‘बजरंगी भाई’जानचे दिग्दर्शन कबीर खान यांनी केले होते. या चित्रपटात त्याच्यासोबत करीना कपूर आणि नवाजुद्दीन सिद्दीकी मुख्य भूमिकेत दिसले होते. हा चित्रपट 17 जुलै 2015 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता.

हेही वाचा :

83 : दिग्दर्शक कबीर खाननं केला खुलासा; म्हणाला, चित्रपट पाहताना रडत होती दीपिका पदुकोण

Disha Patani Photoshoot: अभिनेत्री दिशा पाटनीच्या बोल्ड लूकने वाढला इंटरनेटचा पारा!

Oo Antava : समंतानं रिजेक्ट केलं होतं गाणं, कुणी आणि कशी काढली तिची समजूत?


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें