Kajal Aggarwal | ‘सिंघम’ फेम अभिनेत्री काजल अग्रवालकडे ‘गुड न्यूज’? नव्या फोटोंमुळे चर्चेला उधाण!

Kajal Aggarwal | ‘सिंघम’ फेम अभिनेत्री काजल अग्रवालकडे ‘गुड न्यूज’? नव्या फोटोंमुळे चर्चेला उधाण!
Kajal Aggrawal

साऊथ अभिनेत्री काजल अग्रवाल (Kajal Aggarwal) सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अभिनेत्री दररोज तिचे सुंदर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. सध्या अभिनेत्री तिचा पती गौतम किचलू (Gautam Kitchlu) याच्यासोबत क्वालिटी टाइम घालवतानाचे फोटोही सोशल मीडियावर शेअर करते.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Harshada Bhirvandekar

Dec 20, 2021 | 10:56 AM

मुंबई : साऊथ अभिनेत्री काजल अग्रवाल (Kajal Aggarwal) सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अभिनेत्री दररोज तिचे सुंदर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. सध्या अभिनेत्री तिचा पती गौतम किचलू (Gautam Kitchlu) याच्यासोबत क्वालिटी टाइम घालवतानाचे फोटोही सोशल मीडियावर शेअर करते. अलीकडेच, अभिनेत्रीने रविवारी मैत्रिणीसोबत लंच आउटिंगचे फोटो शेअर केले आहेत.

शेअर केलेल्या या फोटोंमध्ये काजल खूपच सुंदर दिसत होती. अभिनेत्रीने बॉडी कॉन आउटफिट परिधान केला होता. तिच्याच्यासोबत काही मैत्रिणीही दिसल्या होत्या. एका फोटोत ती तिच्या मैत्रिणीसोबत पोज देताना दिसली. या फोटोमध्ये तिचा बेबी बंप दिसत आहे. मात्र, काजलच्या बाजूने अद्याप अधिकृत दुजोरा आलेला नाही. चाहत्यांना आशा आहे की, हे जोडपे लवकरच काही ‘चांगली’ बातमी देऊ शकतात.

काजल म्हणते, ‘योग्य वेळ आल्यावर माहिती देईन…’

काजल अग्रवाल गरोदर असल्याच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून येत आहेत. या अफवांना प्रत्युत्तर देताना अभिनेत्री म्हणाली होती की, योग्य वेळ आल्यावर मी याबद्दल माहिती देईन. रिपोर्टनुसार, अभिनेत्रीने तिच्या कामाची कमिटमेंट पूर्ण केल्या आहेत आणि आता तिला स्वतःसाठी वेळ द्यायचा आहे. गेल्या वर्षी, काजलने तिचा प्रियकर आणि उद्योगपती गौतम किचलूसोबत 30 ऑक्टोबर 2020 रोजी मुंबईत भव्य लग्न केले होते. अभिनेत्रीच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असते.

‘आचार्य’मध्ये दिसणार काजल!

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे तर, काजल अग्रवाल सुपरस्टार चिरंजीवी आणि राम चरणसोबत ‘आचार्य’मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट 4 फेब्रुवारी 2022 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे, या चित्रपटाचे दिग्दर्शन शिवा कोरोटल यांनी केले आहे. या चित्रपटात अभिनेत्री पूजा हेगडे कॅमिओ करताना दिसणार आहे. याशिवाय काजल, दुलकर सलमान आणि अदिती राव हैदरी स्टारर ‘हे सिनेमिका’मध्ये दिसणार आहे. चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले असून, पोस्ट प्रॉडक्शनचे काम सुरू आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लूक आज रिलीज होणार आहे. काजल अनेक प्रोजेक्टवर काम करत आहे. पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, काजल गर्भवती असल्याने तिला अनेक प्रोजेक्ट्समध्ये रिप्लेस करण्यात आले आहे.

हेही वाचा :

83 : दिग्दर्शक कबीर खाननं केला खुलासा; म्हणाला, चित्रपट पाहताना रडत होती दीपिका पदुकोण

Disha Patani Photoshoot: अभिनेत्री दिशा पाटनीच्या बोल्ड लूकने वाढला इंटरनेटचा पारा!

Oo Antava : समंतानं रिजेक्ट केलं होतं गाणं, कुणी आणि कशी काढली तिची समजूत?


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें