AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Suryakumar Yadav : ‘राग सोड ना आता भाई’, मॅच संपल्यावर भांडण, आता पुन्हा सूर्यकुमार-कुलदीप भिडले, VIDEO

Suryakumar Yadav : भारताने रविवारी पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला. पण या सामन्यानंतर मैदानात घडलेल्या एका घटनेने क्रिकेट चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं. कुलदीप यादव, कॅप्टन सूर्यकुमार आणि हार्दिक पंड्या यांच्यात काहीतरी बोलणं चाललेलं. त्यावेळी हार्दिकच्या चेहऱ्यावर राग दिसत होता. त्याचाच पुढचा अंक काल पहायला मिळाला.

Suryakumar Yadav : 'राग सोड ना आता भाई', मॅच संपल्यावर भांडण, आता पुन्हा सूर्यकुमार-कुलदीप भिडले, VIDEO
Suryakumar Yadav-Kuldeep YadavImage Credit source: PTI
| Updated on: Feb 17, 2026 | 8:24 AM
Share

टीम इंडियाने टी20 वर्ल्ड कपमध्ये पुन्हा एकदा पाकिस्तानला धूळ चारली. कोलंबोमध्ये 15 फेब्रुवारीला सामना झाला. भारताने पाकिस्तानवर 61 धावांनी एकतर्फी विजय मिळवत सुपर-8 मध्ये प्रवेश केला. या मॅचमध्ये इशान किशन आणि जसप्रीत बुमराह यांनी दमदार प्रदर्शन केलं. त्यांची चर्चा झालीच. पण त्या शिवाय कुलदीप यादव सुद्धा चर्चेत आला. याचं कारण, मॅच संपल्यानंतर हार्दिक पंड्या आणि कॅप्टन सूर्यकुमार यादवसोबत त्याची झालेली शाब्दीक बाचाबाची. या वादानंतर दुसऱ्यादिवशी पुन्हा एकदा सूर्यकुमार यादव आणि कुलदीप यादव यांच्यात टक्कर झाली, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

प्रेमदासा स्टेडियमवर रविवारी झालेल्या सामन्यात टीम इंडियाच्या भेदक गोलंदाजीसमोर पाकिस्तानचा डाव 18 ओव्हरमध्ये 114 धावात आटोपला. मॅच संपल्यानंतर भारतीय खेळाडू परस्परांशी हस्तांदोलन करत होते. विजयाचं सेलिब्रेशन सुरु असताना एका घटनेने सगळ्यांनाच धक्का दिला. हार्दिक पंड्या रागात कुलदीप यादवला काहीतरी बोलताना दिसला. त्यामुळे निराश झालेला कुलदीप पुढे गेला. सूर्यकुमार यादवसोबत त्याने नीट हँडशेकही केलं नाही. त्यावेळी सूर्या सुद्धा वैतागलेला. तो सुद्धा कुलदीपला काही शब्द बोलला.

त्याचं उत्तर पुढच्याच दिवशी मिळालं

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यावेळी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या. अनेक युजर्सनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. टीम जिंकली मग अशा पद्धतीचं वागणं का?. क्रिकेट फॅन्स या व्हिडिओवरुन वेगवेगळे अंदाज लावतायत. शंका व्यक्त करत असताना टीम इंडियात काय वातावरणं होतं?. त्याचं उत्तर पुढच्याच दिवशी मिळालं. कुलदीप आणि सूर्याचे खांदे एकमेकांना भिडले.

एक व्हिडिओ पोस्ट केलाय

यावेळी हे चुकून किंवा रागात नाही, तर मजा मस्तीमध्ये घडलं. सूर्याने त्याच्या सोशल माीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट केलाय. त्यात तो आणि कुलदीप मॅचनंतर जे घडलं, त्याचीच Acting करताना दिसतायत. या व्हिडिओमधून सूर्या आणि कुलदीपने टीममध्ये सर्वकाही आलबेल असल्याचा संदेश दिला. मैदानावर त्यावेळी जे काही घडलं, त्यावेळी वातावरण थोडं तापलेलं होतं. फॅन्सना हा व्हिडिओ खूप आवडला.

18 व्या ओव्हरमध्ये हे सर्व घडलं

मॅचमध्ये नेमकं काय घडलं?. हे सर्व पाकिस्तानच्या डावात 18 व्या ओव्हरमध्ये घडलं. पाकिस्तानचा पराभव निश्चित होता. शेवटची जोडी क्रीजवर होती. हार्दिक पंड्याच्या बॉलिंगवर शाहीन आफ्रिदीने एक उंच शॉट मारला. चेंडू हवेत असताना कुलदीप यादव बाऊंड्री लाइनवर होता. कुलदीपकडे एक सोपा झेल घेण्याची संधी होती. पण त्याने कॅच सोडली. चेंडूवर थेट सहा धावा मिळाल्या. हार्दिक त्यावेळी चिडलेला. त्याच ओव्हरच्या लास्ट बॉलवर हार्दिकने मॅच संपवली. पण हार्दिकच्या मनात कुलदीपच्या चुकीचा राग होता. मॅच संपल्यानंतर हार्दिक कुलदीपवर चिडलेला.

Follow Us
नाना पाटेकरांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा; CM फडणवीसांची भावनिक...
नाना पाटेकरांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा; CM फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया, म्हणाले...
नाना पाटेकरांच्या निधनाने सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या...
नाना पाटेकरांच्या निधनाने सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या, ‘सिनेसृष्टीतल ही पोकळी भरून निघणार नाही’
डॉक्टरांचं पथक घरी पोहोचलं तेव्हा नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत होते...
डॉक्टरांचं पथक घरी पोहोचलं तेव्हा नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत होते; 45 सीपीआर दिला मात्र...  काय घडलं?
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकून मोठा धक्का बसला- सुप्रिया सुळे
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकून मोठा धक्का बसला, मी... सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकताच... मराठी सिनेसृष्टीतील...
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकताच... मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्याची भावनिक प्रतिक्रिया
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेर
Nana Patekar | ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेर
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आज तोडगा? दोन मंत्री पुण्यात येणार...
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आज तोडगा? दोन मंत्री पुण्यात येणार, रोहित पवारांची मोठी माहिती
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार