AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ही गोष्ट चमत्कारापेक्षा.. तनुश्री दत्ताचं नाना पाटेकर यांच्यानंतर या दिवंगत अभिनेत्यावर मोठं विधान

तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्या निधनानंतर पुन्हा वादग्रस्त विधान केले आहे. तिने आपला अनुभव दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या घटनेशी जोडला. तनुश्रीने आरोप केला आहे की, बॉलिवूडमधील एका कंपूने तिला आणि सुशांतला त्रास दिला. माझ्या हत्येचाही प्रयत्न झाला, असा गंभीर दावा तिने केला आहे.

ही गोष्ट चमत्कारापेक्षा.. तनुश्री दत्ताचं नाना पाटेकर यांच्यानंतर या दिवंगत अभिनेत्यावर मोठं विधान
nana patekarImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 09, 2026 | 10:21 PM
Share

अभिनेत्री तनुश्री दत्ता हिचे बरळणे सुरूच आहे. काल अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन झाल्यानंतर तिने इव्हिल डेड अशी प्रतिक्रिया दिली होती. व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्याबद्दल वाईटसाईट बोलू नये, असे संकेत असतानाही तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांची अवहेलना करणारी टीका केली. त्यानंतर आता तिने परत एकदा प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी तिने थेट दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांचं नाव घेत प्रतिक्रिया दिली आहे. मलाही बॉलिवूडमधील एका कंपूने त्रास देण्याचा प्रयत्न केला होता, असा गंभीर आरोप तनुश्रीने केला आहे.

तनुश्री दत्ताने इन्स्टावर एक भलामोठा व्हिडीओ शेअर केला आहे. तब्बल 2 तासांचा हा व्हिडीओ आहे. तनुश्रीने या व्हिडीओतून नाना पाटेकर यांच्यावर प्रतिक्रिया दिली आहे. तसेच नानांबद्दल विरोधात बोलल्याने तिला ट्रोल करणाऱ्यांचाही तिने समाचार घेतला आहे. या व्हिडीओमध्ये तिने 2020मध्ये जगाचा निरोप घेतलेले दिवंगत अभिनेते सुशांत सिंह राजपूत यांचाही उल्लेख केला आहे. सुशांतला जो अनुभव आला, तसाच मलाही अनुभव आला होता. या फिल्म इंडस्ट्रीतच मलाही हा अनुभव आल्याचं तिने म्हटलं आहे. सुशांतबाबत बोलताना तिने नानांचा थेट उल्लेख केला नाही. सुशांतला केवळ एका व्यक्तीने नाही, तर बॉलिवूडच्या एका कंपूनेच त्रास दिला होता, असं तिने म्हटलं आहे.

तनुश्रीचे दावे काय?

प्रत्येकाला आपल्या कर्माचा हिशोब द्यावा लागतो. एखादी व्यक्ती एकटा असेल तर हे समजू नका ती एकटी आहे, देव तिच्यासोबत असतोच. जेव्हा देवाची काठी चालते तेव्हा असंच फास्ट काम होतं, असं ती म्हणाली. यावेळी तिने नानांच्या मृ्त्यूचा उल्लेख केला. माझ्यासाठी ही गोष्ट चमत्कारापेक्षा वेगळी नाही. पण मी काही सेलिब्रेशन करत नाही. मला त्रास देण्यामागे एक माणूस नव्हता तर बॉलिवूडचा एक मोठा ग्रुप आहे, हे मला माहीत आहे. सुशांत सिंहलाही असाच त्रास देऊन मारून टाकण्यात आलं. एखाद्या अभिनेत्रीला त्रास देणं हे केवळ एखाद्या व्यक्तीचं काम नव्हतं. या गोष्टीतील हे सर्वजण खूप जुने खिलाडी आहेत, असं तिने म्हटलंय.

गंभीर आरोप काय?

जेव्हा सुशांत सिंहची घटना घडली तेव्हा हे सर्व नॉर्मल नाहीये असं माझ्या लक्षात आलं. म्हणजे संपूर्ण परिस्थिती सामान्य नाही याची मला या घटनेने जाणीव झाली, असं ती म्हणाली. माझी हत्या करण्याचा प्रयत्न केला गेला. मला त्रास देण्यासाठी माझ्या घरात जाणूनबुजून मोलकरीन ठेवली होती. माझ्या कारचा अपघात व्हावा म्हणून ब्रेक फेल केले गेले होते, असे आरोपही तिने केले.

Follow Us
मोदीजी, बीपी चेक करत राहा; अभिजीत दीपकेंचा पंतप्रधानांना टोला
Abhijeet Dipke : मोदीजी, बीपी चेक करत राहा; अभिजीत दीपकेंचा पंतप्रधानांना टोला, मेट्रो-रेल्वे बंदीवरून सरकारवर निशाणा
रेल्वे, मेट्रो बंदच्या निर्णयाविरोधात कोर्टात सुनावणी; कोर्टाने....
CJP Protest : सीजेपीचं उद्या दिल्लीत आंदोलन, रेल्वे, मेट्रो बंदच्या निर्णयाविरोधात कोर्टात सुनावणी; कोर्टाने केंद्राला काय सांगितलं?
गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा
Gajanan Kirtikar : Shivsena : गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले...
एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर दीपकेंचा सरकारला टोला
Abhijeet Dipake : एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर अभिजित दीपकेंचा सरकारला टोला
ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच....
Shivsena : ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच, सर्वोच्च न्यायालयाकडून तारीख जाहिर
गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा बण यांच्यावर....
Vivekanand Patil : गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा नवनाथ बण यांच्यावर पलटवार, फडणवीसांनाही केलं आवाहन
CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
CJP Delhi Andolan : CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ?
Thackeray Group On Delhi Andolan : दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ? राष्ट्रपतींच्या भेटीवेळीही प्रतिनिधी....
सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून राऊतांनी...
Sanjay Raut : सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून संजय राऊतांनी सरकारला घेरलं
SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; सिब्बलांचा जुना व्हिडिओ
Devendra Fadnavis : SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; कपिल सिब्बलांचा जुना व्हिडिओ शेअर करत म्हणाले...