…म्हणून धर्मेंद्रंना ‘तो’ सीन करण्यापासून सतत रोखत होते प्रेम चोप्रा! वाचा मनोरंजक किस्सा

| Updated on: Sep 24, 2021 | 8:05 AM

अभिनेते प्रेम चोप्रा  (Prem Chopra) यांनी 60 वर्षांच्या कारकिर्दीत सुमारे 380 चित्रपटांमध्ये काम केले, ज्यात त्यांच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज खलनायकांच्या यादीत प्रेम चोप्राचे नाव समाविष्ट आहे.

…म्हणून धर्मेंद्रंना ‘तो’ सीन करण्यापासून सतत रोखत होते प्रेम चोप्रा! वाचा मनोरंजक किस्सा
Prem Chopra
Follow us on

मुंबई : अभिनेते प्रेम चोप्रा  (Prem Chopra) यांनी 60 वर्षांच्या कारकिर्दीत सुमारे 380 चित्रपटांमध्ये काम केले, ज्यात त्यांच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज खलनायकांच्या यादीत प्रेम चोप्राचे नाव समाविष्ट आहे. ‘बॉबी’ चित्रपटातील ‘प्रेम नाम है मेरा, प्रेम चोप्रा’ हा संवाद असो किंवा ‘आग का गोला’ चित्रपटातील ‘शराफत और ईमानदारी का सर्टिफिकेट ये दुनिया सिर्फ उन्हें देती है, जिनके पास दौलत होती है…’ असे अनेक संवाद, जे प्रेम चोप्राची ओळख बनले.

प्रेम चोप्रा यांच्या एका चित्रपटाशी संबंधित एक किस्सा खूप चर्चेत आहे, ज्यात धर्मेंद्रही त्याच्यासोबत होते. प्रेम चोप्रा वारंवार धर्मेंद्र यांना एक सीन करण्यास नकार देत होते. चला तर जाणून घेऊया…

‘पॉकेट मार’च्या ‘या’ सीनमुळे प्रेम चोप्रा घाबरले होते!

अन्नू कपूर यांनी 1974 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पॉकेट मार’ चित्रपटाशी संबंधित हा मनोरंजक किस्सा त्यांच्या एका शोमध्ये शेअर केला. अभिनेत्याने सांगितले होते की, चित्रपटाचा क्लायमॅक्स सीन शूट करायचा होता. तो क्लायमॅक्स सीन असा होता की, प्रेम चोप्रा, जो या चित्रपटातील खलनायक होते. त्यांचे गुंड धर्मेंद्र यांना रस्शीने बांधून जीपने ओढत होते. प्रेम चोप्रा या दृश्याबद्दल खूप काळजीत होते. ते सेटवर इकडे -तिकडे फिरत होते. तेव्हा त्यांची नजर नरेंद्रवर पडली, धर्मेंद्रचा चुलत भाऊ, जे त्यावेळी सेटवर उपस्थित होते.

प्रेम चोप्रा नरेंद्रकडे गेले. त्यांना बाजूला घेतले आणि त्याच्या समोर आपली चिंता व्यक्त केली. त्यांनी नरेंद्र यांना सांगितले की, हे एक अतिशय धोकादायक दृश्य आहे आणि धर्मेंद्रजींनी हे दृश्य स्वतः करू नये. चुकून एखाद्याच्या चेहऱ्यावर दुखापत झाली तर त्रास होईल. अभिनेत्यासाठी, त्याचा चेहरा सर्वकाही आहे. प्रेम चोप्राचे शब्द ऐकून धर्मेंद्रच्या चुलत भावालाही थोडी काळजी वाटली. प्रेम चोप्राचे बोलणे ऐकल्यानंतर ते थेट धर्मेंद्रकडे गेले.

त्यांनी भाऊ धर्मेंद्रला सांगितले की, प्रेमजी सांगत आहेत की धर्मेंद्रने हा सीन स्वतः करू नये. नरेंद्र जेव्हा धर्मेंद्रला या गोष्टी सांगत होता, तेव्हा प्रेम चोप्राही त्या लोकांच्या बरोबरीने उभे होते. आता नरेंद्रची चर्चा संपताच धर्मेंद्रने प्रेम चोप्राकडे पाहिले आणि ते जोरजोरात हसायला लागला. त्यांनी प्रेम चोप्राला सांगितले, ‘मला माहित आहे की तू हे का म्हणत आहेस…’

प्रेम चोप्रांचे सीन न करण्याच्या आग्रहामागे ‘हे’ मजेदार कारण होते!

जेव्हा धर्मेंद्र सहमत झाले नाहीत, तेव्हा प्रेम चोप्रांनी धैर्य एकवटले आणि धर्मेंद्रला सांगितले. ‘हे बघ, हे खूप धोकादायक आहे आणि तू स्वतः असे धोकादायक स्टंट करू नकोस. हे दृश्य तुम्ही स्टंट मॅन किंवा बॉडी डबल द्वारे करून घ्या.’ प्रेम चोप्राने हे धर्मेंद्रला अनेक वेळा सांगितले, मग धर्मेंद्र त्यांना म्हणाले, ‘तू हे पुन्हा पुन्हा का म्हणत आहेस?’

धर्मेंद्रच्या या प्रश्नावर प्रेम चोप्रांनी उत्तर दिले की, ‘मी हे पुन्हा पुन्हा म्हणतो आहे कारण तुम्ही हा स्टंट सहज करून बाजूला व्हाल, पण थोड्या वेळाने माझी बारी येईल, जिथे मला जीपला बांधून ओढले जाईल, जे मला नको आहे. म्हणूनच मी तुम्हाला सांगत आहे की, जर तुम्ही आता हा सीन करण्यास नकार दिला, तर मलाही हा सीन करावा लागणार नाही. प्रेम चोप्राच्या या गोष्टी ऐकून धर्मेंद्र आणि त्याचा चुलत भाऊ नरेंद्र दोघेही मोठ्याने हसायला लागले. प्रेम चोप्रा अनेक प्रयत्न करूनही त्याच्या योजनेत अपयशी ठरले आणि त्याला हा सीन करावा लागला.

हेही वाचा :

Malaika Arora : फिटनेस फ्रीक मलायका अरोरा, पाहा अभिनेत्रीचा स्टायलिश अंदाज

Rana Naidu | राणा दग्गुबाती-व्यंकटेश दग्गुबाती, सुपरस्टार काका-पुतण्याची जोडी नेटफ्लिक्सच्या आगामी प्रोजेक्टमध्ये झळकणार!