Rana Naidu | राणा दग्गुबाती-व्यंकटेश दग्गुबाती, सुपरस्टार काका-पुतण्याची जोडी नेटफ्लिक्सच्या आगामी प्रोजेक्टमध्ये झळकणार!

नेटफ्लिक्सवर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'अनकही कहानीया' या चित्रपटाचे खूप कौतुक केले जाता आहे. 'कोटा फॅक्टरी'चा दुसरा सीझन देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लवकरच नेटफ्लिक्स अमेरिकन लोकप्रिय ड्रामा सीरीज 'रे डोनोवन' चे अधिकृत देसी रूपांतर करणार आहे

Rana Naidu | राणा दग्गुबाती-व्यंकटेश दग्गुबाती, सुपरस्टार काका-पुतण्याची जोडी नेटफ्लिक्सच्या आगामी प्रोजेक्टमध्ये झळकणार!
Rana-Vyankatesh
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Harshada Bhirvandekar

Sep 23, 2021 | 3:29 PM

मुंबई : नेटफ्लिक्सवर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘अनकही कहानीया’ या चित्रपटाचे खूप कौतुक केले जाता आहे. ‘कोटा फॅक्टरी’चा दुसरा सीझन देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लवकरच नेटफ्लिक्स अमेरिकन लोकप्रिय ड्रामा सीरीज ‘रे डोनोवन’ चे अधिकृत देसी रूपांतर करणार आहे आणि या मालिकेत सुपरस्टार काका आणि पुतण्याची जोडी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी येणार आहे.

नेटफ्लिक्सच्या नवीन वेब सीरीज ‘रे डोनोवन’ चे भारतीय रुपांतर श्रीमंत आणि प्रसिद्ध लोकांच्या जीवनातील उत्कटतेने आणि उत्साहाने भरलेले आहे. या क्राईम ड्रामा सीरीजला ‘राणा नायडू’ असे नाव देण्यात आला आहे आणि या सीरीजमध्ये बाहुबलीचा ‘बल्लाळदेव’ म्हणजेच राणा दग्गुबाती पहिल्यांदा पडद्यावर त्याचे काका आणि सुपरस्टार व्यंकटेश दग्गुबातीसोबत दिसणार आहे. या अॅक्शन ड्रामाचे मुख्य पात्र राणा नायडू आहे आणि कथेनुसार जेव्हा जेव्हा सिनेजगतात कोणालाही कोणतीही समस्या येते, तेव्हा तो फक्त एका व्यक्तीकडे जातो आणि तो राणा नायडू.

राणा म्हणतो मी उत्सुक!

या मालिकेबद्दल बोलताना राणा दग्गुबाती म्हणतो की, ‘या मालिकेत अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या मी पहिल्यांदा करत आहे. माझे काका व्यंकटेश यांच्यासोबत काम करणे आणि दीर्घ स्वरूपाच्या कथाकथनामध्ये नेटफ्लिक्स सोबत काम करणे. आमच्या करिअरमध्ये आपण दोघांनी यापूर्वी केलेल्या गोष्टींपेक्षा हे पूर्णपणे वेगळे आहे. मला सर्वात चांगले माहित असलेल्या क्रू आणि प्लॅटफॉर्मसह काम करताना मला खूप आनंद होत आहे. या मालिकेत बरीच आव्हाने आणि नावीन्य असेल, पण खूप मजा देखील असेल. मी लवकरच त्याचे शूटिंग सुरू करण्यास उत्सुक आहे.’

राणासोबत पहिल्यांदाच झळकणार!

दुसरीकडे, व्यंकटेश दग्गुबाती देखील या सीरीजबद्दल खूप उत्साहित आहेत. ते म्हणतात, ‘मी राणा दग्गुबाती सोबत काम करण्याची आतुरतेने वाट पाहत आहे. हे निश्चित आहे की आम्ही सेटवर बरीच धमाल करणार आहोत. हा शो आमच्या दोघांसाठी एक परिपूर्ण प्रोजेक्ट आहे. मी स्वतः ‘रे डोनोवन’ चा मोठा चाहता आहे आणि आम्ही त्याला न्याय देऊ. यासाठी संपूर्ण टीम तयारी करत आहे.’

‘राणा नायडू’ प्रेक्षकांचे मनोरंजन करणार

या नवीन सुरवातीबद्दल सांगताना, नेटफ्लिक्स इंडियाच्या कंटेंट व्हीपी मोनिका शेरगिल म्हणतात, ‘सुपरस्टार कलाकार अर्थात अभिनेता राणा दग्गुबाती आणि वेंकटेश दग्गुबाती यांची नेटफ्लिक्सवर पहिल्यांदा ऑन-स्क्रीन जोडी आणण्यासाठी आम्ही उत्साहित आहोत. आमच्या सुपरस्टारची ही अप्रतिम जोडी प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करणार आहे. करण अंशुमन आणि सुपर्णा वर्मा ‘राणा नायडू’ या वेब सीरिजचे दिग्दर्शन करणार आहेत.’

हेही वाचा :

Shalini Pandey : पदार्पण करण्यापूर्वीच शालिनी पांडेने सौंदर्यानं जिंकली चाहत्यांची मनं, आलिया-अनन्यालाही टाकलं मागे

Video | ‘परी आणि तिचा लाडका बाप्पा’, रांगोळी कलाकारालाही पडलीय लहानग्या मायराची भुरळ!

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें