
असं म्हणतात की चित्रपटामध्ये असलेली गाणी हे त्या चित्रपटाचा प्राण असतात. असे अनेक उदाहरणं देता येतील की ते चित्रपट केवळ त्याच्यामध्ये असलेल्या गाण्यांमुळे सुपरहीट ठरले. 90 च्या दशकामधील असे अनेक चित्रपट आहेत, ज्या चित्रपटांमधील गाणी आज देखील आपल्याला अनेक जण गुणगुणताना दिसतात. काही गाणी अशी आहेत की ती चित्रपट सृष्टीमध्ये अजरामर ठरली. अशाच एका गाण्याबाबत आज आपण माहिती घेणार आहोत.
जे गाणं ऐकण्यासाठी कदाचित तुम्हाला चांगलं वाटणार नाही. कारण या गाण्याचा अर्थ हा डबल मिनिंग आहे. मात्र आजही ते गाण तेवढ्याच आवडीनं गायलं जातं.90 च्या दशकामध्ये हे गाणं सर्वांच्या ओठावर होतं आणि गाणं डबल मिनिंग असल्यामुळे उघड ऐकण्याची किंवा पाहाण्याची सोय नसल्यामुळे महिला मुली हे गाणं चोरून लपून ऐकायच्या. हे गाणं त्या काळातील एका प्रसिद्ध बोर्ड अभिनेत्रीसोबत चित्रित करण्यात आलं होतं.
हे गाण असं आहे की आजही संपूर्ण कुटुंबासोबत एकत्र बसून तुम्ही हे गाणं ऐकण्याची किंवा पाहाण्याची हिंमत करू शकणार नाहीत. मात्र 90 च्या दशकातलं हे गाणं आजही अनेक जण चोरून किंवा एकंतात ऐकतात. त्यामध्ये महिला देखील मागे नाहीत. एक काळ असा होता की हे गाणं महिलांच्या सर्वाधिक पसंतीला उतरलं होतं. मात्र या गाण्याच्या डबल मिनिंग अर्थामुळे हे गाणं त्या कधीच उघडपणे पाहू शकल्या नाहीत, जाणून घेऊयात हे गाणं नेमकं कोणतं होतं.
हे गाणं ज्या चित्रपटात आहे, त्या चित्रपटाची निर्मिती तब्बल तीस वर्षांपूर्वी झाली. 1995 मध्ये हा चित्रपट आला. या चित्रपटात एक नाही दोन नाही तर अनेक दिग्गज अभिनेत्यांनी सोबत काम केलं आहे. या चित्रपटात पहिल्यांदाच सलमान खान आणि शाहरूख खान यांनी सोबत काम केलं. हा चित्रपट होता करण अर्जुन. राकेश रोशन यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर त्या काळात धुमाकूळ घातला. या चित्रपटामध्ये एक गाणं होतं त्या गाण्याला आज 30 वर्षांनंतर देखील लोक विसलेले नाहीत. आजही या गाण्यातील डबल मिनिंग अर्थामुळे हे गाणं एकतांत किंवा लपून -छपून ऐकलं जातं. या गाण्याचे बोल आहेत.
‘गुपचुप -गुपचुप-गुपचुप
लंबा लंबा घूंघट काहे को डाला
क्या कहीं कर आई तू मुँह कालारे
कोनों में बतियां करती हैं सखिया
रात किया रे तूने कैसा घोटाला’