
मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) ही तिच्या आगामी वेब सीरिजमुळे जोरदार चर्चेत आहे. चाहते हे सुष्मिता सेन हिच्या आगामी ताली या वेब सीरिजची आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत. विशेष म्हणजे सुष्मिता सेन ही या वेब सीरिजमध्ये अत्यंत वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. या वेब सीरिजमधील फर्स्ट लूक बघितल्यापासूनच चाहत्यांमध्ये या वेब सीरिजबद्दची आतुरता बघायला मिळत आहे. आता नुकताच या वेब सीरिजचे (Web series) ट्रेलर रिलीज करण्यात आले आहे. हे ट्रेलर पाहून चाहत्यांमधील उत्साह अधिक वाढल्याचे बघायला मिळत आहे. विशेष म्हणजे ट्रेलरमधील सुष्मिता सेन हिचा लूक पाहून चाहते अभिनेत्रीचे काैतुक करताना दिसत आहेत.
ताली या वेब सीरिजमध्ये सुष्मिता सेन ही गौरी सावंतची भूमिका साकारताना दिसणार आहे. या वेब सीरिजमध्ये सुष्मिता सेन ही किन्नरच्या भूमिकेत दिसणार आहे. ट्रान्सजेंडरचे आयुष्य नेमके कसे हे सर्व काही या वेब सीरिजमध्ये दाखवले जाणार आहे. गौरी सावंतने कशाप्रकारे संघर्ष केलाय, याबद्दल देखील या वेब सीरिजमध्ये दाखवले जाणार आहे.
ट्रेलरमध्ये सुष्मिता सेन ही संघर्ष करताना दिसत आहे. चाहते आता या वेब सीरिजची आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत. ताली या वेब सीरिजमध्ये सुष्मिता सेन ही व्यस्त आहे. सुष्मिता सेनच्या ताली या वेब सीरिजचे ट्रेलर आता सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. अनेकजण यावर कमेंट करताना देखील दिसत आहेत.
ट्रेलरवर कमेंट करत एकाने लिहिले की, मला सुष्मिता सेन हिचा लूक प्रचंड आवडला आहे. दुसऱ्याने लिहिले की, अशा विषयांवर वेब सीरिज आणि चित्रपट तयार नक्कीच व्हायला हवेत. तिसऱ्याने लिहिले की, मी काही दिवसांपासून या ताली वेब सीरिजची आतुरतेने वाट पाहत आहे. ताली वेब सीरिजच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
सुष्मिता सेन ही कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते. काही दिवसांपूर्वीच सुष्मिता सेन ही सोशल मीडियावर व्यायामाचे व्हिडीओ शेअर करताना दिसली. सुष्मिता सेन हिला काही दिवसांपूर्वीच हृदयविकाराचा झटका हा आला होता. स्वत: याबद्दलची माहिती सुष्मिता सेन ही आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली होती. ज्यानंतर चाहत्यांना देखील मोठा झटका हा बसला होता.