
बॉलिवूड अभिनेता अजय देवगण याचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. विशेष म्हणजे अजय देवगण याचे चित्रपट धमाका करताना दिसत आहेत. अजय देवगण हा मोठ्या संपत्तीचा मालक आहे. अजय देवगण हा सध्या त्याच्या ‘सन ऑफ सरदार 2’चित्रपटामुळे चर्चेत आहे. सध्या अजय देवगणच्या सन ऑफ सरदार 2 चित्रपटाची शूटिंग ही यूकेमध्ये सुरू आहे. या चित्रपटाच्या शूटिंगसाठी संजय दत्त हा पोहोचू शकला नाही. सर्व तयारी झाली असताना अचानक संजय दत्त याचा व्हिसा नाकारण्यात आला. यानंतर यूकेच्या सरकारवर जाहिरपणे टिका करतानाही संजय दत्त दिसला. आता संजय दत्त हा सन ऑफ सरदार 2 मध्ये दिसणार की, नाही हा प्रश्न चाहत्यांकडून उपस्थित केला जातोय.
आता सन ऑफ सरदार 2 चित्रपटाच्या सेटवर मोठा गोंधळ झाल्याचे बघायला मिळतंय. हेच नाही तर एका अभिनेत्या थेट चित्रपटामधून बाहेरचा रस्ता हा दाखवण्यात आलाय. हा वाद चांगलाच वाढल्याचे बघायला मिळतंय. या वादावर चित्रपटाचे सहनिर्माते कुमार मंगत पाठक म्हणाले की, होय हे खरे की, अभिनेता विजय राज याला चित्रपटामधून काढण्यात आलंय. त्याचे कारणही तसेच मोठे आहे.
विजय राज याची चित्रपटाच्या सेटवरील वागणूक आणि त्याच्या मागण्यांमुळे आम्ही त्याला चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवला. ज्यानंतर आता विजय राज याने देखील आपल्याला चित्रपटातून काढून का टाकण्यात आले याचे कारण सांगितले आहे. विजय राज याच्या म्हणण्यानुसार अजय देवगण याला आपण चित्रपटाच्या सेटवर नमस्कार केला नसल्यामुळेच आपल्याला चित्रपटातून काढण्यात आले.
विजय राज याच्याऐवजी आता चित्रपटामध्ये आता संजय मिश्राला घेण्यात आले. मात्र, या वादावर अजूनही अजय देवगण याने भाष्य केले नाहीये. यावर अजय देवगण काय भाष्य करतो, याकडे सर्वांच्या नजरा दिसत आहेत. कुमार मंगत यांनी असेही म्हटले की, विजयने एक रूम आणि व्हॅनिटी व्हॅनची मागणी केली होती आणि स्पॉट बॉयसाठी जास्त शुल्क घेतले होते. यादरम्यान सतत आरोप प्रत्यारोपाचे सत्र सुरू आहे.
विजयने सांगितले की, शूटिंगच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर रवी किशन, कुमार मंगत पाठक, दिग्दर्शक विजय अरोरा यांच्यासह मी इतरांना भेटलो. मी व्हॅनमधून बाहेर आलो आणि अजय देवगण हा माझ्यापासून 25 मीटर अंतरावर उभा असल्याचे मी बघितले. मात्र, त्यावेळी तो व्यस्त दिसला. यामुळे मी त्याला शुभेच्छा देण्यासाठी गेलो नाही मी काही मित्रांशी गप्पा मारत थांबलो आणि मी अजयला नमस्कार देखील केला नाही. पुढच्या 25 मिनिटांमध्ये मला चित्रपटातून काढून टाकण्यात आले