Video | चक्क लुंगी परिधान करून शॉपिंगला निघालीये उर्वशी रौतेला! सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल!

बॉलिवूडची स्टाईल आयकॉन उर्वशी रौतेला (Urvashi Rautela ) सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचे चाहते देखील तिच्या फोटोंची आतुरतेने वाट पाहत असतात. ग्लॅमरस उर्वशी रौतेलाने तिच्या फोटोंनी सर्वांना घायाळ केले आहे.

Video | चक्क लुंगी परिधान करून शॉपिंगला निघालीये उर्वशी रौतेला! सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल!
Urvashi Rautela

मुंबई : बॉलिवूडची स्टाईल आयकॉन उर्वशी रौतेला (Urvashi Rautela ) सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचे चाहते देखील तिच्या फोटोंची आतुरतेने वाट पाहत असतात. ग्लॅमरस उर्वशी रौतेलाने तिच्या फोटोंनी सर्वांना घायाळ केले आहे. उर्वशीचा असा एकही फोटो नाही, जो तिच्या चाहत्यांना आवडला नसेल. मात्र, यावेळी जेव्हा उर्वशी लुंगी घातलेली दिसली, तेव्हा तिचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागला.

अलीकडेच, स्वतःच्या इंस्टाग्रामवर लुंगी लूकमधील एक रील शेअर करताना, उर्वशीने ‘लुंगी व्हेकेशन, लुंगी वन साइज फिट्स ऑल’ असे लिहिले होते.

‘लुंगी’ परिधान करून बनवले रील!

या रीलमध्ये उर्वशी रौतेलासोबत, तिच्या दोन मैत्रिणीही लुंगी घातलेल्या दिसत आहेत, उर्वशी हातात सॉफ्ट ड्रिंक घेऊन शिंकते आणि नंतर मॉलमध्ये शॉपिंग करताना दिसते.  तिचा हा रील सोशल मीडियाचा ट्रेंड फॉलो करत आहे. व्हिडीओमध्ये iamfashionbabe हे गाणेही मागे वाजत आहे. उर्वशीने निळ्या रंगाच्या रंगाच्या क्रॉप शर्टसोबत लुंगी पेअरअप केली आहे. त्यासोबतच तिने कमरेला स्टोन बेल्टही लावला आहे.

पाहा व्हिडीओ :

लुंगी घातल्यामुळे ट्रोल झाली अभिनेत्री!

नेहमीप्रमाणेच तिच्या या रीलवर चाहते लाईक्सची उधळण करत आहेत. मात्र, यावेळी व्हिडीओमुळे उर्वशीला चाहत्यांच्या प्रश्नांनी घेरले आहे. उर्वशीचा व्हिडीओ अनेक चाहत्यांना आवडला आहे, तर अनेक चाहते ‘काय चालले आहे भाई’ म्हणत आहेत. व्हिडीओची सुरुवात उर्वशी शिंकण्याने होते, टोमणा मारत, एका यूजरने लिहिले ‘कोरोना हो गया’. उर्वशीच्या या व्हिडीओला आतापर्यंत 2 लाख 50 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

उर्वशीकडे चित्रपटांची रांग!

‘सिंह साहेब द ग्रेट’ या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या उर्वशी रौतेलाने ‘सनम रे’, ‘ग्रँड मस्ती’ आणि ‘हेट स्टोरी 4’मध्ये दमदार अभिनय करून प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. उर्वशीने ‘मिस दिवा युनिव्हर्स 2015’चा ताजही जिंकला आहे. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, उर्वशी लवकरच ‘ब्लॅक रोज’ या थ्रिलर चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यासोबतच उर्वशी आगामी काळात रणदीप हुड्डासोबत ‘इन्स्पेक्टर अविनाश’ या वेब सीरीजमध्येही भूमिका साकारणार आहे.

हेही वाचा :

Video | Oops Moment! चाहत्यांचे आभार मानत होती गायिका अन् अचानक खांद्यावरून ड्रेसच निसटला!

Happy Birthday Boman Irani | वेटर ते फोटोग्राफर, 42व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण करत बोमन इराणी बनले सुपरस्टार!


Published On - 12:51 pm, Thu, 2 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI