Varun Dhawan | वरुण धवन याचा प्रश्न ऐकून लाजली कियारा अडवाणी, चाहते म्हणाले

वरुण धवन आणि कियारा अडवाणी यांच्यामध्ये एक खास रिलेशन आहे. वरुण धवन आणि कियारा यापूर्वी बऱ्याच वेळा धमाल करताना दिसले आहे. नुकतात वरुण धवन आणि कियाराचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे.

Varun Dhawan | वरुण धवन याचा प्रश्न ऐकून लाजली कियारा अडवाणी, चाहते म्हणाले
Follow us
| Updated on: Mar 09, 2023 | 6:04 PM

मुंबई : सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी (Kiara Advani) हे 7 फेब्रुवारी रोजी लग्न बंधनात अडकले आहेत. राजस्थान येथील जैसलमेर येथे अत्यंत शाही पध्दतीने कियारा आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांचा विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्यामध्ये अत्यंत जवळच्या व्यक्तीला निमंत्रण देण्यात आले. सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) आणि कियारा अडवाणी यांच्या लग्नात नो फोन पाॅलिशी फाॅलो करण्यात आली. लग्नातील फोटो आणि (Video) व्हिडीओ काढण्याची परवानगी कोणालाही नव्हती. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांनी लग्न केले.

रिपोर्टनुसार आता लग्नानंतर पहिल्यांदाच करण जोहर याच्या चित्रपटामध्ये सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी हे स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांनी लग्नामधील काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले. या फोटोंवर कमेंट करत चाहत्यांनी यांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या.

सध्या सोशल मीडियावर कियारा अडवाणी आणि वरुण धवन यांचा एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडीओ चाहत्यांना देखील प्रचंड आवडलाय. या व्हिडीओमध्ये वरुण धवन हा कियारा अडवाणी हिला खास प्रश्न विचारताना दिसत आहे. कियारा ही वरुण धवन याला असे उत्तर देते की, ते ऐकून चाहते फिदा झाले आहेत.

या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, माईक घेऊन वरुण धवन हा कियारा अडवाणी हिच्या जवळ जातो आणि म्हणतो की, भाभी जी…भैया जी कैसे हैं?…यावर कियारा अडवाणी म्हणाली, बढ़िया है…कियारा अडवाणी हिचे हे बोलणे चाहत्यांना प्रचंड आवडले आहे. आता हाच व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे.

आता या व्हिडीओवर चाहत्यांच्या मोठ्या प्रमाणात कमेंट येताना दिसत आहेत. एक युजर्सने लिहिले की, हे फक्त वरुण धवन हाच करू शकतो. दुसऱ्याने लिहिले की, कियारा आणि वरुण धवन यांची ट्यूनिंग जबरदस्त आहे. सिद्धार्थ मल्होत्रा याचा काही दिवसांपूर्वी मिशन मजनू हा चित्रपट रिलीज झाला होता. मात्र, या चित्रपटाला पाकिस्तानधून मोठा विरोध करण्यात आला.

वरुण धवन यानेच काही दिवसांपूर्वी क्रिती सेनाॅन ही कोणाला डेट करत आहे, हे अंदाजा अंदाजामध्ये करण जोहर याच्या शोमध्ये सांगितले होते. त्यानंतर क्रिती सेनाॅन आणि प्रभास याच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगत आहेत. मात्र, या फक्त अफवा असल्याचे काही दिवसांपूर्वी क्रिती सेनाॅन हिने सांगितले होते.

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.