विवेक अग्निहोत्रीच्या मुंबईतील नव्या घराची किंमत ऐकून डोळे नक्कीच चक्रावतील…

मिळालेल्या माहितीनुसार, विवेक अग्निहोत्रीने हे घर Ectasy Realty अपार्टमेंटमध्ये घेतले आहे. या घरासाठी विवेक यांना मोठी तगडी रक्कम मोजावी लागलीये

विवेक अग्निहोत्रीच्या मुंबईतील नव्या घराची किंमत ऐकून डोळे नक्कीच चक्रावतील...
| Updated on: Oct 04, 2022 | 1:04 PM

मुंबई : ‘द काश्मीर फाईल्स’ सारखे हीट चित्रपट बाॅलिवूडला (Bollywood) देणारे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी मुंबईत एक आलिशान घर (Home) खरेदी केलंय. विशेष म्हणजे या घराची किंमत ऐकून तुमचे डोळे नक्कीच चक्रावतील. विवेक अग्निहोत्री आणि त्यांच्या पत्नी पल्लवी जोशी यांनी मुंबईतील अंधेरी भागात एक अपार्टमेंट खरेदी केलीये. विवेक अग्निहोत्री हे त्यांच्या आगामी चित्रपटावर काम करत आहेत. याचदरम्यान त्यांनी मुंबईत (Mumbai) घर खरेदी केलंय.

मिळालेल्या माहितीनुसार, विवेक अग्निहोत्रीने हे घर Ectasy Realty अपार्टमेंटमध्ये घेतले आहे. या घरासाठी विवेक यांना मोठी तगडी रक्कम मोजावी लागलीये. रिपोर्टनुसार विवेक अग्निहोत्रीने हे घर तब्बल 17. 92 कोटींना खरेदी केलंय. पार्किंगसह 3,258 चौरस फूट हे घर आहे. 1.07 कोटी मुद्रांक शुल्क देखील त्यांनी भरले आहे. विवेक अग्निहोत्रीचे घर आतमधून नेमके कसे आहे, हे जाणून घेण्यासाठी अनेकजण उत्सुक आहेत.

विवेक अग्निहोत्री आणि त्यांच्या पत्नी पल्लवी जोशी यांनी 27 सप्टेंबर रोजी मालमत्तेची नोंदणी केलीये. द काश्मीर फाईल्स चित्रपटापासून विवेक अग्निहोत्री प्रचंड चर्चेत आहेत. कारण 20 कोटींचे बजेट असलेल्या त्यांच्या चित्रपटाने तब्बल 340 कोटींचे कलेक्शन बाॅक्स आॅफिसवर करून दिले आहेत. आजही प्रत्येकाला द काश्मीर फाईल्स या चित्रपटाची आठवण होते.