विवेक अग्निहोत्री यांनी ‘त्या’ विधानावरून केले अनुराग कश्यप यांना टार्गेट, वाचा काय घडले?

| Updated on: Jan 22, 2023 | 2:36 PM

अनुराग कश्यप यांच्या याचविधानावर सडेतोड टीका विवेक अग्निहोत्री यांनी केली होती. आता परत एकदा सोशल मीडियावर या दोघांमध्ये वाद सुरू होण्याची चिन्हे दिसत आहेत.

विवेक अग्निहोत्री यांनी त्या विधानावरून केले अनुराग कश्यप यांना टार्गेट, वाचा काय घडले?
Follow us on

मुंबई : विवेक अग्निहोत्री आणि अनुराग कश्यप (Anurag Kashyap) यांच्यामधील वाॅर सोशल मीडियावर कायमच सुरू असतो. काही दिवसांपूर्वीच चित्रपट निर्माते अनुभव सिन्हा यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता. विशेष म्हणजे या फोटोमध्ये अनेक बाॅलिवूड चित्रपट निर्माता देखील दिसत होते. या फोटोमध्ये अनुराग कश्यप देखील होते, यावरून अनेक चर्चा रंगत होत्या. अनुराग कश्यप आणि विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri ) यांच्यामध्ये कायमच सोशल मीडियावर खटके उडताना दिसतात. काही दिवसांपूर्वीच अनुराग कश्यप यांनी म्हटले होते की, पुष्पा आणि कांतारा यासारख्या चित्रपटांमुळे बाॅलिवूडचे मोठे नुकसान होत आहे. अनुराग कश्यप यांच्या याचविधानावर सडेतोड टीका विवेक अग्निहोत्री यांनी केली होती. आता परत एकदा सोशल मीडियावर या दोघांमध्ये वाद सुरू होण्याची चिन्हे दिसत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विधानावर अनुराग कश्यपला प्रश्न विचारण्यात आला, त्यावेळी ते म्हणाले, हे त्यांनी चार वर्षांपूर्वी करणे गरजेचे होते…त्यावेळी याचा काही परिणाम झाला असता असे मला वाटते…मला वाटतं नाही की आता याचा काही परिणाम होईल…

पुढे अनुराग कश्यप म्हणाले की, आता सर्व गोष्टी हाताबाहेर गेल्या आहेत…मॉब आता बाहेर गेलाय…म्हणजेच अनुराग कश्यप यांना म्हणायचे होते की, नरेंद्र मोदी यांनी चार वर्षांपूर्वीच हे सर्व करायला हवे होते.

आता अनुराग कश्यप यांच्या याच विधानाचा समाचार विवेक अग्निहोत्री यांनी घेतला असून त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करताना अनुराग कश्यप यांच्या बातमीची एक लिंक सेंड केली असून म्हटले आहे की, ऑडियन्स आता मॉब आहे…वाह! वाह! वाह!

आता विवेक अग्निहोत्री यांची हिच पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी या पोस्टवर कमेंट करत अनुराग कश्यप यांचा क्लास घेतला आहे. अनुराग कश्यप आणि विवेक अग्निहोत्री यांच्यामध्ये कायमच वाद सुरू असतो. आता यावर अनुराग कश्यप काय उत्तर देतात हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

मोदी यांनी म्हटले होते की, कोणताही नेता उठतो आणि कोणत्याही चित्रपटाबद्दल बोलू लागतो आणि दिवसभर टीव्हीवर तेच सुरू राहते…यामुळे लोकांनी असे बोलणे टाळावे असे मोदींनी म्हटले होते. हे सर्व नरेंद्र मोदी हे बाॅयकॉट ट्रेंड आणि बाॅलिवूड चित्रपटांना होत असलेल्या विरोधावर बोलले होते.