दिग्दर्शक ‘विवेक अग्निहोत्री’ने बॉलिवूडला दाखवला आरसा, म्हणाला की बाॅलिवूड बहिरे…

नेहमीप्रमाणेच यावेळीही त्यांच्या निशाण्यावर बॉलिवूड आहे. विवेक अग्निहोत्री यांनी बाॅलिवूडवर जोरदार टीका केली आहे.

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीने बॉलिवूडला दाखवला आरसा, म्हणाला की बाॅलिवूड बहिरे...
| Updated on: Oct 29, 2022 | 12:33 PM

मुंबई : ‘द काश्मीर फाइल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. विवेक अग्निहोत्री त्यांच्या बेधडक वक्तव्यांसाठी ओळखले जातात. नेहमीप्रमाणेच यावेळीही त्यांच्या निशाण्यावर बॉलिवूड आहे. विवेक अग्निहोत्री यांनी बाॅलिवूडवर जोरदार टीका करत, सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलीये. ही पोस्ट आता चर्चेचा विषय ठरली आहे. अनेक युजर्स विवेक अग्निहोत्री यांच्या पोस्टचे समर्थन करताना देखील दिसत आहेत.

विवेक अग्निहोत्री यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, द काश्मीर फाइल्स, कांतारा, रॉकेटरी आणि कार्तिकेय 2 हे चित्रपट अत्यंत कमी बजेटचे होते. विशेष म्हणजे या चित्रपटात कोणतेही असे फेमस स्टार नाहीयेत. म्हणावी तशी या चित्रपटांची मार्केटिंग नाहीये. मात्र, हे असताना देखील या चित्रपटांनी बाॅक्स आॅफिसवर तब्बल 800 कोटी कमाई केलीये.

विवेक अग्निहोत्री यांनी पुढे लिहिले की, 4 चित्रपटांच्या निर्मितीचा एकूण खर्च 75 कोटींपेक्षा कमी आहे. बाॅलिवूड आंधळे, बहिरे आणि मुके आहे की, त्यांना या साध्या गोष्टी समजत नाहीत. यामधून ते काहीच शिकत नाहीत? आता हेच विवेक अग्निहोत्री यांचे ट्विट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.

‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपट तयार करण्यासाठी 15 कोटींच्या बजेट होते. या चित्रपटाने बाॅक्स आॅफिसवर तब्बल 341 कोटींची कमाई केलीये. द काश्मीर फाइल्स या चित्रपटावर प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम केले. चित्रपट बघण्यासाठी थिएटरमध्ये गेलेले प्रेक्षक देखील चित्रपट बघताना भावनिक झाले.